
Contents
- 1 ब्रेकिंग न्यूज : मांजर झाडाला उलटे टांगले ! कोणी? का? नंतर काय झाले?व्हिडीओसह पहा…
- 1.1 ब्रेकिंग न्यूज : ‘सत्यशोधक’ न्युज च्या सौ.कल्पना पुंडे यांचा प्रत्यक्ष अनुभव वाचा व्हिडिओसह….
- 1.1.1 शिरुर , दि. 13 जुलै : (सौ.कल्पना पुंडे यांच्याकडुन )
- 1.1.2 मांजर झाडाला उलटे टांगले. ..
- 1.1.3 वेड्याला तेथून हाकलून दिले. …
- 1.1.4 उलटे घडले तर बातमी होते. …
- 1.1.5 माध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. …
- 1.1.6 वेड्यांना पेशंट म्हणून समजुन घ्यावे. …
- 1.1.7 लोकप्रतिनीधी व कार्यकर्यांनी सजग राहावे….
- 1.1.8 About The Author
- 1.1 ब्रेकिंग न्यूज : ‘सत्यशोधक’ न्युज च्या सौ.कल्पना पुंडे यांचा प्रत्यक्ष अनुभव वाचा व्हिडिओसह….
ब्रेकिंग न्यूज : मांजर झाडाला उलटे टांगले ! कोणी? का? नंतर काय झाले?व्हिडीओसह पहा…
ब्रेकिंग न्यूज : ‘सत्यशोधक’ न्युज च्या सौ.कल्पना पुंडे यांचा प्रत्यक्ष अनुभव वाचा व्हिडिओसह….
शिरुर , दि. 13 जुलै : (सौ.कल्पना पुंडे यांच्याकडुन )
मांजर झाडाला उलटे टांगले. ..
ब्रेकिंग न्युज : मांजर झाडाला उलटे टांगले होते. कोणी? का? नंतर काय झाले? व्हिडीओसह पहावे, असाच सारा हा प्रकार आहे. ‘सत्यशोधक न्युज’ च्या सौ.कल्पना पुंडे यांचा हा प्रत्यक्ष अनुभव वाचा, व्हिडिओसह….! असे सांगण्यासारखा हा सर्व खेळ सुरू होता. तेव्हा मी त्याचा व्हिडिओ घेतला.
तर हकिकत अशी आहे की दिनांक 12/7/2024 रोजी मी (सौ.कल्पना पुंडे मॅडम) आणि माझी मुलं कान्हुर मेसाई येथे आषाढी निमित्त मेसूबाई दर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी देवीच्या समोरील बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे . तेथे आम्ही दर्शनासाठी गेलो. एक वेडा एक दोन महिन्यापासून मंदिराजवळ बसलेला आहे.असे समजले. आम्ही तेथून जात असताना त्याला पहिले. त्यावेळेस आम्हाला तेथे वेगळेच काही दिसले. तिथे त्याने एका मांजराला उलटे दोरीला बांधले होते.ते ठेवलेले आम्हाला दिसले. तेव्हा आम्ही त्याला म्हटले.’ त्या मांजराला सोडून दे’, तेव्हा त्याने मी सोडून देत नाही ! तुम्हाला काय करायचे करा ‘ असे सांगितले.

वेड्याला तेथून हाकलून दिले. …
तेव्हा माझ्या मुलाने शिक्रापूर पोलीस स्टेशनला फोन लावला . त्यांना सर्व माहिती सांगितली. तसेच तेथील बरेचसे कार्यकर्ते तेथे जमा झाले . त्यांनी सर्वांनी मिळून त्या वेड्याला तेथून हाकलून दिले. त्याच्या सर्व वस्तू त्यांनी जाळून टाकल्या .
अशाप्रकारे तेथे आगळावेगळा प्रकार पाहण्यास भेटला . परंतु त्यावेळेस कान्हुर मेसाई येथील कार्यकर्त्याने खूप सहकार्य केले. त्या वेड्याला गावातून बाहेर हाकलून दिले . त्याबद्दल गावातील लोकांचे मनापासून आभार व धन्यवाद मानते, असे पुंडे मॅडम यांनी सांगितले.
उलटे घडले तर बातमी होते. …
कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही. अर्थात बातमीदाराने ती वेगळ्या पद्धतीने रंगवली तर होवू शकते. पण सहसा नाही. पण जर माणुस कुत्र्याला चावला तर मात्र बातमी होते.वाचकांची त्या बातमीवर झुंबड उडालेली असते. म्हणजे हे असे उरफाटे असे बातमीदारांचे क्षेत्र आहे.कितीतरी वेळा बातमीदार डोळ्यावर येतो.बातमीगणिक एक तरी विरोधक किंवा बातमीच्या स्वरुपावरुन अगदी शत्रुसुद्धा होत असतात.ते काय ?कधी करतील याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत बातमीदार,पत्रकार, संपादक, प्रेस मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, डिजीटल मिडीया या क्षेत्रात काम करावे लागतो. फक्त आधार हा पोलिसांचा असतो.त्यांचाच कायदेशीरपणे आधार तसा पुरेसा असतो.मात्र पत्रकार पितपत्रकारिता करत असेल.ब्लैकमेलिंग करत असेल तर त्याच्याविषयी क्रोध निर्माण होतो. त्याच्यावर हल्ला, धमकी , इजा, शिवीगाळ असे प्रकार होत असतात. तसे प्रामाणिक पत्रकारांवर देखील होत असतात.जर मोठ्या आर्थिक हितसंबंधांना अडथळा तो ठरु लागला तर !
माध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. …
असे सर्व असताना बातमी सुद्धा कधी,कुठे मिळेल ते सांगता येत नाही. अचानक बातमीलायक प्रसंग ,व्यक्ती, ठिकाण समोर येते.मग त्याची बातमी करावी लागते.प्रसारमाध्यमें लोकशाहीत चौथा आधारस्तंभ मानला गेला आहे. चार स्तंभ कायदेमंडळ ,न्यायपिलिका,प्रशासन व माध्यमे. नागरिक स्वतः फिरुन समाजात,राज्यात, देशात,जगात काय चालले होते ते पाहू शकत नाही. त्याचे जिवन किती सुरक्षित आहे किंवा नाही, हे तो शकत नाही. पण त्या वतीने ते काम माध्यमे करत असतात.आजुबाजूला जे घडते,ते त्याच्यापर्यंत पोचवत असतात.ते त्यांच्यापर्यंत पोचले नाही.तर एक राष्ट्र म्हणून तो समाज कसा उभा राहू शकेल?आज तर नव्या तंत्रज्ञानाने माहितीचा स्फोटच झाला आहे. क्षणाक्षणाला नवीन माहिती आणि तंत्रज्ञान विकसित होत आहे.त्याबाबत अपडेट असणे ही आवश्यक बाब ठरली.आहे.हे काम प्रामुख्याने प्रसार माध्यमे करत असतात. लोकशाहीतील तीन खांब आणि नागरिक यांच्या मधील दुवा माध्यमे असतात.त्यामुळे नागरिक जागृत राहून देशाचे,लोकशाहीचे आणि स्वतः चे जीवन अधिक सुरक्षित करु शकतात.
वेड्यांना पेशंट म्हणून समजुन घ्यावे. …
इथे प्रसंग साधा आहे.पण स्थानिक लोक पहात राहिले होते.वेडा हा काही गुन्हेगार नाही.वेडा पेशंट असतो.त्याचा मेंदुवरील ताबा सुटलेला असतो.विवेक बुद्धीची जाणिव राहिलेली नसते.त्यामुळे तो असे वागतो आहे.मुद्दाम काही करत नाही. असे पेशंट अनेक आहेत.त्यांना काळ वेळ,ठिकाण,वस्र,केस,दाढी ,आंघोळ,रस्ता,स्मशानभूमी, अशा बाबींचे भान उरलेले नसते.बर्याच वेळा त्याला चोर समजुन लोक मारहाण करतात. स्रीकडे पहिले,बोलला,किंवा काही मागितले. तर त्याला चोप बसतो.गावांमधे राहणार्या लोकांना हे माहित पाहीजे की असे कोणी आढळल्यास संबंधित विभागाला ते कळवून अशा लोकांची तिथे व्यवस्था लावली पाहिजे. अशा लोकांसाठी मनोरुग्णालय ,दवाखाने,पोलिस यंत्रणा आहेत.
लोकप्रतिनीधी व कार्यकर्यांनी सजग राहावे….
एखादा मनोरुग्ण हिंसकही असु शकतो.लैंगिक विकृती असणारा असु शकतो.हल्ला करणारा असु शकतो.म्हणून गावकर्यांचे पहिले काम अशा व्यक्ती गावात आल्यानंतर त्याची माहिती पोलीस आणि तत्सम कार्यालयाला देणे आवश्यक आहे. आज हेल्प लाईन खुप उपलब्ध आहेत.त्यांचे नंबर आपल्या मोबाईल फोन वर साठवून ठेवले पाहीजेत.फक्त लोकप्रतीनिधी किंवा कार्यकर्ते यांच्याकडेच नाही तर प्रत्येक व्यक्ती कडे असणे आवश्यक आहे. हाच एक प्रमुख उपयोग मोबाईल फोन सारख्या यंत्राचा आहे.पण मोबाईल फोन चा वापर नेमका कशासाठी करायचा असतो. हे समजण्याच्या आधीच विदेशी कंपन्यानी आपल्या हातात हा अल्लाउद्दिन चा दिवा दिला.त्यामुळे आपण करोडो रुपये विदेशात घालवणे याव्यतिरिक्त काही करत नाही.