तुमचं मन शांत कसे कराल? उत्तर ‘साक्षीभावा’ ने ! अंतर्मनात डोकावण्याची एक वाट- ‘साक्षीभाव’ समजुन घ्या या लेखात !
तुमचं मन शांत कसे कराल? अर्थात मनाची शांती हरवलेलं आजचं जग आहे.प्रत्येकाला टेंशन आहे.कुणाला पैशाचे,कुणाला कामाचे,कुणाला कौटुंबिक, कुणाला आजाराचे,कुणाला बेरोजगारीचे,कुणाला परिक्षेचे,कुणाला देणेदारीचे,कुणाला बायकोचे,कुणाला नवर्याचे,कुणाला गर्लफ्रेंडचे,कुणाला बायफ्रेंडचे,कुणाला महागाईचे,कुणाला राजकारणाचे,कुणाला स्पर्धेचे,कुणाला धंद्याचे,कुणाला प्रेमाचे तर कुणाला आणखीन कशाचे ! एक ना अनेक कारणांनी माणुस मनाची शांती हरवुन बसला आहे ! तो त्याची ही 'शांती' अनेक गोष्टींमधे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.कोणी ती नशेमधे,कोणी ती आशेमधे,
कोणी खाण्यामधे,कोणी पैशामधे,कोणी राजकारणात,कोणी मंदिरात,कोणी प्रवासात ,कोणी ती 'भाईगिरीत'! तर कोणी ती
संभोगात शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तरी मनाला शांतता काही मिळेना !
तुमचं मन शांत कसे कराल?अर्थात मनाची शांती हरवलेलं आजचं जग आहे.प्रत्येकाला टेंशन आहे.कुणाला पैशाचे,कुणाला कामाचे,कुणाला कौटुंबिक, कुणाला आजाराचे,कुणाला बेरोजगारीचे,कुणाला परिक्षेचे,कुणाला देणेदारीचे,कुणाला बायकोचे,कुणाला नवर्याचे,कुणाला गर्लफ्रेंडचे,कुणाला बायफ्रेंडचे,कुणाला महागाईचे,कुणाला राजकारणाचे,कुणाला स्पर्धेचे,कुणाला धंद्याचे,कुणाला प्रेमाचे तर कुणाला आणखीन कशाचे ! एक ना अनेक कारणांनी माणुस मनाची शांती हरवुन बसला आहे ! तो त्याची ही ‘शांती’ अनेक गोष्टींमधे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.कोणी ती नशेमधे,कोणी ती आशेमधे,
कोणी खाण्यामधे,कोणी पैशामधे,कोणी राजकारणात,कोणी मंदिरात,कोणी प्रवासात ,कोणी ती ‘भाईगिरीत’! तर कोणी ती
संभोगात शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तरी मनाला शांतता काही मिळेना !
गरज पडते ती आत्मचिंतनाची !
अशा वेळी गरज पडते ती आत्मचिंतनाची ! स्वतःकडे पाहण्याची,स्वतःला समजुन घेण्याची स्वतःमधे डोकावण्याची ,एका अंतरिक प्रवासाची !कारण हे सगळं घडते आणि आपल्याला जाणवतं ! म्हणजे मनाला जाणवतं ! म्हणुन आपण अनुभवतो.आपलं शरीर अनुभवते.म्हणुन तुमचं मन शांत कसे कराल? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आपले मनच देवु शकते.दुसर्याचे मन नाही.मग मनाकडुन या प्रश्नाची सोडवणुक करुन मन:शांती प्राप्त करता येते.
मन हे एक मोठं जंजाळ आहे—
मन हे एक मोठं जंजाळ आहे. गुंतागुंतीचे आहे,क्लिष्ट आहे.अद्भुत आहे.गुढही आहे.वगैरे वगैरे बरच आहे.हे खरे ! पण तितकचं सोपं देखील आहे ते समजणं ! ते ‘साक्षीभावाने’ समजता येते.जाणता येते.बाजुला काढुन त्यामुळे निर्माण झालेली अशांती अर्थात सोप्या आणि एका शब्दात सांगायचे तर ‘टेंशन ‘ देखील सहज आणि आता ,इथंच दुर करता येतं ! ‘साक्षीभाव’ आपण ठेवला तरं .तर ‘साक्षीभाव’ ही केवळ एक संकल्पना नाही. ती एक अनुभूती आहे.प्रत्यय आहे.प्राचीन ऋषीमुनींनी व अर्वाचीन मानसशास्त्रांनी आपल्याला दिलेली,सुचवलेली शास्रशुद्ध अशी पद्धती आहे.
जसं आहे तसं बघू शकलो,तेही त्यात गुंतून न पडता… तर काय होईल?—
आपल्या मनात सारखे,प्रत्येक क्षणी विचारांचे वादळ उसळतं. एकापाठोपाठ एक राग, द्वेष, चिंता, ईर्षा, मोह,मत्सर,भिती,आनंद,दु: ख हे सगळं मनाच्या पडद्यावर सतत फिरत असतं. पण आपण हे सगळं फक्त जसं आहे तसं बघू शकलो,तेही त्यात गुंतून न पडता… तर काय होईल? याची कल्पना करा.त्यातुन सुटका होईल का? तर लगेच करुन पहा ! तर एक झलक नक्कीच मिळेल.आणि जर सराव केला तर काय होईल? ‘टेंशन ‘ आलं तर लगेच त्यातुन सुटका होईल! असं करण्याची नेहमीसाठीच सवय लावली तर काय होईल?
साक्षीभाव म्हणजे फक्त “पाहणं” आहे ! पण न गुंतता !—-
‘साक्षीभाव’ म्हणजे काय?
• ‘साक्षीभाव’ म्हणजे स्वतःच्या मनात चालणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा पण शांतपणे व निष्पक्षपणे ‘निरीक्षक’ होणे हे आहे.
• जसं आपण रंगमंचावर चालणारं नाटक पाहत असतो. तसंच आपण आपल्या मनात चाललेलं हे नाटकच समजुन पाहायचं. राग येतोय, विचार वाहत आहेत, भावनांचा चढ-उतार होत आहे. पण आपण त्याच्याकडे फक्त ‘बघणारे’ बनायचे ! आपण त्यातले एक ‘पात्र’ बनायचं नाही !
साक्षीभावाची गरज टेंशन घालवण्यासाठी का आहे?
मनाला शांती मिळवण्यासाठी ,सुख,स्थिरता,आनंद मिळवण्यासाठी,कारण सततच्या विचारसाखळीतून बाहेर पडण्यासाठी हा एकच उपाय आहे – “मी विचार नाही, मी विचारांचा,भावनांचा साक्षी आहे” हे समजून घेणं.
आत्मचिंतनासाठी जेव्हा आपण ‘साक्षी’ बनतो. तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल स्पष्ट जाणिव होते.
साक्षीभावात टेंशनचे मुळ कारण असलेल्या
अहंकाराच्या पलीकडे जाण्यासाठी
“हे मी केलं”, “मी योग्य”,”माझं”,”मी”, “ते चूक”,”मला” – हे सगळं ‘अहं’ आहे. आपल्या अहंकारातुन आहे. पण साक्षीभावात ‘मी’ नाही, फक्त ‘पाहणं’ आहे.
साक्षीभाव कसा विकसित करायचा?
1. दररोज 5/10 मिनिटे शांत बसा.
डोळे मिटा.स्वताःच्या श्वासाकडे लक्ष द्या.
विचार आले…येत आहेत,जात आहेत,पुन्हा येत आहेत, ते आले. त्यांच्यावर प्रतिक्रिया न देता, फक्त बघा. 2.स्वतःच्या भावनांवर लक्ष ठेवा.
राग आला,येत आहे,येवु द्या, भीती वाटली आहे,वाटुद्या,हे फक्त पहा.त्यावर लगेचच प्रतिक्रिया देऊ नका.फक्त
विचार करा की , “ही भावना आली आहे. मी तिला पाहतोय.” 3. स्वतःला आठवण करुन द्या की – “मी साक्षी आहे.”
दिवसातून अनेक वेळा स्वतःला असे स्मरण करुन द्या.याचा सराव करा.वेळ वाढवत न्या.
• मन शांत होतं.
• विचार स्वच्छ होतात.
• निर्णयशक्ती वाढते.
• नात्यांमधील गोंधळ कमी होतो.
•आपली अंतर्मनाशी जोड घट्ट होते
निष्कर्ष काय आहे? —
‘साक्षीभाव’ ही निसर्गाची एक महान देणगी आहे – जी फक्त माणसालाच मिळालेली आहे.हे लक्षात ठेवा.इतर प्राण्यांना नाही.का?काहीतरी प्रयोजन यामागे नक्कीच आहे.ज्यावेळी आपण आपल्या स्वतःच्या विचार, भावना व कृतींकडे गंभीर पण शांत नजरेने पाहतो,तेव्हा आपण ‘आपण’ असतो – विना ‘संपादित’, न बिघडवलेलं, शुद्ध असणं असतं !
आपण सगळे ‘साक्षी’ होऊ शकतो. फक्त ‘पाहण्याची’ कला आत्मसात केली पाहिजे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com
1 thought on “तुमचं मन शांत कसे कराल? उत्तर ‘साक्षीभावा’ ने ! अंतर्मनात डोकावण्याची एक वाट- ‘साक्षीभाव’ समजुन घ्या या लेखात !”