Nimone Assault Case मधे शिरूर तालुक्यातील निमोणे येथील दुर्गे वस्ती परिसरात गायीच्या वादातून 20 वर्षीय तरुणावर बांबू व उसाने मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. शिरूर, प्रतिनिधी, दिनांक 25 जुन 2026Contents1. Nimone Assault Case : फिर्यादीने काय म्हटले?1.1. बांबू व उसाने मारहाण केल्याचा आरोप2. Nimone Assault Case : जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप3. शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल3.1. पोलिसांचा पुढील तपास सुरू3.2. आणखीन ‘शिरुर क्राईम बातम्या’ वाचा…3.3. अधिक माहितीसाठी भेट द्या खालील सन्केतस्थळाना—-3.4. About The Author3.4.1. Dr.Nitin PawarNimone Assault Case : फिर्यादीने काय म्हटले?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण उत्तम बहिरट,वय- 20 वर्ष , व्यवसाय – शेती, राहणार – दुर्गे वस्ती, निमोणे, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे यांनी याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार, 20 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास तुषार एकनाथ दोरगे आणि भरत एकनाथ दोरगे (दोघे राहणार – दुर्गे वस्ती, निमोणे) हे फिर्यादीच्या घरासमोर आले. “तू माझी गाय का सोडली?” असा जाब विचारत त्यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे.बांबू व उसाने मारहाण केल्याचा आरोपफिर्यादीच्या म्हणण्यानुसार, तुषार दोरगे याने शेजारी पडलेल्या बांबूने, तर भरत दोरगे याने उसाने फिर्यादीच्या पाठीवर, पायावर आणि डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.Nimone Assault Case : जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपफिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, मारहाणीनंतर तुषार दोरगे याने मोबाईलवर संदेश पाठवून “तुझे तुकडे तुकडे करीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने संबंधित दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.शिरूर पोलिसांत गुन्हा दाखलया Nimone Assault Case प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 585/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 352, 351(2), 351(3), 351(4) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांचा पुढील तपास सुरूगुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हवालदार गर्कळ यांनी पूर्ण केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत. या Nimone Assault Case मधील सर्व बाबींचा तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.टीप : सदर वृत्त हे फिर्यादीने दिलेल्या तक्रार आणि पोलिसांकडून उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार तयार करण्यात आले आहे. आरोपींविरुद्धचे आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.आणखीन ‘शिरुर क्राईम बातम्या’ वाचा…Shirur Crime News: न्हावरे गावात शेतजमिनीच्या वादातून देशमुख कुटुंबीयावर हल्ला – 4 जणांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलShirur Crime News : गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी दोन प्रकरणे दाखल, एक महिला आरोपी!Shirur Crime News : एस.टी. आगारात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !अधिक माहितीसाठी भेट द्या खालील सन्केतस्थळाना—-भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita – BNS) https://www.indiacode.nic.inमहाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) https://www.mahapolice.gov.inराष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (National Crime Records Bureau – NCRB) https://www.ncrb.gov.inAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनRanjangaon Job Fraud Allegation: नोकरीच्या आमिषाने फसवणूक? 10 दिवस, 12 तास काम, डिपोझिटही घेतले, मात्र पगार नाही, तर कुलूप बंद? पिडीताची पोलिस तक्रारीची तयारी? Shirur Weekly Market Police Patrol: आठवडे बाजारात विशेष पेट्रोलिंग; वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई