
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
- 1 भिमा नदी काठी मासे पकडत होता ! दुसरा मेंढ्या चारत होता ! पुढे काय घडले ? ते वाचा….
- 1.1 भिमा नदी काठी रांजणगाव सांडसला काय घडले ? वाचुन प हाच एकदा…
- 1.1.1 शिरुर, दि.19 जुन: (डा.नितीन पवार, संपादक )
- 1.1.2 भिमा नदी काठी मासे पकडत होता. .
- 1.1.3 भिमा नदी काठी दुसरा मेंढ्या वळत होता….
- 1.1.4 भिमा नदी काठी पहिल्याने दुसर्याच्या मेंढ्यांवर पाणी उडवले. …
- 1.1.5 जबाब विचारला म्हणून मारहाण. …
- 1.1.6 दुसर्या घटनेत हिरो स्प्लेंडर चोरीला….
- 1.1.7 घटनांचे तात्पर्य…
- 1.1.8 About The Author
- 1.1 भिमा नदी काठी रांजणगाव सांडसला काय घडले ? वाचुन प हाच एकदा…
भिमा नदी काठी मासे पकडत होता ! दुसरा मेंढ्या चारत होता ! पुढे काय घडले ? ते वाचा….
भिमा नदी काठी रांजणगाव सांडसला काय घडले ? वाचुन प हाच एकदा…
शिरुर, दि.19 जुन: (डा.नितीन पवार, संपादक )

भिमा नदी काठी मासे पकडत होता ! दुसरा मेंढ्या चारत होता !
आणि मग याच भिमा नदीकाठी रांजणगाव सांडसला काय घडले ? हे आपण पाहु.
भिमा नदी काठी मासे पकडत होता. .
भिमा नदी शिरुर तालुक्यातील एक प्रसिद्ध नदी आहे. कोरेगाव भिमा चा इतिहास कोण जाणत नाही? पण म्हणून काय करण राजेंद्र भांडलकर याने जो रांजणगाव सांडस मधे राहतो.त्याने गावाजवळून वाहणार्या भिमा नदीपात्रातून होडीत बसून मासे पकडू नयेत ? असे आजच्या लोकशाही भारतात कोण म्हणू शकतो. किती प्रगल्भ आपली लोकशाही ? टिळकी बाणा !मासे पकडणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच !असा. तर तो मासे पकडत होता.पण नियतीला काही वेगळेच मंजुर होते असे या केसमधे तरी दिसते.
भिमा नदी काठी दुसरा मेंढ्या वळत होता….
पण काही विपरित घडले ! गोरख बापू कोळपे हा जवळच स्मशानभूमी येथे मेंढ्या वळत होता. तो ही याच लोकशाहीतला नागरिक ! राजेंद्र भांडलकर याला मग बापु कोळपे याची मेंढर पाहुन गंमत म्हणा किंवा अन्य दुरार्या काही कारणाने ज्यांचा शिरुर पोलिस असुन शोध घेत आहेत ; त्या मेंढरांवर पाणी उडवावे वाटले.एकाच गावचे ! एक मासेमार तर दुसरा मेंढपाळ ! मैत्रीही असु शकते ! मैत्रीत सर्व क्षम्य ! मेंढरावर पाणी उडवले.तोंडावर,अंगावर वगैरे बर्याच भागांवर ! कोळपे याला राग येणं साहजिकच होतं. प्रत्येकाला ज्याची त्याची अस्मिता असणे आणि ती जपण्याचा अधिकार आहेच.म्हणून कोळपे याने भांडलकरला जाब विचारला.हे चांगलं केलं.अगदी नैसर्गीक आहे.कायदेशीर नाही.असे कोणता वकीलतरी म्हणु शकतो का?
भिमा नदी काठी पहिल्याने दुसर्याच्या मेंढ्यांवर पाणी उडवले. …
आणि म्हणुन ता. 12/06/2024 रोजी फिर्यादी गोरख बापू कोळपे , रांजणगाव सांडस, ता. शिरूर,जिल्हा- पुणे याने शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीनुसार स्मशानभूमी जवळ भीमा नदीच्या कडेला मेंढ्या चारत असताना त्यावेळी भीमा नदीत आत पाण्यात होडीत बसून आरोपी करण राजेंद्र भांडलकर हा मासे पकडताना त्याने फिर्यादीच्या मेंढ्यांच्या तोंडावर,अंगावर पाणी उडवले. तेव्हा फिर्यादीने त्यास जाब विचारला.
जबाब विचारला म्हणून मारहाण. …
त्या कारणावरून त्याने नाव चालविण्याच्या लाकडी पात्याने फिर्यादी कोळपेच्या डोक्यात मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी कोळपे हा खाली पडल्यावर त्या ठिकाणी असलेल्या कुऱ्हाडीच्या लाकडी दांडग्याने फिर्यादीस पाठीवर मारहाण करून जखमी केले आहे. दि. 18/06/2024 रोजी फिर्यादी गोरख बापू कोळपे यांनी शिरूर पोलिस ठाण्यात येउन तक्रार दिली. शिरूर पोलिसांनी आरोपी करण राजेंद्र भांडलकल याच्यावर आय पी सी कलम 324,504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास साहायक फौजदार गोपीनाथ चव्हाण , न्हावरे आऊट पोस्ट हे करत आहेत .
दुसर्या घटनेत हिरो स्प्लेंडर चोरीला….
तर दुसऱ्या एका घटनेमधे शिरुर तालुक्यातील न्हावरे
येथे दि.13/06/2004 रोजी सायंकाळी 04/30 वाजण्याच्या सुमारास ते 16/06/2824 रोजी दुपारी 3:00 वाजण्याच्या दरम्यान न्हावरे येथील गुंजन सिनेमा थेटर जवळ ता. शिरुर, जि.पुणे येथे अंदाजे रुपये 30,000/- किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल नं.MH-12-TM-6035 तिचा चासी नं.MBLHAW128M5B5317 व इंजिन नं. HA11EYMSB13826 आहे.ती चोरीला गेली आहे.
ही न्हावरे येथील गुंजन सिनेमा थिएटर जवळ, ता. शिरुर, जि. पुणे येथुन फिर्यादी अण्णासाहेब यशवंत कोळपे , रा. न्हावरे, ता. शिरूर यांच्या मालकीची मोटरसायकल त्यांचे संमतीशिवाय, मुद्दाम लबाडीच्या इरादयाने कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली आहे. म्हणून अज्ञात इसमाविरूध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा आय पी सी कलम 379 नुसार दि 19/06/2024 ला दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फोजदार कदम ,न्हावरे आऊट पोस्ट हे करत आहेत.
घटनांचे तात्पर्य…
एकंदरच भांडणे,चोर्या,बेकायदेशीर दारु धंदे मटका जुगार चोरी व ‘दोन’ नंबरचे बरेचसे धंदे हे शिरुर तालुक्यातील आतील भागात Interiar ला सर्रास चालु आहेत,अशी माहीती सर्वांनाच आहे.पण ते काही बंद होत नाही. असेही बर्याच नागरिकांना वाटते.त्यांचा पूर्ण भ्रमनिरास झाला असावा.किंवा तै निगेटिव्ह थिंकींग करणारे आहेत.असा शेरा एका नागरिकाने मारला आहे.हा नागरिक देशप्रेमी असावा.देश व्यवस्थित चालावा.असे त्याला मनोमन वाटत असावे.हि ही चांगली बाब आहे असे मानायला जागा आहे.असो.पण आज या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद संबंधित पोलिस स्टेशनला झाली आहे .
पोलिसांना हे सर्व हाताळताना स्ट्रेस होत असणार ! म्हणुन काही विनोद निर्माण होवून थोडं हसु येऊन हा स्ट्रेस कमी व्हावा असे नक्कीच वाटत असणार.म्हणुन सर्वांनी पोलिसांच्या मनाचा देखील विचार करावा.नुसत्या तक्रारी, टिका,अपेक्षा न करता आपल्या नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्याचे देखील भान ठेवले तर पोलिसांना काम सुसह्य होईल.ते अधिक कार्यक्षमतेने काम करु शकतील. नाहीतर आपल्यालाच होणारे त्रास वाढणार आहेत.