Advertisement Shirur Drunk Driving Case मधे दारूच्या नशेत टँकर चालवत सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी एका चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर बातमी वाचा… Contents1 Shirur Drunk Driving Case मधे आरोपी निलेश गजानन इंगळे2 Shirur Drunk Driving Case : माहिती मिळाली ‘112’ वरुन!3 टँकर वेड्यावाकड्या पद्धतीने चालवत होता !4 तोंडातून मद्याचा उग्र वास येत होता5 मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा दाखल6 पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत6.1 आणखीन बातम्या वाचा….6.2 Free अधिक Links :6.3 About The Author6.3.1 Dr.Nitin Pawar6.4 ❤️ Support Satyashodhak Blog Shirur Drunk Driving Case मधे आरोपी निलेश गजानन इंगळे दिनांक 8 जुलै 2026 : (शहाशाबान शेख यांच्याकडून) या प्रकरणातील आरोपी हा निलेश गजानन इंगळे,वय- 43, राहणार- नवजीवन कॉलनी, हडको, घर क्रमांक. 11, संभाजीनगर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. Shirur Drunk Driving Case : माहिती मिळाली ‘112’ वरुन! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11.55 वाजता पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील हॉटेल आर. के. समोर डायल 112 वर काल प्राप्त झाला. टँकर वेड्यावाकड्या पद्धतीने चालवत होता ! कॉलच्या अनुषंगाने पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी संबंधित आरोपी त्याच्या ताब्यातील MH 17 BY 3031 क्रमांकाचा टँकर वेड्यावाकड्या पद्धतीने चालवत असल्याचे निदर्शनास आले. तोंडातून मद्याचा उग्र वास येत होता पोलिस अंमलदार विनोद रामनाथ काळे यांनी चालकाची चौकशी केली असता त्याच्या तोंडातून मद्याचा उग्र वास येत असल्याचा संशय आला. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा दाखल तपासणीदरम्यान डॉक्टरांनी आरोपीने मद्यप्राशन केल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात कोणताही माल किंवा शस्त्र जप्त करण्यात आलेले नाही. तसेच आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत या गुन्ह्याची नोंद गुन्हा रजिस्टर क्रमांक 622/2026 अशी करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार वाघमोडे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हवालदार वाडेकर यांनी पूर्ण केली. आणखीन बातम्या वाचा…. Shirur Crime News : गावठी हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी दोन प्रकरणे दाखल, एक महिला आरोपी! शिरुर पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल | Shirur Crime 769/2025 Shirur Crime: गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे शिक्षक मारहाण प्रकरण; आदर्श शाळेवर अन्यायाचा काळा डाग? Free अधिक Links : Ministry of Road Transport & Highways (MoRTH) – मोटार वाहन कायद्याची अधिकृत माहिती. Parivahan Sewa Portal – वाहन व वाहतूक सेवांबाबत अधिकृत पोर्टल. Maharashtra Police – महाराष्ट्र पोलिसांची अधिकृत वेबसाइट. Pune Rural Police – पुणे ग्रामीण पोलिसांची अधिकृत माहिती. Section 185 – Motor Vehicles Act, 1988 (Reference) – दारू पिऊन वाहन चालवण्यासंबंधी कायदेशीर तरतूद. सत्यशोधक न्यूजवर जाहिरात करून शिरूर व परिसरातील हजारो वाचकांपर्यंत तुमचा व्यवसाय, सेवा किंवा ब्रँड प्रभावीपणे पोहोचवा. About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Crime Amdabad Tranformer Theft : आमदाबाद मधे चोरीची घटना !