शिरुर मधील मातोस्री मदनबाई माणिकचंद धारीवाल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ ला ‘भीम छावा’ चा दणका….
शिरुर मधील मातोस्री मदनबाई माणिकचंद धारीवाल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल' ला 'भीम छावा' संघटनेचा 'दणका' बसला आहे. शिरुर मधील मातोस्री मदनबाई माणिकचंद धारीवाल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल', शिरुर चा स्टाफ 'धर्मादाय' च्या नियमांचे पालन करतो का ? याची तपासणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली पाहिजे,अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शिरुर मधील मातोस्री मदनबाई माणिकचंद धारीवाल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ ला ‘भीम छावा’ संघटनेचा ‘दणका’ बसला आहे. शिरुर मधील मातोस्री मदनबाई माणिकचंद धारीवाल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’, शिरुर चा स्टाफ ‘धर्मादाय’ च्या नियमांचे पालन करतो का ? याची तपासणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली पाहिजे,अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पेशंट चा अनुभव…
मुंबई अंबरनाथ येथील पेशंट किसन यशवंत रणदिवे यांना उपचाराची इमर्जन्सी असल्यामुळे शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केले होते. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. परंतु माणिकचंद हॉस्पिटलचे व्यवस्थापन तुमचे वैद्यकीय बिल भरा. तरच तुम्हाला डिस्चार्ज देण्यात येईल. तसेच उपचारापासून वंचित ठेवण्यात येईल .याबाबत पेशंटच्या घरच्यांनी भिम छावा संघटनेशी संपर्क केला.
Dr.Nitin Pawar,Shirur Editor.
‘संपादकिय टच”
“तुम्हाला कुणी ‘धर्मादाय’ धर्म करायला सांगितले आहे.समाजाने सांगितले आहे का?कशाला चालवता अशा ‘धर्मादाय’ संस्था? लाखोंच्या संख्येने देशात अशी ,’कार्य’ होतात म्हणे ! मग का करोडोंच्या संखेने लोक वंचित आहेत?बंद कराव्यात अशा ‘धर्मादाय’ संस्था! काही गरज नाही. सरकारी दवाखान्यांमधे ससुन सारख्या ए टु झेड उपचार सरकार मोफत करते.तिथे पेशंट व नातेवाईक जात नाहीत.मुर्खपणाच्या समजुतींमुळे ! उदाहरणार्थ एक समज आहे. तिथे ससुनला पेशंटला इंजेक्शन देऊन मारुन टाकतात !एक का दोन ? नाना तर्हा ! पेशंट ही ,’कसायाला गाय धार्जिणी ‘ या म्हणीप्रमाणे अशा ठिकाणी जातातच !”
‘धर्मादाय’ म्हणजे काय?कशाला धर्म करता?लोकांनी तशी मागणी केलेली असते का?मग ‘धर्म’ करण्याची घाई कशासाठी?
वास्तविक गरीब रुग्णांसाठी काही टक्के काट व त्यांच्या उपचाराचा खर्च ‘धर्मादाय’ म्हणुन नोंद केली असलेल्या मोठ्या दवाखाण्यांनी ,’धर्मादाय’ म्हणुन सरकारकडुन अल्प किंमतीत जागा,पाणी,वीज इ.इन्फ्रास्ट्रक्चर मिळवलेले असते.त्याबदल्यात काही अटी मान्य केलेल्या असतात.त्यापैकी एक आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार देणे हे एक असते.पण भारतीय लोकांचे धर्म आणि धर्मादाय सेवा हा एक विनोदच आहे.नाव समाजसेवा ठेवायचे.त्यातुन धंदा लुटायचा करायचा !याला अपवाद शेकडोंच्या संख्येने असणार्या या ,”धर्मादाय’ संस्थांपैकी एक तरी अपवाद सापडेल की नाही, अशी शंका आहे.आणि नावात ‘धर्म’ असणे म्हणजे धर्माची व्याख्या विश्वकोषातुन बदलावी लागेल अशी परिस्थिति आहे.तरी हे असेच चालते.हा एक धर्मामुळेच घडणारा ,’चमत्कार’ असावा !
आधीचे व्यवस्थापन दळभद्री ?
‘शिरुर मधील हे धारीवाल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल त्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे.’बनिया ग्राहकों से दोस्ती करेगा तो खायेगा क्या’ असा बसंती शैलीतला संवाद आठवतो.इथले व्यवस्थापन आधी म्हणजे ते रुबी हाल कडे देण्याचा आधीचे बिलकुल कुचकामी होते.त्यामुळे हे धारीवाल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल डबघाईला आले.नंतर ते आता रुबी हाल, पुणे या प्रसिद्ध हास्पिटल कडे देण्याचा निर्णय घेतला गेला.पण कधीही विचारले तरी आजही इथला स्टाफ ‘ते होणार आहे,प्रोसिजर चालु आहे.असे सांगत असतो.म्हणजे नेमकी माहिती एक तर नसते.किंवा सांगायची नसावी.रुबी हाल कडुन लोकांच्या चांगल्या सेवेची अपेक्षा आहे.
बदमाश कर्मचारी?
खरी माहिती कधी सांगायची घ नाही.असा इथल्या स्टाफ चा स्वभाव आहे. कसेही करुन पैसे आधी घ्यायचे.परिस्थिति पाहुन पेशंटला सवलतीचा दिलासा द्यायचाच नाही.हे निर्दयपणे वागण्याचे एक उदाहरण ! उडवा उडवीची उत्तरे द्यायची.कशलेस क्लेमवाल्यांनाही दिलासा द्यायचा नाही. ‘खर्च’ येवु शकतो’,असे सांगायचे ! हे ऐकुण घ पेशंटचा आजार बी पी सारखा एखादा वाढतो.याच केसमधे हा पेशंट ‘मोफत उपचार’ या नियमात बसत होता.तर आधीच मोठ्या मनाने त्याच्यावर उपचार करायचे होते.भिम छावा काय पण कोणत्याही संघटनेला हस्तक्षेप करून भाग घ्यायला कशाला लावायचा?जर बील माफ होवु शकत असेल तर कशाला त्रास द्यायचा?इतर पेशंटच्या मागे जर कोणती संघटना नसेल तर त्याचे काय होत असेल?
होत असतानाही न करण्याची घाणेरडी वृत्ती. ..
एकदा एका पेशंटला पैशासाठ अडवले.क्लेम मंजुर झाला नाही म्हणुन ! त्याच्याकडे दमडी नव्हती.त्याला अपमानजनक वागणुक देण्यात आली.हास्पिटल मधुन बाहेर जावू देईनात. नंतर सोडले.दुसर्या दिवशी फोन करुन दारिद्रकार्ड ,आधार कार्ड इ.मागितले. आणि मोफतच्या नियमात बसवले. म्हणजे ते बसत होते.पण ‘पैसा उकळणारा |ना भय ना लज्जा ‘ असे ‘कामातुरा ना भय ना लज्जा ‘ सारखा हा प्रकार! प्रत्येक गोष्टीत नफेखोरी! मैनेजर ला अफाट पगार ! उपस्थित राहणार आठवड्यातुन दोन वेळा ! उत्तर ,’आज मैनेजर ‘ रजेवर आहेत असे उत्तर मिळते.थेट सोमवारी वगैरे दिवशी भेटतील’असे उत्तर !
भिम छावा संघटनेचा हस्तक्षेप. …
भिम छावा संघटनेच्या कार्यकर्यांनी माणिकचंद हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. संबंधित पेशंट हे गरीब असल्याने ते आपले वैद्यकीय बिल भरू शकत नाहीत. त्यांना उपचाराची अत्यंत आवश्यकता आहे. जर उपचारापासून आपण रुग्णास वंचित ठेवले व पेशंटला कमी जास्त झाले तर सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापनाची राहील.तसेच याबाबत कार्यकर्ते भीम छावा संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात करतील, असा इशारा दिल्यानंतर तात्काळ रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी कुटुंबाकडून अविनाशजी शिंदे , चेतनजी साठे, प्रकाश जी डंबाळे, मयूर भोसले, हर्ष गायकवाड, विनायक मल्लाव व भीम छावा संघटनेचे आभार मानण्यात आले.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com