Contents 1. हातभट्टीची दारु बनवत होते ! शिरुर पोलिसांची पडली धाड !1.1. हातभट्टीची बेकायदा दारु बनवताना न्हावरा येथे दोघांना अटक!1.1.1. शिरुर,दिनांक 9ऑक्टोंबर: (प्रकाश करडे यांच्याकडुन) 1.1.2. गोपनीय सुत्रांकडुन मिळाली माहिती…1.1.3. श्री.हनुमंतराव गिरी यांनी रचला सापळा…1.1.4. 56,250 रुपये किंमतीची दारु ?….1.1.5. न्हावर्याजवळच्या पवार वस्ती येथे धाड. …1.1.6. महिला पोलिसांचाही सहभाग. ….1.1.7. About The Author1.1.7.1. Dr.Nitin Pawarहातभट्टीची दारु बनवत होते ! शिरुर पोलिसांची पडली धाड !हातभट्टीची बेकायदा दारु बनवताना न्हावरा येथे दोघांना अटक!शिरुर,दिनांक 9ऑक्टोंबर: (प्रकाश करडे यांच्याकडुन) हातभट्टीची दारु बनवत होते पण पोलिसांची धाड पडली आणि हातभट्टीची बेकायदा दारु बनवताना न्हावरा येथे दोघांना अटक करण्यात आली आहे.शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत. या मालाची किंमत 56,250 रुपये इतकी आहे.गोपनीय सुत्रांकडुन मिळाली माहिती…शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस अंमलदार श्री. विजय शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली ! त्यानंतर त्यांनी पवार वस्ती, न्हावरे,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे या गावच्या हद्दीत छबू संभाजी पवार यांच्या घराच्या पाठीमागे तो व त्याचा भाऊ हे राहणार पवार वस्ती, न्हावरा, तालुका- शिरूर,जिल्हा- पुणे हे बिगर परवाना हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन ढवळत होते. अशी खात्रीशीर माहिती शिंदे यांना मिळाली. त्यांनी ती माहिती पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी यांना श्री. केंजळे यांनी पुढील आदेश दिले.श्री.हनुमंतराव गिरी यांनी रचला सापळा…त्यानुसार श्री.गिरी यांनी व इतर पोलिसांनी सापळा रचला. या बेकायदेशीर हातभट्टीची दारू बनवणाऱ्या दोघांवर धाड टाकत त्यांना अटक केली आहे. त्याप्रसंगी त्या ठिकाणी हे दोघे भाऊ हातभट्टी दारू बनवण्याचे रसायन ढवळत होते. यावेळेस त्या ठिकाणी एक मोठे बॅरल व त्याच्या आजूबाजूला निळ्या रंगाचे बॅरल आणि त्याच्या आजूबाजूला पडलेले दिसले. एक लोखंडी भोपळा बॅरल असल्याचेही त्या ठिकाणी सापडला आहे. पोलिसांची चाहूल लागताच ते कावरेबावरे होऊन जवळच्या शेतात उसाच्या शेतामध्ये पळायला लागले. तेव्हा त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडले. त्यानंतर त्यांची ओळख पटली. ते वरील दोघेजण होते.56,250 रुपये किंमतीची दारु ?….कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणी नवसागर, बिबे, झाडाची साल यांचे मिश्रण करून हातभट्टीची दारू तयार करण्याचे रसायन 7 प्लास्टिकचे 200 लिटर पाण्याच्या मापाचे बॅरल त्यामध्ये 1400 लिटर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे रसायन, एक लोखंडी 1000 लिटर मापाचा बॅरल त्याच्यामध्ये 1000 लिटर मापाची हातभट्टी दारू तयार करण्याच्या रसायन, पाच मन लाकडी सरपंच असा एकूण 2400 लिटर हातभट्टी ची दारू तयार करण्याची रसायन सापडले आहे.हा 56 हजार 250 रुपयांचा माल सापडला आहे.न्हावर्याजवळच्या पवार वस्ती येथे धाड. …शिरूर पोलीस स्टेशन येथे विजय गजानन शिंदे, पोलीस शिपाई यांनी तक्रार दिली असून छबू संभाजी पवार व त्याचा भाऊ काँग्रेस संभाजी पवार,पवार वस्ती,न्हावरे,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांच्याविरुद्ध 2400 लिटर बेकायदा विनापरवाना विषारी हातभट्टीची दारू करण्याचे रसायन रुपये 56 हजार 250 किमतीचे ताब्यात घेण्यात आले आहे व त्यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महिला पोलिसांचाही सहभाग. ….या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अप्पर निरीक्षक श्री. सागर शेळके हे करत आहेत. या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हनुमंतराव गिरी पोलीस उपनिरीक्षक श्री. सागर शेळके श्री. शुभम चव्हाण, पोलीस हवालदार, नारायण जाधव, पोलीस शिपाई , नितेश थोरात नीरज पिसाळ, निखिल रावडे, अशोक सितारे, राजाराम गायकवाड, महिला चैत्राली सपकाळ, गोदावरी धंदरे या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनशिरुर तालुक्यात, “तुझा मुलगा जरी वकील असला तरी माझा जावई आत्ताच ‘मर्डर’ च्या गुन्हयामधुन जेलमधुन बाहेर आला आहे.” असे वक्तृव्य ! काय प्रकरण आहे ते वाचा ! गंठण हिसकावून नेले : तिघे चोरटे फरार !