महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल : काहीच बोललो नाही तर कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही !
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकालांवर काहीच बोललो नाही तर कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही ! दुर्देवाने समाजाच्या सामूहिक चरित्राचा नीचांक गाठला गेलेला आहे, असे ठामपणे मात्र मी म्हणु शकतो.कारण समाजाच्याच भवितव्याची काळजी माझ्यासारख्या पत्रकाराला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल : काहीच बोललो नाही तर कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही !
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल : समाजाच्या सामूहिक चरित्राचा नीचांक गाठला गेला आहे ?
शिरुर,दिनांक 24 नोव्हेंबर :
Dr.Not in Pawar, Editor -satyashodhaknews.com
(संपादकीय)
(प्रतिमा साभार: विकिपिडिया)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकालांवर काहीच बोललो नाही तर कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही ! दुर्देवाने समाजाच्या सामूहिक चरित्राचा नीचांक गाठला गेलेला आहे, असे ठामपणे मात्र मी म्हणु शकतो.कारण समाजाच्याच भवितव्याची काळजी माझ्यासारख्या पत्रकाराला आहे.
‘चुप्पी’ साधली तर आत्मग्लाणी. …
अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे . मात्र या ठिकाणी या निकालाच्या बाबत काही लिहिले नाही किंवा ‘चुप्पी’ साधली तर कोणत्याही विवेकी माणसाला आयुष्यभर आत्मग्लाणी झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल’
आधी एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करतो की शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडून आलेले माऊली कटके हे निवडून आल्यामुळे मला व्यक्तिगत काही दुःख होत नाही तर आनंद होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे माऊली आबा कटके हे एक नवीन नेतृत्व, तरुण, नम्र, त्याग करणारे, आणि सामाजिक, धार्मिक स्वरूपाचे काम करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांना ‘माऊली’ असे म्हटले जाते. संत ज्ञानेश्वरांना देखील ‘माऊली’ असे म्हटले जाते. वारकरी पंथामध्ये देखील ‘माऊली’ अनेकांना म्हटले जाते.यावरुन त्यांना मतदारांनी का कौल दिला असेल.हे समजणे काही अवघड नाही.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघासाठी ते अधिक चांगले काम करू शकतील याबद्दल मला शंका नाही.
एक नियोजित कारस्थान. …
श्री.देवेंद्र फडणवीस
प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतरचा आहे. जो काही निकाल पुढे आला त्याबाबत लिहिणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मध्ये आणि देशांमध्ये कुठल्याही एक्झिट पोल ने किंवा अगदी विश्वासार्ह आणि सर्व मान्य असणाऱ्या कोणत्याही संस्थेच्या एक्झिट पोलणे महाराष्ट्राचा निकाल असा लागेल याचा काडी मात्र अंदाज व्यक्त केलेला नव्हता. तरी पण जो निकाल लागला. तो भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना, नेत्यांना सुद्धा संभ्रमात पाडणारा होता. असे आजच्या त्यांच्या मिरवणुकीत वावरताना स्पष्ट दिसत होते. असा निकाल कसा काय लागला याचे आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले होते. असाच प्रकार हरियाणामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेला होता.
‘हमाम में सब नंगे’. …
अशा पद्धतीने सध्याच्या स्थितीमध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष हे त्यांच्या लोकप्रियतेच्या साधारण पणे आजपर्यंतच्या कमी पातळीवर होते. आणि निकाल नेमका उलटा लागला. ईव्हीएम मशीन च्या बाबतीत तसा कोणताही पुरावा जरी नसला तरी आता हळूहळू काही माहिती, तक्रारी पुढे येत आहेत आणि त्यावरून या एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश होऊ शकतो.परंतु तसे होईल अशी काही शक्यता दिसत नाही आणि नेहमीप्रमाणे तो विषय बंद होईल.कारण एकच ‘हमाम में सब नंगे’ हे असणार आहे.
‘लाडकी बहीण’ योजना. …
श्री.अजित दादा पवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महत्त्वाची योजना ‘माझी लाडकी बहीण’ ही शिंदे सरकारने आणलेली होती. त्या योजनेचा प्रभाव महाराष्ट्रात पडला. हे नक्की. पण तो किती प्रमाणात पडला .याबाबत प्रश्नचिन्ह आहे.पडला असता तर मोदी,शहांच्या सभा उद्धव ठाकरे, शरद पवारांपेक्षा मोठ्या झाल्या असत्या.यु ट्यूबवर मोठ्या संख्येने व्हुज झाले असते. गद्दारी,महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाणे,मराठा आरक्षण बेरोजगारी,गुन्हेगारी,शरद पवार फॅक्टर याला महाराष्ट्रातील मतदारांनी आजिबात महत्व दिले नाही.असे होणे ही शक्य नाही. अन्यथा प्रचारादरम्यान ते निदर्शनास आले असते.
ईव्हीएम मशीन कडे बोट. ….
अशा प्रकारचा निकाल लागूच शकत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती सर्व मतदारसंघांमध्ये होती . इतर पक्षांनी मते मोठे खाल्ली, अपक्षांनी मते खाल्ली असे म्हणायलाही फारसा वाव दिसत नाही. मात्र एक तक्रार अशी प्रकारची आली आहे की मशीनची बॅटरी कमी झाल्यानंतर व पुन्हा मशीन सुरु केल्यानंतर मतांमध्ये वाढ होत होती किंवा एका वेळा बटन दाबले तर दोन मते दिले पडत होती. अर्थात ती त्यांना मते जास्त मिळालेले आहेत. त्यांनाच दिले पडत होती. पडली जात होते आणि अशा प्रकारची ही निवडणूक आणि सर्व गोष्टी पाहिल्या तर गंभीर प्रश्न निर्माण होतात.
ईव्हीएम मनमोहन सिंग यांच्या काळात आली….
यामध्ये निवडणूक मशीन मतदान पद्धत जेव्हा आली. तेव्हापासूनच त्या मशीनच्या बाबतीत वादविवाद चालू आहेत .परंतु जे जे सत्तेमध्ये होते . त्यांनी त्यावेळेस अशा शक्यतांना पूर्णपणे नकार देऊन ते फेटाळले होते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ईव्हीएम मशीन आली. पहिली दहा वर्षे काँग्रेसची सरकारे आली होती. त्याच्यानंतर दहा वर्षे भाजपचे सरकारी आले. परत भाजपला तिसरी टर्म मिळाली. प्रत्येक वेळेस अनेकांनी या मशीनच्या बाबतीत आक्षेप घेतलेले होते. अनेक प्रकारचे सार्वजनिक रित्या ईव्हीएम ही मशीन कशा पद्धतीने मन्युप्युलेट होऊ शकते. असे करून दाखवलेले पण होते. मात्र न्यायालयात तसेच सिद्ध झाले नाही .असे सांगितले जाते .
शेवटच्या दोन दिवसांमध्ये मतपरिवर्तन पटत नाही…..
माऊली आबा कटके,शिरुरचे नवे आमदार!
दुसरा भाग असा की महायुतीच्या विरोधात जाणारी प्रचंड प्रमाणातली मते एकदम बदलली कशी? शेवटच्या दोन दिवसांमध्ये असे होणे देखील अवघड वाटते .शेवटच्या दोन दिवसांमध्ये मटन ,पैसा प्रचंड ,दारु मोठ्या प्रमाणात पुरवली गेली. मतदारांना वाटली गेली. तसे प्रकार काही ठिकाणी सापडले देखील .’ खाऊ मटन दबाव बटन’ अशी एक म्हण सुद्धा तयार झाली.
मग इतका फरक पडला कसा?
मतदानाच्या मोजणीच्या दिवशी मतमोजणी चालू असताना काहीतरी वेगळे घडलेले आहे .असे अनेक पत्रकार, जाणकार आणि अनेकांना वाटत आहे. स्वतः अनेक उमेदवारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आणि उमेदवार प्रचंड फरकाने हरले गेले . ते तेवढ्या फरकाने होऊच शकत नाही. हे निश्चित होते. त्यांनी तेवढाच पैसा आणि इतर गोष्टी मतदारांना दिलेल्या होत्या. अशी असे चित्र समाजात दिसत होते. मग इतका फरक पडला कसा?
महायुतीचे किंवा भारतीय जनता पक्षाचे सरकार आले म्हणून असं नाही तर ही लोकशाहीशी प्रचंड विसंगत अशी असणारी घटना आहे म्हणून ! भारतातल्या लोकशाहीचं अस्तित्व लोकशाहीच्या माध्यमातून नष्ट झाले किंवा होणार आहे की काय अशी चिंता अनेकांना वाटत आहे.
अशा प्रकारचे चरित्र असलेला समाज बनला असेल तर काय ?
दुसरा एक भाग यामध्ये महत्त्वाचा मला फिरताना निदर्शनास आला. एक पत्रकार म्हणून शिरुर सारखे शहरातल्या प्रत्येक वार्डमध्ये मी फिरत असताना त्या ठिकाणी प्रचंड विस्मयकारक दृश्य दृष्टीस पडले. ते असे की मतदारांना मटण पुरवले गेले होते तरी अगदी गरिबातील गरीब आणि अडाण्यातील अडाणी मतदार सुद्धा विचारल्यानंतर सपशेल पणे काहीच नाही मिळाले असे खोटे सांगत होता. मतदारांना पैसे देऊन मतदानास पाठवल्यानंतर देखील गरीब ,मध्यम ,श्रीमंत,शिक्षीत,अडाणी यातील कोणताच मतदार काही पैसे मिळाले नसल्याचे खोटे बोलत होता. पैसे वाटणारी सर्व बाजूच्या पक्षांची यंत्रणा, त्यातील माणसे ही देखील स्पष्टपणे खोटे बोलत होती.इकडुन खोटे बोलुन दुसऱ्या ठिकाणी थांबत.तर नंतर तिसर्या ठिकाणी थांबत होती. पोलीस बंदोबस्त वगैरे होता तरी का कुणास ठाऊक पोलिसांना फार तुरळक अपवाद वगळता काही गैर सापडले नाही. आता अशा प्रकारचे चरित्र असलेला समाज बनला असेल तर काय ? असा प्रश्न निर्माण होतो.
शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघ एक सॅम्पल. ..
आपण पूर्वी समाजातील काही लोकांना भ्रष्ट ,गुन्हेगार, स्वार्थी मतलबी, बेकायदेशीर धंदेवाली, भ्रष्ट अधिकारी, पोलीस वगैरे असं म्हणत असायचो आणि त्याच्यावर टीका करत असायचो. आता सर्व समाज त्या स्वरूपाचा बनलेला आहे .समाजाचे म्हणून एक सामाजिक चारित्र्य असते. त्याचा सर्वात खालचा नीचांक पत्रकार म्हणून फिरताना मला शिरूर शहरासारख्या शहरात जो दिसला तो एक सॅम्पल म्हणून विचारात घेतला तर महाराष्ट्रातील निवडणूक कशी झाली असेल आणि परिणाम जे आहेत ते कशामुळे आलेले असतील? हे समजायला अडचण जात नाही. कारण शिरूर शहर हे अगदी कॉस्मोपॉलिटन सिटी छोटे सिटी आहे .हे महाराष्ट्रातल्या माझ्या वाचकांना मी सांगू इच्छितो या शहरात उत्तरेकडून, दक्षिणेकडून,पूर्वेकडून, पश्चिमेकडून सर्व प्रकारचे लोक ,जाती जमातीतील लोक वेगवेगळ्या कारणास्तव येथेहयेऊन राहिलेले आहेत .त्यामुळे येथील चित्र बरेच काही सांगून शकते. आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात काय घडले असेल याची त्याचा अंदाज यायला हरकत नाही.
भारतातील 90% लोक मूर्ख. ….
आता या ठिकाणी मी कोणताही आरोप करत नाही .तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही. परंतु गेल्यास सहा महिने तरी प्रत्येक गोष्टीकडे पत्रकारिता करत असल्यामुळे लक्ष ठेवत आलेलो होतो.आणि त्याप्रमाणे काही गोष्टी होणे अनपेक्षित होते. त्याच्या मागच्या वेगवेगळ्या कारणांमागचा क्रियाकारणभाव अगदी स्पष्ट आणि पारदर्शक होता. तरी चमत्कार कसा झाला असा अवैज्ञानिक प्रकार कसा झाला याबाबत चिंता वाटावी अशी ही घटना महाराष्ट्र मध्ये घडलेली आहे. आता पक्ष किंवा नेते किंवा त्यांना पुरवठा करणारे उद्योगपती वेगळे असते तरीसुद्धा असा प्रकार घडला असता किंवा जे आता विरोधात आहे ते सत्तेत असते तरी त्यांनी देखील असा प्रकार केला असता असे धाडसाने मी म्हणू शकतो .हकारण सामूहिक चारित्याची झालेली प्रचंड घसरण. माझी न्यायाधीश काटजु यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की भारतातील 90% लोक मूर्ख आहेत. मी 95 ते 98 टक्के लोक मूर्ख असल्याचे अनुभवत होतो. अर्थात बहुसंख्येने मूर्ख असतात तेव्हा शहाणे मुर्ख ठरतात ! आणि हे सर्व जगातच घडत आलेले आहे.
म्हणून जगातले काही लोक सॉक्रेटिस सारखे यांना सत्य सत्य बद्दल प्रचंड खात्री असल्याने त्यांनी ते सोडले नाही आणि नंतर ते जगासमोर आले आणि त्यांचे नाव आजपर्यंत अजरामर राहिले .असे अनेक लोक आहेत. त्यांची नावे राहिलीआहेत .सत्याचा शेवटी विजय होतो.
एवढा मोठा फरक पडु शकत नाही. ….
मी पुन्हा या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघांमध्ये आलेला निकाल जो आहे असेल तो व्यक्तिगत रित्या मी कुणाच्या द्वेशा पोटी किंवा प्रेमापोटी या ठिकाणी लिहीत नाही. तर या मतदारसंघांमध्ये सुद्धा एवढा मोठा फरक पडेल अशी कदापि शक्यता नव्हती . हे मी खात्रीलायक सांगू शकतो .अटीतटीची लढत होऊन 25 ,30 हज़ार च्या मताधिक्याने विजयी उमेदवार निवडून येऊ शकत होता. भले तो कोणी का असेना ! इतकं वर खाली होऊ शकत होते. परंतु माझ्या मतदारसंघामधेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा प्रकार घडलेला असल्याने सगळा महाराष्ट्रात सुन्न झाला. विजयी झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये , समर्थकांमध्ये वावरताना त्यांनाही त्याचे आश्चर्य वाटल्याचे दिसत होते .परंतु कुठल्याही सामूहिक आनंदाच्या प्रसंगी एक प्रकारचा उन्माद निर्माण होत असतो. अशावेळी त्या ‘मूड’मध्ये असलेल्या लोकांना काही शंका घेणारे प्रश्न उपस्थित करायचे नसतात. नाहीतर तो हिंसक शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न विजय साजरा करणाऱ्या लोकांना विचारण्याचा काही प्रश्न येत नाही .
मन स्तब्ध झाले. ….
परंतु जेव्हा बाजूला जाऊन आपण पाहतो. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होत असतात. यावेळेस तर फारच आश्चर्यजनक निकाल दिसल्यामुळे मन स्तब्ध झाले. समाजाची काळजी असणाऱ्या विशेषतः लोकशाही प्रक्रिया जिवंत राहण्याची काळजी ज्यांना आहे. ज्यांना लोकशाही समजते , ज्यांना लोकशाहीत असलेले स्वातंत्र्य समजते आणि लोकशाही नसले तर काय होते याची कल्पना असते. अशा लोकांना हे चित्र पाहिल्यानंतर प्रचंड अस्वस्थ वाटले. विजय पराजय कोणाचाही होऊ द्या. पण तो खरा विजय असावा. खरा वाटला पाहिजे . दिसला पाहिजे. आपोआपच मॅच जिंकली ! अशा प्रकारचा दिसला तर खेळणारे खेळाडू सुद्धा चकित होतात आणि पाहणारे प्रेक्षक सुद्धा चकित होतात आणि मग अंपायर वर बोट करण्याची वेळ येते.
ईव्हीएम वर एवढे प्रेम का?
आणखीन पुढील आठवडाभर या विषयावर माहिती पुढे येईल. त्यानंतर पुन्हा आणखीन आत्मचिंतन करण्याची गरज मला नाही तर समाजाला आहे. याची जाणीव होईल की नाही? शक्यतो होणारही नाही.कारण सामाजिक चरित्र खल्लास झालेले आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जगभरातल्या अनेक देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन द्वारे मतदान करण्याची पद्धत लोकांच्या किंवा काही पक्षांच्या, विरोधकांच्या किंवा काही सामाजिक विचारवंतांच्या मागणी नंतर बंद करण्यात आली. भारतात याबाबत सतत ओरड करणारे अनेक लाखोंच्या संख्येने पक्ष, संघटना,कार्यकर्ते,विचारवंत आहेत . पण त्यांना एका फटक्यात बाजूला केले जाते. असे का होते? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर इतके प्रेम का आहे ? बॅलेट पेपरवर मतदान पुन्हा पुन्हा सुरू करण्याची मागणी वारंवार होऊन सुद्धा त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. हे स्पष्ट आहे.
विरोधकही यात आधी लाभार्थी? ….
पण या पद्धतीचा लाभ सत्ताधारी आणि विरोधकांनाही मिळालेला आहे असे दिसते. मात्र समाजाची प्रचंड मोठी अशी एक फसवणूक यातून होत आहे. याच दुरगामी परिणाम लोकांचा मतदानाचा जो हक्क आहे तोच निकामी होण्यामध्ये होईल. आणि आंधळं दळतयं आणि कुत्र पीठ खातयं’ अशी परिस्थिती निर्माण होईल. ही गंभीर गोष्ट आहे. एकूणच हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे .असे कुठपर्यंत चालणार चालणार आहे? याचे उत्तर आज तरी दिसत नाही !
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com