Contents 1. विद्याधाम प्रशाला शिरुर चे पाच विद्यार्थी आंतरशालेय बुद्धीबळ स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावर निवड !1.0.1. विद्याधाम प्रशाला शिरुर चे पाच विद्यार्थ्या जिल्हास्तरावर बुद्धीबळ स्पर्धेत खेळणार !1.0.2. स्पर्धा कारेश्वर शिक्षण संस्था, कारेगाव (शिरुर) येथे आयोजित !1.0.3. विद्याधाम प्रशाला शिरुर चे पाच विद्यार्थी जिल्हा पातळीवर. …1.0.4. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले कौतुक…..1.0.5. About The Author1.0.5.1. Dr.Nitin Pawarविद्याधाम प्रशाला शिरुर चे पाच विद्यार्थी आंतरशालेय बुद्धीबळ स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावर निवड !विद्याधाम प्रशाला शिरुर चे पाच विद्यार्थ्या जिल्हास्तरावर बुद्धीबळ स्पर्धेत खेळणार !शिरुर,दिनांक 16 आगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )विद्याधाम प्रशाला शिरुर चे पाच विद्यार्थींची आंतरशालेय बुद्धीबळ स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.विद्याधाम प्रशाला शिरुर चे पाच विद्यार्थ्या जिल्हास्तरावर बुद्धीबळ स्पर्धेत खेळणार आहेत.अशी माहीती विद्याधाम प्रशाला शिरुर कडुन प्राप्त झाली आहे. या निवडीचे सर्वांनी स्वागत केले आहे. विद्याधाम प्रशाला शिरुर चा अशी परंपरा अखंड चालूच आहे.स्पर्धा कारेश्वर शिक्षण संस्था, कारेगाव (शिरुर) येथे आयोजित !कारेगाव परिसर जिल्हा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय बुध्दिबळ स्पर्धा कारेश्वर शिक्षण संस्था, कारेगाव (शिरुर) येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत तालुक्यातील ५० शाळांच्या जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.‘विद्याधाम प्रशाला शिरुर’विद्याधाम प्रशाला शिरुर चे पाच विद्यार्थी जिल्हा पातळीवर. …या स्पर्धा मुले व मुलींच्या १४ वर्ष, १७ वर्ष व १९ वर्ष अशा तीन वयोगटातून खेळवल्या गेल्या. तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत प्रशालेच्या एकूण १९ विद्यार्थ्यांनी विविध गटातून आपला सहभाग नोंदवला. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. १४ वर्ष वयोगटातून ऋग्वेद मांडगे,१७ वर्ष वयोगटातून ईश्वरी खेसे तर १९ वर्ष वयोगटातून मानसी वीर, संस्कृती जगताप व रेहान मुल्ला अशा एकूण पाच विद्यार्थ्यांनी तालुका पातळीवर सुवर्णपदक व रौप्यपदकांची कमाई करत जिल्हा पातळीवर झेप घेतली आहे.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले कौतुक…..या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा अध्यापक सचिन रासकर, भाऊ करंजुले, दीपक गुजर, पूनम पवार यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक अध्यापकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, शालेय समिती अध्यक्ष धरमचंदजी फुलफगर, सचिव प्राचार्य नंदकुमार निकम, प्रशालेचे प्राचार्य गुरुदत्त पाचर्णे, पर्यवेक्षक मच्छिंद्र बनकर, चंद्रकांत देवीकर, दिगंबर नाईक तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संभाजी महाराज दरोडे व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्यात आला.About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनशिरुर मधील राष्टसंत कैकाडी महाराज कला क्रीडा युवा प्रतिष्ठाण गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष पदी अनिल गायकवाड तर उपाध्यक्ष पदी अविनाश जाधव! शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातुन एक पत्रकार डॉ.नितीन पवार आहेत उमेदवार !