Contents1 माऊली आबा कटके यांच्यावर शिरूरची तरुणाई फिदा तरुण कार्यकर्त्यांनी आबांना खांद्यावर घेत काढली मिरवणूक ! (पहा व्हिडीओसह)1.1 आबा कटके यांच्यासाठी तरुण जोरदार तयारीत !1.1.1 शिरूर, दिनांक 16 नोव्हेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडून)1.1.2 About The Author1.1.2.1 Dr.Nitin Pawar1.1.3 ❤️ Support Satyashodhak Blog माऊली आबा कटके यांच्यावर शिरूरची तरुणाई फिदा तरुण कार्यकर्त्यांनी आबांना खांद्यावर घेत काढली मिरवणूक ! (पहा व्हिडीओसह) आबा कटके यांच्यासाठी तरुण जोरदार तयारीत ! शिरूर, दिनांक 16 नोव्हेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडून) https://satyashodhaknews.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241116-WA0295.mp4 माऊली आबा कटके यांच्यावर शिरूरची तरुणाई फिदा दिसत आहे. तरुण कार्यकर्त्यांनी आबांना खांद्यावर घेत मिरवणूक काढली आहे.एकंदरीत माऊली आबा कटके यांच्यासाठी तरुण जोरदार तयारीत असल्याचे चित्र आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये माऊली आबा कटके यांच्यावर शिरूर मधील तरुणाई अक्षरशा फिदा होऊन त्यांना खांद्यावर घेऊन जात असतानाचे दृश्य शिरूर शहराने आज पाहिले. या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन मतदार होता आणि शिरूर शहरातील भारतीय जनता पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा, शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षांचे तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होतें. आणि माऊली आबा कटके यांचे स्वतःचे असलेले तरुण असे व्यक्तिमत्व तरुणांना भावताना दिसत आहे.माऊली आबा कटके हे तरुणांशी संवाद यशस्वी होत आहेत.त तर तरुण त्यांच्याकडे नवीन शिरुर हवेली साठी लोकप्रतिनिधी म्हणून पाहताना दिसत आहेत. शिरूर शहरांमधील या तरुणांनी माऊली आबा कटके यांना निवडून आणण्यासाठी जोरदार कंबर कसल्या चित्र शहरात आज मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. महाआघाडीचे उमेदवार श्री. अशोक बापू पवार आणि महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांच्यातली ही महाराष्ट्रातील सर्वात लक्ष वेधक लढत शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे लक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाहीस तर देशामध्ये खेचून घेत आहे. यामध्ये श्री.अजितदादा पवार आणि श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रतिष्ठेची ही लढत मानली जात असल्यामुळे प्रचंड उत्सुकता या लढतीबाबत देशभर आहे. अशा परिस्थितीमध्ये शिरूर शहरातील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत सुरू केलेली आहे.त्याचाच एक आविष्कार आज या ठिकाणी आपल्याला दिसला . त्यामुळे शिरूर शहरांमध्ये एक जोरदार शक्ती प्रदर्शन या निमित्ताने महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांच्याकडून झालेले आहे. त्याचबरोबर तरुणांमध्ये असलेली माऊली कटके यांच्याबाबतची ‘क्रेझ ‘ स्पष्ट दिसत आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये तुंबळ अशी लढत सुरू आहे. दर दिवसांनी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जोर लावला जात आहे. त्यामुळे आता 20 तारखेला असलेले मतदान आणि त्यानंतर 23 तारखेला असलेला मतदानाचा निकाल याबाबत प्रचंड असे ककुतुहल निर्माण झाले आहे. या तरुणांमधे प्रामुख्याने सुनिलदादा जाधव मित्र परिवार, आकाश चौरे, सिद्धांत चव्हाण,कुणाल कर्डिले,निखील चोरडिया, महेद्र येवले, स्वप्नील रेड्डी,सुमित ‘रेड्डी,कृष्णा जोशी,शुभम क्षिरसागर,कुणाल जगदने इ.तरुण कार्यकर्ते सहभागी होते. About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ : माऊली आबा कटके यांनी शिरूरकरांची मने जिंकली ! तर वडगाव रासाईत शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक ! नाभिक समाजाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश वाळुंजकर यांच्या हस्ते ‘द बेस्ट’सलोन चे उद्धाटन !