वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा गैरव्यवहाराची प्रकरणी विशेष चौकशी स्थापन करावी !: आम आदमी पार्टी.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा गैरव्यवहाराची प्रकरणी विशेष चौकशी स्थापन करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परिक्षा नीट गैरव्यवहारातील खलनायक कोण? हे पुढे आले पाहिजे, अशी पालक व नागरिकांची अपेक्षा आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्रता नीट ,परिक्षा दरवर्षी घेतली जाते.त्या परिक्षेतील गुणांवर वैद्यकीय अभ्यासक्रम अलोपथी, आयुर्वेदिक, होम्योपैथी या अभ्यासक्रमांना सरळ सरळ गुणांप्रमाणे प्रवेश दिला जातो.ही प्रक्रिया पारदर्शक असते.त्यामुळे या प्रवेश परिक्षेसाठी विद्यार्थी प्राण पणाला लावतात,असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.पालक या बाबतीत प्रचंड संवेदनशिल असतात.थोडक्यात तरूण पिढीतील शेकडो 12 वी उत्तीर्ण विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार होतात की भंग पावतात ? हे या परिक्षेवर अवलंबून असते. देशातील भावी डॉक्टर ठरणार असतात.
संशयास्पद पद्धतीचे मार्कस्. .
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या या नीट परिक्षचा निकाल यंदा चार जून रोजी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचे निकाल लागले आहेत. परंतु त्याच्यामध्ये अनेक संशयास्पद पद्धतीचे मार्क्रस दिले दिलेले आहेत.असा आक्षेप घेण्यात आला आहे.त्यामुळे या विद्यार्थी जगतात खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार इथे जणु रक्तात वाहत आहे.अशा या निर्ढावलेल्या आजच्या समाजाची स्थिती व व्यवस्था या भ्रष्टाचाराने सडलेली असताना या कोवळ्या वयातील निरागस 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या व्यवस्थेचे अनुभव आणि आकलन न होण्याच्या वयात असे चित्र समोर आले तर अद्याप कुमारवयीन मानसिकता असलेल्या मुलांच्या मनावर काय परिणाम होईल ? ही कल्पना केलेली बरी !
प्रश्न पत्रिका फुटी मुळे आयुष्यावर परिणाम. …
काही वर्षापूर्वी एम पी एस सी,यु.पी.एस.सी.च्या प्रश्न पत्रिकाच फुटू लागल्या होत्या.त्यावेळी मी (संपादक) कायम topper राहणारा असुनही यु पी एस सी च्या दुसऱ्या टप्प्याच्या परिक्षेसाठी बिहारला गेलो नाही. त्यावेळचे माझे रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव असताना मला रेल्वेचे तिकीटही रेल्वेने पाठविण्यात आले होते. तरी गेलो नाही.ते तिकीट आजही मी जपुन ठेवलेले आहे. पण आधीच जिथे जाईल त्या कार्यालयात ,बॅन्केत ,’नाही’नी सुरुवात व्हायची त्यामुळे मी संतापुन अनेक कार्यालयांमधे अधिकार्यांचा उपमर्द करत असे.ती कडवाहट आजही माझ्या शब्दांमधे असते.व्यक्तीमत्वालाच वेगळे वळण मिळाले.पण वाचनाच्या सवयीने वाचवले ! नाही तर मोठा विद्रोह उभा केला असता, असे आजही वाटते ! तर अशा वयातील कित्येक मेडिकल स्टुडन्ट हे डिस्टर्बर व्हायचे. कित्येक विद्यार्थांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. छोटी सी घटना पण सर्व आयुष्यावर परिणाम करणारी ठरते !
वैद्यकीय ‘नीट’ परीक्षा. ..
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या यंदाच्या प्रवेश परिक्षा नीट बाबत आम आदमी पार्टी ने या सर्व प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली विशेष तपास समिती स्थापन करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. तसेच आवश्यकता भासल्यास ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. जेणेकरून विद्यार्थी व पालक यांना न्याय मिळेल. काही शंका राहणार नाहीत.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा पाच मे रोजी 5000 केंद्रांवर साधारणपणे 24 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि यंदा 4 जूनला लोकसभेचे मतमोजणी चालू असण्याच्या दिवशीच याचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जवळपास 67 मुलांना टॉप ठरवण्यात आले असून सर्वांना 720 मार्क दिले गेले आहेत. त्यातील सहा विद्यार्थी एकाच केंद्रातील आहेत. तसेच काही मुलांना ग्रेसमार्क दिले गेले आहेत अशी याबाबतीत नॅशनल टेस्टिंग एजन्सी या परीक्षा घेणाऱ्या संस्थेने स्पष्टीकरण दिले आहे. परंतु लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ज्या परीक्षेवर अवलंबून आहे अशा मुलांतील सुमारे 1500 मुलांना असे ग्रेसमार्क दिले गेले असल्यामुळे इतरांवरती हा अन्याय होणार आहे. या परीक्षेच्या संदर्भात तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात सुद्धा पेपर फुटी, भ्रष्टाचार याचे आरोप महाराष्ट्रात केले गेले आहेत. तलाठी परीक्षा, पोलीस, वनविभाग, आरोग्य, जलसंपदा या सर्वच विभागातील निवडीच्या संदर्भात लाचखोरीचेही आरोप केले गेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये याविषयी तीव्र संताप आहे.
निकाल संशयास्पद? ….
आता या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट परीक्षेमधील निकाल हे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत आणि इतर राज्यातील मुलांना चांगले मार्क दिले गेले असल्यामुळे महाराष्ट्रातील मुलांवरही अन्याय होणार आहे. विविध राज्यांमध्ये या स्पर्धा परीक्षा म्हणजे भ्रष्टाचाराचे ठिकाण ठरत आहेत तर काही ठिकाणी त्याला संघटित गुन्हेगारीचे स्वरूप येताना दिसत आहे. गुजरात, बिहारमध्ये, हरियाणा, मध्यप्रदेश मध्ये या पद्धतीचे प्रकरणे पुढे आलेली आहेत. नीट परीक्षेच्या दरम्यानही बिहारमध्ये पेपर फुटी वरून 13 जणांना तर गुजरात मध्ये तीन जणांना अटक करण्यात आली. परंतु त्या संदर्भात कुठलेही स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही. त्यामुळे या प्रकरणांमध्ये काही लपवण्याचा प्रयत्न होतो आहे अशी शंका घेण्यात जागा आहे.
यामुळेच आम आदमी पार्टीने या संदर्भात न्यायालयाच्या देखरेखी खाली विशेष तपास समितीमार्फत चौकशी आणि गरज पडल्यास पुनर्परीक्षा घेण्याची मागणी केलेली आहे.अशी माहिती श्री.मुकुंद किर्दत, प्रदेश प्रवक्ते, आम आदमी पार्टी यांनी सत्यशोधक न्युज ला दिली आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com