

Contents
- 1 Sharad Pawar ,’भटकता आत्मा ‘ हे श्री.नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य आणि श्री.पवारांचा प्रतिहल्ला : एक विश्लेषण!
- 1.1 Modi Vs Pawar : Pawar Replies Modi
Sharad Pawar ,’भटकता आत्मा ‘ हे श्री.नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य आणि श्री.पवारांचा प्रतिहल्ला : एक विश्लेषण!
Modi Vs Pawar : Pawar Replies Modi
Modi Vs Pawar यांना उद्देशुन पंतप्रधान यांनी ,’ भटकता आत्मा’ असे आपल्या भाषणात पुणे येथे म्हटले आहे. या श्री.नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रात विशेषत: इंडिया आघाडीत व श्री.शरद पवार यांना राजकारणातील गुरु,भीष्माचार्य , पितामह मानणार्या अनेकांना खटकले आहे’ .
मोदी शिष्य की गुरु?-Modi Vs Pawar
असे होणे काही आश्चर्याची बाब नाही. स्वत: श्री.नरेंद्र मोदी यांनी ‘ श्री.शरद पवारांचे राजकारण पहातच मी राजकारण शिकलो ‘.म्हणजे श्री.शरद पवार यांना राजकारणातील गुरुस्थानी मानत असल्याचे म्हटले होते. ते राजकारणातील टिपस् श्री.शरद पवार यांच्याकडुन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शिकले आहेत असे ते स्वत: म्हणाले होते . त्यांचे तसे इतरही आणखीन गुरु असु शकतात. निदान त्यांच्या मातृसंघटनेत तरी निश्चीतच ! ही बाब त्यावेळी सर्वांना पटलीही हो ती . राजकारणातील विरोधी पक्षातील लोकांबाबत काही गोष्टी खर्या बोलल्या तर तो राजकारणी आणखीन मोठा होतो हे खरे आहे . पं.नेहरु हे असेच अटलबिहारी वाजपेयी यांच्याबाबतीत बोलले होते.
वाजपेयी आणि कांशीराम. ..
स्वत: अटलबिहारी वाजपेयी कांशीराम व कांशीराम अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाबतीत , ‘ चांगले’ बोलत असते . एकमेकांचे कौतुक करत असत.एकमेकांमधील काही समान बाबी त्यांना आवडत असाव्यात. तसे हे सर्व राजकारण भारतातील आपल्याच देशातील असल्याचे यात शत्रुता असु शकत नाही.असु नये. ती पाकिस्तान किंवा चीनबाबत असु शकते !
Modi Vs Pawar”: Sharad Pawar यांचे उत्तर. …
श्री.शरद पवार यांनी या खोचक टिप्पणीला त्यांना साजेल असेच उत्तर दिले आहे. ‘ होत , मी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भटकत आहे ‘ असे उत्तर दिले आहेत . याठिकाणी आधी काहिसे गुरुस्थानी ज्यांना श्री.नरेंद्र मोदी यांनी मानले ज्यांना , ‘ भटकता आत्मा ‘ म्हणणे जरा शिष्टाचाराला धरुन नाही ,असे मत बरेच जण मान्य करतील . इच्छा अपुर्ण राहिली तर त्या माणसाच्या मृत्युनंतर त्याचा आत्मा भटकतो असे अवैज्ञानिक वगैरे सिद्धांत (?) भारतात लाखोंनी भरलेले आहेत. श्री.नरेंद्र मोदी यांना श्री. शरद पवार पंतप्रधान होण्याची इच्छा खुप इच्छा बाळगुन आहेत.परंतु ती पुर्ण होत नाही. होणारही नाही.अशी टिंगल उडवत आहेत की आता सध्या श्री. शरद पवार अगदी 83 व्या वर्षी देखील राजकारणात सक्रिय आहेत.राज्यभर दौरे करत आहेत . ते मोदींनी करायला भाग पाडले आहेत, असे मोदी यांना सुचवायचे आहे व आपले आव्हान महाराष्ट्रात विरोधी पक्षांसाठी या निवडणूकीत देखील मोठे आहे , असे भासवायचे आहे. त्यातुन त्यांना आपल्या कार्यकर्यांना धीर द्यायचा असेल तर त्यांना त्यांच्या यंत्रणांकडुन काही इनपुट निगेटिव्ह आले असण्याची शक्यता फार मोठी आहेत़ .
‘लाट’ वगैरे नाही म्हणजे नेमके काय?
अर्थातच महाराष्ट्राताच काय पण देशात यावेळी लोकसभेची निवडणूक Normal आहे , असे तज्ञांचे म्हणतात. म्हणजे लाट वा प्रचंड विरोध आहे अशी परिस्थिती नाही . म्हणुन 2019 व 2014 ला लाट निश्चीत होती. मोदींची लोकप्रियता पिक पाईंटला होती. हे कागदावर तरी नक्की होते. पुष्कळ लोक हा ईव्हिएम ता प्रताप
होता असे मानतात. यावेळीही असा प्रताप काही नाटके करुन , वातावरण निर्मिती करुन , पिछाडीवर जातोय असं भासवत शेवटी साधारण का होईना बहुमत घेउन परत सत्तेत राहण्याचे एक मच फिक्सिंग होवू घातलेले असण्याचीही शक्यता आहे, असे वाटते.
EVM एक अनुत्तरीत प्रश्न….
जोपर्यंत इव्हिएम आहे, तोपर्यत ती राहणारच ! कारण भारतीय जनता पक्ष ईव्हीएमसाठी विशेष आग्रही असतो. कुणाचेच ऐकत नाही. सर्वोच्च न्यायालय देखील ईव्हीएमच्या बाजुने निर्णय देतो (?) . जरी जगातील जवळजवळ सर्वांनी या पद्धतीचे मतदान करण्याची पद्धत बंद केली आहे. त्यावर शंका उपस्थित केल्यानंतर ते बंद करून ballet पेपरवर मतदान करण्याची पद्धत पुन्हा सुरु केली .श्री.नरेंद्र मोदीच काय पण इतर कोनत्या पक्षाकडे असे (?) हुकुमी निवडणूका जिंकण्याचे हत्यार असते तर ते त्याने रगीलपणे बंद करण्याचे अमान्यच केले असते.बळी तो कानपिळी ! यात महत्वाचा मुद्दा आपण मतदार खरोखरच लोकशाहीसाठी पात्र आहोत का ? हा आहे ! कारण आपण लक्षात ठेवत नाही. प्रश्न विचारत नाही.
Modi Vs Pawar : Sharad Pawar यांचा उलटा डाव ?
श्री.शरद पवार यांनी श्री.नरेंद्र मोदी यांच्यावर उलट डाव टाकला आहे . तो असा की देशातील लोकशाहीच धोक्यात आहे . मोदी हे हुकुमशाहीकडे नेण्याचा धोका आले , असे म्हटले आल. श्री.शरद पवार हे राजकारणातील सध्या सर्वात बुजुर्ग नेते आहोत . मोठा अनुभव आहे. केंद्रातील अनेक महत्वाच्या खात्यांवर काम केलेले नेते आहेत. पंतप्रधानपदासाठीही योग्य आहेत. यात कोणी शंका घेणार नाही. फक्त त्यांचे वय व आजार याबाबत साशंक असु शकतील. पण श्री.शरद पवार याची इच्छाशक्ती अगदी 92 वयापर्यंतची (?) आहे. हे त्यांनी स्वत: सागितले आहे .
विधान महागात पडेल?
त्यामुळे श्री.नरेंद्र मोदी यांच्या ,’ आत्मा भटकण्याच्या ‘ बाबतीतील भाषा व परिभाषा कोलमडुन पडु शकते. उत्तर प्रदेशात हत्तीला दिलेलं मत कमळाला गेलं आहे , अशी बातमी आहे. आणि हे सार्वत्रिक होणार असेल तर श्री.शरद पवार यांनी लोकशाही धोक्यात असणे व हुकुमशाहीच्या धोक्याबाबत केलेले वक्तव्य समाजाला ,मतदारांना विचार करायला लावणारे ठरणार आहे. मोदी पदावर असतील नसतील , पण अशा पद्धतीने लोकांची मते कचरामोल ठरली तर ते देशालाच घातक ठरतील यात शंका नाही. देश 1947 पुर्वीच्या भारताकडे परत जाईल.
आणि नेहरू, गांधी, पटेल, आंबेडकर पुन्हा काही जन्माला येत नसतात. त्यांनी 1947 ला या देशाच्या सर्व गुण व अवगुण यांचा अभ्यास करुन समझदारीने सहमती करुन हा नविन भारत निर्माण केला होता.
पवार यांनी दिले केजरीवाल यांचे उदाहरण. …
श्री.शरद पवार यांनी या मुद्यावर देखील बोट ठेवले आहे की विरोधक व विरोधी विचार जरी चांगले व रचनात्मक सकारात्मक काम करणारे असतील तरी त्यांना सत्ता मिळवण्यातील अडथळा म्हणून कागदपत्रे रंगवून, कायद्यात बसवून जेलमधे बसवणे हे देखील धोकादायकच आहे असे मत हे केजरीवाल यांचे उदाहरण देवुन व्यक्त केले. ते ही गंभीर आहे.त्यांनी हे ही श्री.नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आणून दिले आहे की देशातील 100 पैकी 87 लोकांना नोकरी नाही. ही बाब देशाच्या हिताची नाही.असे सांगितले. ‘सत्ता लोकांचे कल्याण आणि उज्वल भविष्य घडविण्यासाठी असते’. याचीही जाणीव करुन दिली.
श्री.शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पुर्ण महाराष्ट्रभर फिरणार आणि तो माझा हक्क आहेत , असे श्री. नरेंद्र मोदी यांना ठणकावुन सांगितले आहे. मात्र श्री.नरेंद्र मोदी यांना अशा वक्तव्याने हा विषय मोदी विरुद्ध पवार आणि पुढे मोदी विरुद्ध महाराष्ट्र झाला तर परवडेल का ? हा एक महत्वाचा मुद्दा आहे !
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
✅ 1. https://eci.gov.in/ – भारत निवडणूक आयोग
2. https://prsindia.org/ – संसद कार्य आणि कायद्यासंबंधित माहिती
3. https://www.india.gov.in/ – भारत सरकारचा अधिकृत पोर्टल
4. https://factchecker.in/ – राजकीय वक्तव्यांची पडताळणी करणारे संकेतस्थळ
5. https://www.altnews.in/ – फेक न्यूज आणि चुकीची माहिती उघड करणारे पोर्टल
6. https://loksabha.nic.in/ – लोकसभेचे अधिकृत संकेतस्थळ
7. https://www.boomlive.in/ – राजकीय व सामाजिक तथ्य तपासणी
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून ••••
श्री.शरद पवार बनणार KINGMAKER ?