Contents1 वंचितांच्या राजकीय चळवळीच्या संघर्षाचा दस्तऐवज वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन – ज. वि. पवार1.0.1 About The Author1.0.1.1 Dr.Nitin Pawar1.0.2 ❤️ Support Satyashodhak Blog वंचितांच्या राजकीय चळवळीच्या संघर्षाचा दस्तऐवज वंचितांचे राजकारण : एक मुक्त चिंतन – ज. वि. पवार कोल्हापूर दि.२५ ऑक्टोबर २०२५|प्रतिनिधी | वंचितांच्या राजकीय चळवळीच्या संघर्षाचा दस्तऐवज : श्री.ज.वि.पवार व लेखक सिद्धार्थ कांबळे! कांबळे यांनी निवडलेला कालखंड मोठा आहे.गुंतागुंतीचा आणि वंचितांचे स्वायत्त राजकारण नेस्तनाबूत करणाऱ्या प्रवृत्तीचा.या विषयाला हात घालण्याचे धैर्य कांबळे यांनी केले आहे. हे पुस्तक म्हणजे वंचितांच्या राजकीय चळवळीचा दस्तऐवज आहे,असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांनी केले. वंचितांच्या राजकीय चळवळीच्या संघर्षाचा दस्तऐवज:श्री.ज.वि.पवार व माजी सीमाशुल्क अधिकारी श्री.मदन पवार ते सिद्धार्थ कांबळे लिखित वंचितांचे राजकारण एक मुक्त चिंतन या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.शाहू स्मारक येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रा.गौतमीपुत्र कांबळे,ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे,प्रा.डॉ. रणधीर शिंदे,प्रा.जी.बी.अंबपकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सीमाशुल्क अधिकारी मदन पवार होते.तर डॉ.आलोक जत्राटकर,प्रा.डॉ.अमर कांबळे, बार्टी चे संशोधन अधिकारी प्रा.डॉ.संभाजी बिरांजे, वंचित आघाडीच्या डॉ.क्रांती सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘वंचितांच्या राजकीय चळवळीच्या संघर्षाचा दस्त ऐवज वंचितांचे राजकारण’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा,कोल्हापुर साहित्यिक पवार पुढे म्हणाले,पुस्तकाविषयी मी या पेक्षा अधिक काही बोलणार नाही कारण मी बोललो तर तुम्ही वाचणार नाही. जो समाज वाचतो तोच वाचतो,जो समाज वाचणार नाही तो वाचणार नाही. लेखक सिद्धार्थ कांबळे यांनी पुस्तकाविषयी भूमिका मांडताना म्हणाले या देशातील वंचितांचे स्वायत्त राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी प्रस्थापित राजकारण्यांकडून खेळल्या जाणाऱ्या घाणेरड्या राजकारणाचे अवलोकन म्हणजे ही पुस्तक आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीकांत कांबळे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वचन केले.स्वागत प्रास्ताविक प्रा.रविराज कदम यांनी केले तर विजय काळे यांनी सूत्र संचालन केले. About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन शिरुर नगरपालिका निवडणुक 2025 : तडफदार विनोद भालेराव मैदानात? 📰 शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तरुण चेहरा पुढे — आशीष शिवाजीराव चव्हाण यांचा लोकप्रतिनिधीत्वाचा निर्धार