IMG 20251030 WA0015

🚨शिरूरमध्ये पोस्ट ऑफिससमोरून मोटारसायकल चोरी!

शिरुर,३० ऑक्टोबर २०२५|प्रतिनिधी |

” शिरूरमधील पोस्ट ऑफिससमोरून हिरो एच.एफ. डिलक्स मोटारसायकल चोरी. फिर्यादी हनुमंत मडगुले यांची तक्रार शिरूर पोलिसांकडे दाखल. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. 772/2025 अंतर्गत तपास सुरू केला आहे.”

शिरूर | दिनांक – 29 ऑक्टोबर 2025 

गुन्हा रजि. नं. 772/2025 | भारतीय न्यास संहिता कलम 303(2)

शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा वाहन चोरीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी हनुमंत सखाराम मडगुले (वय 34, रा. टाकळी मिमा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटारसायकल (क्र. MH12HQ4479) ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

ही घटना ता. 28 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 01:30 ते सायंकाळी 04:36 वाजेच्या दरम्यान मौजे शिरूर गावच्या हद्दीत पोस्ट ऑफिस शिरूरसमोर घडली. मोटारसायकल शिरूरच्या मुख्य रस्त्यालगत उभी असताना ती अचानक गायब झाल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले.

चोरट्याने अप्रामाणिकपणे व लबाडीच्या इराद्याने ही चोरी केल्याचा संशय पोलिसांनी नोंदवला आहे. गहाळ झालेल्या वाहनाची किंमत अंदाजे ₹30,000 असल्याचे फिर्यादींनी नमूद केले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 772/2025 नोंदवला असून तपास पोलीस हवालदार बनकर  हे करीत आहेत.
दाखल अंमल पो.ह. कोथळकर यांनी केली असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे (शिरूर पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

फिर्यादी हनुमंत मडगुले यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, “जर कोणाला माझी मोटारसायकल क्रमांक MH12HQ4479 दिसली, तर कृपया जवळच्या पोलिस ठाण्याशी किंवा मला (मो. 9723873338) संपर्क साधावा.”


🔍 तपास सुरू

शिरूर परिसरात अलिकडच्या काळात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा देत वाहनावर लॉक, GPS आणि CCTV तपासणीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


🔗 अधिक माहितीसाठी  Free Links:

About The Author