
Missing Girl News : शिरूर येथे १९ वर्षांची तरुणी बेपत्ता !
Missing Girl News Shirur
📅 दिनांक : ८ जुलै २०२५ | प्रतिनिधी |
Missing Girl News : ही बातमी शिरूर शहरातील नागरीकांमध्ये जागरूकता निर्माण करणारी असून Missing Girl News या स्वरूपात तिच्या शोधासाठी सर्वत्र माहिती पसरविणे आवश्यक आहे.
शिरूर शहरात एका तरुणीच्या अचानक बेपत्ता होण्याची गंभीर घटना घडली असून पोलिसांनी ‘Missing Girl News’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता शिरूर बायपासवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ घडली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
🧊 मिसिंग व्यक्तीचा तपशील —
नाव : आरती दत्ताराव शेळके
वय : १९ वर्षे
मूळ गाव : खर्शी, ता. पुसद, जि. यवतमाळ
सध्याचा पत्ता : शिरसगाव काटा, ता. शिरूर, जि. पुणे
दृश्य वर्णन :
केस : काळे व लांब
रंग : गोरा
नाक : सरळ
गळ्यात : लाल धाम्यत रूद्राक्ष
कानात : बेनटेक्सचे फुल
डाव्या पायात : काळा धागा
गुडग्याच्या खाली : काळा जन्मखूण
नाकात : चमकी
कपडे : गुलाबी टॉप, पिवळी लेगिन्स
भाषा : मराठी, हिंदी
शिक्षण : १२वी
🧊 घटनेची हकीकत —
आरती दत्ताराव शेळके ही ६ जुलै रोजी दुपारी ११:३० वाजता कोणालाही काहीही न सांगता शिरूर बायपास येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळून बेपत्ता झाली. तिच्या आई सुनिता दत्ताराव शेळके (वय ४५ वर्षे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ ‘Missing Girl News’ नोंदवली आहे.
🧊 पोलीस तपास सुरू —
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनला मानव मिसिंग नोंद क्रमांक 110/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार : पोहवा मोरे
तपास अधिकारी : सफौ साबळे
शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून विविध ठिकाणी माहिती गोळा केली जात आहे. नागरिकांनी कोणतीही उपयोगी माहिती असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
📞 संपर्क : सुनिता दत्ताराव शेळके – 9529335957
❗ नागरिकांना आवाहन —-
जर कोणालाही आरतीशी संबंधित माहिती मिळाल्यास कृपया तात्काळ शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. ‘Missing Girl News’ अंतर्गत ही माहिती अत्यंत संवेदनशील मानली जात आहे व तिच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ हालचाल आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🔗
https://missingperson.gov.in – भारत सरकारचा हरवलेल्या व्यक्तींचा अधिकृत पोर्टल
https://maharashtrapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
https://satyashodhaknews.com – अधिक बातम्यांसाठी भेट द्या
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून •••••
News Police Action: शिरूर पोलिसांची कारवाई : मंडप डेकोरेटर्स चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश !