
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर,ता.शिरुर,जिल्हा -पुणे.
Contents
शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे महिलांची मारामारी ! तर याच गावी दोन मोटरसायकलींची जोरदार धडक !
शिरुर पोलिस स्टेशनला एका दिवसात मांडवगण फराटा येथील दोन गु्हे दाखल !
शिरुर,दिनांक 1 सप्टेंबर : (श्री.अनिल डांगे यांच्याकडुन)
शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे महिलांची मारामारी झाली आहे. तर याच गावी दोन मोटरसायकलींची जोरदार धडक होवुन एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे मोटरसायकल स्वारावर गुन्हा दाखल झाला आहे. शिरुर पोलिस स्टेशनला एका दिवसात मांडवगण फराटा येथील दोन गु्हे दाखल झाले आहेत.शिरुर पोलिस पुढील तपास पोलिस निरिक्षक श्री.जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
दोन महिलांमधे शिवीगाळ,मारहाण व दमदाटी. …
शिरुर पोलिस स्टेशनला नोंद केल्यानुसार
हकिगत अशी की दिनांक 18/08/2024 रोजी 11:45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बायडाबाई भानुदास पवार ,वय- 60 वर्षे, धंदा -मजुरी, राहणार – मांडवगण फराटा ,तालुका- . शिरूर ,जिल्हा-पुणे या मांडवगण फराटा ,तालुका- . शिरूर, जिल्हा-पुणे गावच्या हददीत फिर्यादी त्यांचच्या घरातुन बाजार आणण्यासाठी निघाले होते. त्या हेमा गोरख गव्हाणे, राहणार,मांडवगण फराटा , तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे हीच्या दारासमोरून रस्त्याने जात असताना त्यांना हेमा गव्हाणे व ज्योती राजु पवार, राहणार, मांडवगण फराटा, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे यांनी “तू दारातुन जाऊ नको’ असे म्हणुन शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तेव्हा फिर्यादी त्यांना ‘मला शिवीगाळ करू नका’ असे बोलत असताना हेमा गव्हाणे हीने बाजुला पडलेला दगड हातात घेऊन फिर्यादीला जोरात उजव्या गालावर मारला. त्यावेळी त्या खाली पडल्या.तेव्हा त्यांना
1) हेमा गोरख गव्हाणे
2) ज्योती राजु पवार
3) राजु पवार (पुर्ण नाव माहीती नाही)
हे सर्व राहणार-मांडवगण फराटा, तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे यांनी पुन्हा हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. …..
म्हणून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’शिरुर‘शिरूर पोलीस स्टेशनमधे गु.र.नं 736/2024 हा आहे. भारतीय न्याय संहिता कायदा कलम -118(2)115(2) 352,351(2) (3) ,3(5) प्रमाणे वरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. भगत हे आहेत.तर पुढील तपास पोलिस हवालदार श्री. शिंदे हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक श्री. ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
——————
शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत. ….
मांडवगण फराटा येथे दोन मोटरसायकल ची जोरदार धडक !
शिरुर पोलिस स्टेशनला नोंद केल्यानुसार
हकिगत अशी की दिनांक 10/08/2024 रोजी दुपारी 2:00वाजण्याच्या सुमारास जुनामळा, मांडवगण फराटा, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे गावच्या हददीत फिर्यादी फिर्यादी दत्ता महादेव मोरे, वय -23 वर्षे, व्यवसाय -मजुरी, राहणार – 11वा मैल, मांडवगण फराटा, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे
यांच्या ताब्यातील प्याशन प्लस मोटर सायकल नंबर एम. एच. 16ए. एन. 2224 हिस एम. एच. 12, डब्लू. डी. 8341या गाडीवरील चालक गणेश प्रभाकर कूलकर्णी, राहणार-11 वा मैल, मांडवगण फराटा, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे याने त्याच्या ताब्यातील मोटर सायकल ही मांडगण फराटा बाजूकडून 11 वा मैले बाजूकडे घेवुन जात असताना ती भरधाव वेगात चालवुन फिर्यादीच्या मोटरसायकलीस समोरून जोराची धडक देवुन फिर्यादीचे चेहऱ्यावर हनुवटीला व डाव्या पायाला किरकोळ व गंभीर दुखापतीस तसेच दोन्ही वाहानांचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे.
मोटरसायकल चालकावर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. ..
म्हणुन फिर्यादी दत्ता महादेव मोरे, वय -23 वर्षे, व्यवसाय- मजुरी, राहणार -11वा मैल, मांडवगण फराटा, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांनी गणेश प्रभाकर कुलकर्णी, राहणार-11 वा मैल, मांडवगण फराटा, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे याच्याविरुध्द शिरूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन गु.र. नं 735/2024 हा आहे.तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281, 125, 125 (a), 324 (4) सह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल आमलदार पोलिस हवालदार श्री. भगत हे आहेत.तर पुढील तपास आमलदार पोलिस हवालदार श्री.गवळी हे करत आहेत. प्रभारी आधिकारी पोलिस निरिक्षक श्री.जोतिराम गुजवटे, शिरूर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुढील तपास सुरू आहे.