Contents 1. 🗞️ ब्रेकिंग न्यूज : लोकशाही क्रांती आघाडीचा नगर परिषद निवडणुक न लढण्याचा निर्णय1.1. शिरूर ,दिनांक ६ नोव्हेंबर २०२५| प्रतिनिधी |1.1.1. 🔹 एकमताने घेतला निर्णय1.1.2. 🔹 पार्श्वभूमी व राजकीय संदर्भ1.1.3. Read more >>>>>> 1.1.4. About The Author1.1.4.1. Dr.Nitin Pawar🗞️ ब्रेकिंग न्यूज : लोकशाही क्रांती आघाडीचा नगर परिषद निवडणुक न लढण्याचा निर्णयशिरूर ,दिनांक ६ नोव्हेंबर २०२५| प्रतिनिधी |” शिरूर नगर परिषद निवडणूक 2025 साठी लोकशाही क्रांती आघाडीने पॅनल न उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष रवींद्र धनक यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.”शिरूर — येत्या शिरूर नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये लोकशाही क्रांती आघाडी पॅनल उभे करणार नसल्याची महत्वाची घोषणा आज करण्यात आली. हा निर्णय आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी जाहीर केला असून स्थानिक राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.शिरूर नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबर 2025 मध्ये होत आहे. विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून तयारीला वेग आला आहे. मागील निवडणुकीत लोकशाही क्रांती आघाडीने मोठ्या ताकदीने स्पर्धा करत एक नगरसेवक निवडून आणला होता. त्यामुळे यंदा देखील पक्ष निवडणूक लढवणार का, या चर्चेला उधाण आले होते.🔹 एकमताने घेतला निर्णयदिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी लोकशाही क्रांती आघाडीच्या संस्थापक सदस्य आणि कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत “आगामी निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असावी” या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीचा विचार करून शिरूर नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये आघाडी पॅनल उभे करणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.या महत्वाच्या बैठकीला रवींद्र धनक, अँड. ओमप्रकाश सतेजा, किसनराव जाधव, माजी नगरसेवक मंगेश खंडरे, मोहम्मद हुसेन पटेल, अँड. सतीश गवारी, संजय बांडे, आणि अँड. विक्रम पाटील उपस्थित होते.🔹 पार्श्वभूमी व राजकीय संदर्भमागील काही वर्षांत लोकशाही क्रांती आघाडीने शिरूर तालुक्यात सामाजिक आणि राजकीय पातळीवर अनेक जनहित उपक्रम राबवले आहेत. तथापि, सध्याच्या राजकीय समीकरणांचा आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे आघाडीच्या सूत्रांनी सांगितले.राजकीय निरीक्षकांच्या मते, हा निर्णय आगामी शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या समीकरणांवर प्रभाव टाकू शकतो. काही गट आता इतर राजकीय पक्षांशी आघाडी करण्याचा प्रयत्न करू शकतात.शिरुर शहर नगरपालिका राजकारणातला हा आजचा ,’ जोर का झटका’ आहे.मात्र हा धक्का कोणी आणि कोणाला दिला?हे पुढच्या काही दिवसात दिसेल.लोकशाही क्रांती आघाडी ही गेल्या अनेक वर्षांपासून विशेषत: शिरुर शहराच्या राजकारणात महत्त्वाची व विरोधकाची भूमिका पार पाडत होती.या निर्णयानंतर काही नवीन समीकरणे उभी राहतील अशी शक्यता आहे.तालुक्याचे आमदार बदललेले आहेत. नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव गेलेले आहे.स्व.बाबुरावजी पाचर्णे यांच्यासारखे नेते आज हयात नाहीत.दोन राष्ट्रवादी पक्ष,दोन शिवसेना पक्ष हे नवे घटक आज अस्तित्वात आहेत.कार्यकर्ते विभागले गेले आहेत.भारतीय जनता पक्ष सर्वच ठिकाणी आक्रमक भुमिकेत आहे.शिरुर नगरपालिका ताब्यात घेण्याचा माणस भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील पक्षसंघटनेचा जोरदार प्रयत्न आहे.‘अमाप पैसा’ हे साधन याही निवडणुकीत वापरले जाणार आहेच.तेच नगरपालिका निवडणुकीत आजवर प्रभावी ठरत आले आहे.हे साधन सत्ताधारी आघाडीकडे आहेच.तरी न वी तरुण पिढी संख्येने मोठी आहे.ती इच्छुकही आहे.पण सुमार राजकीय परिपक्वता असणे,शिक्षणाचे प्रमाण कमी असणे,बेरोजगार असणे,दिशाहिन असणे हे ही एक वास्तव आहे.‘सत्यशोधक ब्लॉग ‘ यावर सतत विश्लेषण करुन समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करत राहतातच आहे तुर्त एवढेच !🌐 अधिक माहितीसाठी Links (विश्वसनीय संदर्भासाठी):https://ceo.maharashtra.gov.in — महाराष्ट्र निवडणूक आयोगhttps://www.maharashtra.gov.in — महाराष्ट्र शासनhttps://www.loksatta.com — ताज्या राजकीय बातम्याhttps://www.satyashodhak.blog — सत्यशोधक न्यूजRead more >>>>>> शिरूर शहर विकास आराखडा 2025 : अज्ञात बुद्धिजीवी लेखकाचे १३ दूरदर्शी प्रस्तावशिरुर नगरपालिका निवडणूक 2025 : जनतेचा विश्वास मिळवणारे उमेदवार? — हुसेन शहीद शाह“शिरूर नगरपालिका निवडणूक 2025 : ‘खड्डेमुक्त रस्ते झाले का?’”About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनमहाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका 2025 : तुमचं एक मत अमूल्य आहे, मतदान करा जबाबदारीनं! : निती आयोग सदस्य डॉ. माणिक भडंगे यांचे आवाहन शिरुर नगरपालिका निवडणूक 2025: ‘धडाकेबाज’ उमेश कैलास शेंळके प्रभाग 12 मधुन तयारीत !