
Contents
- 1 मांडूळ प्रजाती चा साप बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या दोघांना अटक!
- 1.1 माडूळ प्रजाती ही ‘दुतोंडी’ (?) ! पण काय पुढे घडले ? ते वाचा सविस्तर!
- 1.1.1 शिरुर, दिनांक 31जानेवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 मांडूळ प्रजाती चा साप —–
- 1.1.3 गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली !
- 1.1.4 एस टी बस ची ब्रेझा गाडीला धडक ! तर शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत सविंदणे येथे पुतण्याची चुलत्याला जीवे मारण्याची धमकी !
- 1.1.5 मांडूळ प्रजातीच्या साप असलेले (वन्यप्राणी) विनापरवाना?
- 1.1.6 ज्या मध्ये—- 1) देवदास इमराज भोसले ,वय -51 वर्ष, राहणार -मुखई, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे , 2) धनेश्वर दुर्यभान भोसले ,वय -35 वर्ष, राहणार – गणेगाव खालसा ,तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे
- 1.1.7 वन्य संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल!
- 1.1.8 वरिष्ट पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई—-
- 1.1.9 About The Author
- 1.1 माडूळ प्रजाती ही ‘दुतोंडी’ (?) ! पण काय पुढे घडले ? ते वाचा सविस्तर!
मांडूळ प्रजाती चा साप बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या दोघांना अटक!
माडूळ प्रजाती ही ‘दुतोंडी’ (?) ! पण काय पुढे घडले ? ते वाचा सविस्तर!
शिरुर, दिनांक 31जानेवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

मांडूळ प्रजाती चा साप बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. माडूळ प्रजाती ही ‘दुतोंडी’ (?) असते.ती बाळगणे हे ‘ वन्यजीव कायद्या’नुसार गुन्हा आहे.त्यामुळे ते बाळगणाऱ्या दोघांवर शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके काय पुढे घडले ? ते वाचा सविस्तर या बातमीमधे !
मांडूळ प्रजाती चा साप —–
शिरूर मध्ये बिगर परवाना बेकायदेशीर ‘मांडूळ ‘बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.’मांडुळ’ ही एक प्रकारची सापाची प्रजाती आहे.तीला दोन्ही बाजुला तोंड असते.अर्थात तो ‘दु’तोंडी सरपटत जाणारा एक सापाचा प्रकार असतो. हे मांडुळ बागगणार्या दोन व्यक्तींना शिरूर पोलिसांनी अटक केली आहे.मांडुळ प्र जाती
Read more >>
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांचा ‘करेक्ट गेम’! ‘डिझेल चोरां’च्या टोळीचा केला पर्दाफाश !(पहा व्हिडिओसह)
गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली !
श्री. संदेश केंजळे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार शिरूर पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण ,पोलीस अंमलदार विजय शिंदे, सचिन भोई ,नितेश थोरात ,अजय पाटील, मिरज पिसाळ असे पोलिस पथक शिरूर शहरांमध्ये पेट्रोलिंग करत होते. पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली. शिरूर ग्रामीण तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत शिरूर रामलिंग रोड लागत वरील इसम असल्याची माहिती मिळाली होती.
Read more >>
एस टी बस ची ब्रेझा गाडीला धडक ! तर शिरुर तालुक्यातील दुसर्या घटनेत सविंदणे येथे पुतण्याची चुलत्याला जीवे मारण्याची धमकी !
मांडूळ प्रजातीच्या साप असलेले (वन्यप्राणी) विनापरवाना?
गावरानाच्या बाजूला दोन इसम पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधे होते. मांडूळ प्रजातीच्या साप असलेले (वन्यप्राणी) विनापरवाना ते जवळ बाळगून थांबलेले होते. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी चपळाईने ही माहिती पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांना कळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या बातमीच्या अनुषंगाने बातमी मिळालेल्या ठिकाणी शिरूर ग्रामीण, तालुका -शिरूर ,जिल्हा- पुणे हद्दीमध्ये शिरूर रामलिंग रोड एक गायरान आहे.या गायरानाच्या मधून घोटी मळ्याकडे जाणाऱ्या रोडवर एक पांढऱ्या रंगाची शिफ्ट कार उभी होती.
Read more >>
ज्या मध्ये—-
1) देवदास इमराज भोसले ,वय -51 वर्ष, राहणार -मुखई, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे ,
2) धनेश्वर दुर्यभान भोसले ,वय -35 वर्ष, राहणार – गणेगाव खालसा ,तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे
या दोघांकडे हे मांडूळ प्रजातीचे साप सापडले आहेत. त्यांच्याजवळ मांडूळ प्रजातीचा एक नर जातीचा साप (वन्यप्राणी) सापडला आहे. त्याची लांबी चार फूट आहे. त्याला ताब्यात घेतले गेले आहे .
वन्य संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल!
सदरची कारवाई झाल्याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ७२२/२२५ असा नोंद झाला आहे. दोन आरोपींवर वन्य संरक्षण अधिनियम 1972 च्या कलम 48 ( 39 ) 57 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.
Read more >>
गंठण हिसकावून नेले : तिघे चोरटे फरार !
वरिष्ट पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई—-
सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री .पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी ,प्रशांत ढोले ,पोलीस निरीक्षक श्री संजय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिसांनी शिरूर पोलीस गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शुभम चव्हाण पोलीस हवालदार नाथ साहेब जगताप ,पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात ,सचिन भोई ,नीरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली.