
Dr.Nitin Pawar,Editor,satyashodhaknews.com
Contents
- 1 मुस्लिमांचा विकास न करता त्यांना केवळ ,’वोट बेंन्क’ कोणी बनवले?
- 2 बाबासाहेबांनी काळजी घेतली पण….
- 2.1 मुलनिवासी वगैरे संकल्पना संविधानाने नाकारल्या…
मुस्लिमांचा विकास न करता त्यांना केवळ ,’वोट बेंन्क’ कोणी बनवले?
मुस्लिमांचा विकास फक्त ‘अरविंद केजरीवाल’ यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षच करेल – नितीन पवार,आम आदमी पक्ष उमेदवार, शिरुर हवेली विधानसभा मतदार संघ!
शिरुर,दि.14 आक्टोंबर:
मुस्लिमांचा विकास न करता त्यांना केवळ ,’वोट बेंन्क’ कोणी बनवले? असा प्रश्न मी विचारत आहे.त्याचे उत्तर आमदारांनी द्यावे,भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीने द्यावे.महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी द्यावे.आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत ‘अद्याप’ आघाडीबरोबर नाही. गेलाच तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा आघाडीत असु शकतो.त्यामागे तशी सबळ कारणेही असतील.तरचं कदाचित तसे होवु शकतो.मी इथे ‘आमदार’ या घटाबद्दलच आणि महाराष्टातील वास्तव परिस्थितीबदद्लच लिहीत आहे. हे लक्षात घेऊन हे लिखाण वाचावे.त्यानंतर मुस्लिमांचा विकास फक्त ‘अरविंद केजरीवाल’ यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षच करेल असे मला वाटते. ते का हे ही मी सांगतो.
बाबासाहेबांनी काळजी घेतली पण….
लोकशाहीत सर्वांना विकासाची समान संधी व साधने मिळावीत अशी अपेक्षा असते. भारतीय लोकशाही संविधानाने या बाबतीत भरपुर काळजी घेतली आहे. त्याचे कारण डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहीणे हेच आहे. अन्यथा सर्वच चित्र वेगळे असते. हे बहुसंख्य हिंदुच्या बाबतीतही खरे आहे. ते पुढच्या लेखात लिहीण ! जरांगे पाटील यांचे आंदोलन याची एक साक्ष आहे.’मुस्लिम’
मुलनिवासी वगैरे संकल्पना संविधानाने नाकारल्या…
सर्वात महत्वाची बाब ही आहे की भारतातील मुसलमान हे बाहेरुन भारतात आले आहेत, असा एक फार मोठा गैरसमज आहे.पण तसे नाही.95 टक्के मुस्लिम हे भारतातीलच आहेत.मुलनिवासी वगैरे संकल्पनांना काही अर्थ नाही.काही लोक आपले ‘दुकान’ या संकल्पनेवर चालवतात.ते मर्यादित चालतेही.पण मोठ्या संख्येने पैसा,उर्जा आणि वेळ त्यात गेला आहे. तोच समाजाच्या विकासासाठी,अडीअडचणींना, सुविधा, आरोग्य, शिक्षण,तंत्रज्ञान सुविधा व तंत्रज्ञ व संशोधक यांवर लावला असता तरी सन्मानजनक राजकीय स्थिती तरी प्राप्त झाली असती.तरी मुलनिवासी संकल्पना व ह्युमन मायग्रेशन यांबदल कुतुहल असेल त्यांनी आधुनिक यद्ययावत जेनेटिक्सवर आधारित झालेले व चालु असलेले ते वाचुन समजुन घ्यावे.आपण कोण आहोत? कुठुन आलो आहोत? आपण इथं का आहोत? आणि आपण पुढे कुठे थायचे आहे? याचे कुतुहल असणे ही अत्यंत मुलभुत अशी अगदी जिनीयसला शोभावी अशीच ज्ञान आकांक्षा आहे. त्यात गैर काही नाही. भारतात लखनौ व बेंगलुरुला फक्त दोनच ठिकाणी यावर संशोधक आहोरात्र संशोधन करत आहेत. तेथुन प्रकाशित झालेले रिसर्च पेपर व कामाचे स्वरूप यांची माहीती घ्यावी.अत्यंत इंटरेस्टिंग अशी वैज्ञानिक माहीती उपलब्ध झाली आहे.सर्वांचेच भरपुर भ्रम दुर होवु शकतात.ते देशहिताचेच आहे.म्हणुन हा प्रश्न त्याज्य मानायचे कारण नाही.भारतातीलच नाही तर जगातील भेदभाव, संघर्ष,लढाया,मुद्दे यातुन बंद होवु शकतात. विश्व कुटुंबची भावना निर्माण होईल आणि अनेक भ्रम,अंधश्रद्धा दुर होवु शकतात. असो.
धर्म सर्व प्राणिमात्रांसाठी सांगितला गेलेला असतो….
हा प्रश्न भारतीय नागरिकाची व्याख्या करुन भारतीय संविधानाने 26 जानेवारी 1950 लाच सोडवला आहे. प्रश्न इथे महाराष्ट्रातील मुस्लिमांची सामाजिक, आर्थिक,राजकीय, सांस्कृतीक प्रगती व तिची स्थिती काय आहे? आणि लोकप्रतिनीधी व सरकारे यांनी मुस्लिमांना केवळ वोट बन्क कसे बनवले हा आहे. मुस्लिमांमधे धर्मविषयक जाणीव प्रबळ आहे. जिथे विशेषता मुस्लिम अल्पसंख असतात. तिथे ही आणखीन तीव्र असते. त्याचे कारण अस्तित्वाचे भय हे आहे. देश व राष्ट्रे निर्माण होण्याच्या आधी धर्म उदयाला आले आहेत. हिंदु, मुस्लिम,ख्रिश्चन, बौद्ध,शिख,पारशी,यहुदी जैन हे जगातील प्रमुख धर्म हे देश निर्माण होण्याच्या आधी निर्माण झालेले आहेत. आपला भारत देश म्हणुन 1947 ला निर्माण झाला आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. धर्म सर्व मानवासाठी सांगितले गेले होते. त्यामुळे आजच्या जगात सर्व देशांत कमी अधिक संख्येने सर्व देशांत सर्व धर्माचे लोक राहतात. धर्म प्रणेता कुठल्या एका देशासाठी ज्ञान,तत्वज्ञान सांगत नाही. सर्व प्राणिमात्रांसाठी सांगत असतो.
‘बहुसंख्य’ ऐवजी ‘सर्वाधीक मते’ ….
अशा परिस्थितीत भारतात 15 टक्केच्या आसपास मुस्लिम अनुयायांची लोकसंख्या आहे. आपल्याकडे 35 ते 40 टक्के मतदान मिळणारा उमेदवार निवडून येतो. अनेक कक्ष पद्धतीमुळे हे होते.मते विभागली जातात. बहुसंख्य ऐवजी सर्वाधीक मते मिळवणारा उमेदवार निवडून येतो. पण त्याला बहुसंख्येने मतदान झालेले नसते. 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान क्वचित अपवाद वगळता झालेले नसते. इथे सर्व समुहांच्या मताला महत्वाचे मानले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय भावनेला व ऐक्याला तडा जात नाही. निर्णय सर्व मान्य करतात.
मुस्लिम फक्त वोटबन्क बनला……
पण फक्त मुस्लिमांचे मतदान राज्यात 40 ते 50 जागांवरील निकाल ठरवु शकतात.हे इथल्या राजकारणी लोकांच्या चाणाक्ष नजरेतुन सुटेल अशी काही शक्यता नव्हती.म्हणुन ही सर्व मते आपल्याकडे आली तर आपल्याला सत्ता,खुर्ची मिळवुन ऐतखाऊ जीवन जगणे सोपे होईल.आणि सत्ताही मिळेल.असा या स्वार्थी व दुरगामी धोक्याचा विचार न करणार्या सत्ताधारी वर्गाला सोईचा वाटला.त्यातुन वोटबन्केच्या राजकारणाची सुरुवात झाली. त्यासाठी एकच मुळ असलेल्या दोन राजकीय प्रवाहांनी मुस्लिमांना वापरुन घेण्यास सुरुवात केली. एक भारतीय जनता पक्ष व मित्र यांनी मुस्लिमांना विदेश धार्जिणे म्हणुन आपल्याच प्रसार माध्यमांमधुन चित्र रंगवायला सुरुवात केली. त्याची प्रतिक्रिया 85 % हिंदुंची काळजी वाढवण्यात जाणीवपूर्वक केली. हिंदु आणि मुस्लिम धर्मवेडाच्या बाबतीत फारसे वेगळे नाहीत, असे बाबासाहेब आंबेडकर यांनी मत नोंदवलेले आहे.परिणाम हिंदु बर्याच प्रमाणात एकवटु लागला.संपुर्ण एकवटणे कधी झाले नाही.कारण हिंदुत्व हा वेगळाच फिनामिना आहे.पण सत्ता मिळवण्याइतपत तो एकवटु लागला. दुसर्या बाजुने मुळ एकच असणारा कांग्रेस व मित्र यांनी मुस्लिमांचे तारणहार आपण असुन त्यांना या हिंदुत्ववाद्यांची सतत भिती घातली.त्यामुळे मुस्लिमांची मते कांग्रेस व मित्र यांना सत्ता मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू लागली.मग हेच सत्तेचं सुत्र बनलं.हाच खेळ सुरू झाला.आजही आहे.दर निवडणुकीला हे सुत्र वापरणे सुरु झाले. सत्ता मिळवणे महत्वाचे ठरले.राष्ट्रीय ऐक्य हे सत्ता,संपत्तीपुढे गौण ठरले !
त्यातुन मुस्लिमांचा जो सर्व अंगाने समान विकास व संधी याचा विचार कोसो दुर गेला.
मुस्लिमांमधे ‘चमचे’ निर्माण केले. ….
हे साध्य करणे तितके सोपे नव्हते.मुस्लिमामधील एक उच्चंभ्रु वर्गाला यात सहभागी करणे गरजेचे होते! स्वार्थ सार्वत्रिक भावना आहे. मग हा वर्ग लाभधारक बनवला गेला.त्याने या प्रक्रियेत सहभाग घेतला.मर्यादित वाटा घेतला.परिणामी बहुसंख्य मुस्लिम मागास राहिला.प्रत्येक निवडणुकीत आपली गरीबी,बेरोजगारी, शिक्षण,आरोग्य, निवारा इ.समस्या सोडवणारा कोणी ‘मसिहा’ येईल.याची वाट पाहत राहिला.पण नकली ‘मसिहा’ नी अधिकाधिक शोषण केले. धार्मिक भावनेचा गैरवापर करुन हिंदुसोबत भय व द्वेष वाढवत ठेवला.अनुसुचित जाती ,अनुसुचित जमातींचे जसे केले तसे मुस्लिमांचे केले.’चमचे’ निर्माण केले.हे गावपातळीपासुन लोकसभा पातळीपर्यंत निर्माण केले.ते बे’इमानी’ ‘इमान’ दारी करु लागले.मुख्य मुस्लिम समुदाय प्रगतीपासुन वंचित राहिला.ही सर्व देशभर परिस्थिती आहे. जातीत वर्ग निर्माण होतात.तसे धर्मात निर्माण होतात.एक श्रिमंत ,दुसरा मध्यमवर्गीय, तिसरा गरीब व चौथा सर्वहारा म्हणजे बिलकुल कंगाल,अडाणी,अस्वच्छ, व्यसनी असा वर्ग.
पण हे यातुन बाहेर यावेत असे बाबासाहेब आंबेडकर यांनी जसे अनुसुचित जाती आणि अनुसूचीत जमाती मधे केले तसे करणारा कोणी नाही.
सर्व मगरमच्छ के आंसु वाले निकले…..
सर्व मगरमच्छ के आंसु वाले निकले.झोपडपट्यांमधील मुस्लिमांची अवस्था मी पाहिली आहे. तिकडे ना नगरसेवक फिरकतो ना आमदार,ना खासदार !
आम आदमी पक्षाचा दिल्लीत यशस्वी प्रयोग. …..
दिल्लीत आम आदमी पक्षाने जे प्रयोग केले त्यात जात,धर्म यांचा बिलकुल पक्षपात केलेला दिसत नाही.ज्या योजना राबवल्या त्या सर्वांसाठी अशाच दिसतात.उच्च दर्जाचे शिक्षण असो,सर्व आरोग्य सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मोफत,वीज मोफत व महिलांना मोफत प्रवास जेणेकरुन काम करणार्या महिलांना प्रवासखर्चाची चिंता नाही. ही चिंता असते,हे स्वत: भोगल्याशिवाय समजणार नाही.मोफत व उच्च दर्जाचे शिक्षण घेताना कसल्या कसल्या अडचणी येतात.हे भोगल्याशिवाय समजणार नाही. आजार,आपरेशन, कन्सर, हर्ट डिसीज,सर्जरी हे जी कुटुंबे भोगतात.त्यांनाच माहित आहे की कुटुंबाची काय अवस्था होते. हे करणारे व्यक्तिमत्व अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी,पक्ष यांनी केवळ जाणले नाही.तर प्रत्यक्षात आणले.हे महाराष्ट्रातही झाले पाहिजे.पण ना कांग्रेस व मित्र ना भाजप व मित्र यांची तशी नियत दिसते आहे.