Contents 1. रामलिंग रोड (हत्ती रोड) वर घरफोडी; आरोपी अटकेत, ₹2.60 लाखांपैकी ₹1.14 लाखांचा मुद्देमाल जप्त1.0.1. Read More >>>>1.0.2. About The Author1.0.2.1. Dr.Nitin Pawarरामलिंग रोड (हत्ती रोड) वर घरफोडी; आरोपी अटकेत, ₹2.60 लाखांपैकी ₹1.14 लाखांचा मुद्देमाल जप्तशिरूर (जि. पुणे), 20 नोव्हेंबर 2025 :|प्रतिनिधी|रामलिंग हत्ती रोड, जाधव मळा, शिरूर ग्रामीण येथे घडलेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील लॉकरमधील सोन्या–चांदीचे दागिने तसेच इतर मिळून सुमारे ₹2 लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरीला नेल्याची फिर्याद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 829/2025 प्रमाणे भा.दं.वि. कलम 311, 313, 314, 135 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.घटनेनंतर पोलीस निरीक्षक संदेश केंद्रे यांनी तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पथकाला निर्देश दिले. तपास पथकाने घटनास्थळी तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच आयकर युनिट पुणे ग्रामीणचे कनिष्ठ तांत्रिक तज्ञ संदीप शिर्के यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून शोधमोहीम राबवली. तपासात प्रकाश विलास गायकवाड (रा. रामलिंग रोड, शिरूर) हाच घरफोडीचा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.आरोपी परिसरात असल्याची खात्री झाल्यानंतर उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पुढील तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून ₹1,14,900 किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंहगिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, आयकर युनिटचे संदीप शिर्के, तसेच पोलीस अंमलदार नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, निखिल रावडे, अंबादास थोरे, नीरज पिसाळ, अजय पाटील आदींचा समावेश होता.Read More >>>>न्हावरे शेतातून मोटारसायकल चोरी : अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलिसात गुन्हा दाखलशिरूर : हॉर्न वाजवण्यावरून तिघांकडून व्यावसायिकास मारहाण, जीव घेण्याची धमकी!कारेगाव चौकात भीषण अपघात : किया कारने सात जणांना चिरडलेAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनशिरूर शहरातून 19 वर्षीय मुलगी बेपत्ता — शिरूर पोलीसांनी तपास सुरू ! ‘घुंगरू’ वाजणार ! इशक्याचा नाद खुळा “: शिरुर पंचक्रोशीत 24 डिसेंबर पासुन शूटिंग!