IMG 20250923 175306

शिरूर तालुक्यातील गावात घरफोडी !

शिरूर तालुक्यात चिंचणी गावात घरफोडी !

” शिरूर तालुक्यातील चिंचणी गावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 48 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.”

शिरूर ,दिनांक २३ सप्टेंबर २०२५ | प्रतिनिधी|

शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथे 21 सप्टेंबर 2025 च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ₹48,000 किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी गौरव बापु पवार (वय 28, रा. चिंचणी, व्यवसाय शेती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5 या वेळेत पवार यांच्या राहत्या घराच्या किचनलगतच्या खोलीचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्या ठिकाणी ठेवलेले दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत ₹45,000) आणि पाच भार वजनाचे चांदीचे पैजण ( ₹3,000किंमत) असा एकूण ₹48,000 किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 673/2025, भारतीय न्याय संहिता कलम 305, 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास पो.हवा. टेंगले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पुढील तपास प्रभारी अधिकारी पो.नि. केंजळे यांच्या देखरेखीखाली चालू आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••• 

1. Maharashtra Police – Official Website

2. Pune District Official Website

3. Crime in India – NCRB Reports

‘सत्यशोधक’ च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करुन••••

हवालदार मिलिंद देवरे यांची धडाकेबाज तत्परता : हरवलेली चिमुरडी सुखरूप पालकांच्या स्वाधीन

इनामगावात वृद्ध महिलेवर हल्ला; रोख २३,४०० रुपयांची चोरी!

शिरूर : शिरसगाव काटा येथे घरफोडीची घटना – सोन्याचे दागिने चोरीला, 2.20 लाखांचा ऐवज लंपास!

About The Author

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support