
नवी मुंबई बेलापूर येथील फॉरेस्ट हिल सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्रांगणात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.”
नवी मुंबई | १६ ऑगस्ट २०२५ | प्रतिनिधी |

“नवी मुंबई बेलापूर येथील फॉरेस्ट हिल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. (स्थापना वर्ष – १९९४) येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात आणि एकात्मतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग, मान्यवरांची उपस्थिती व देशभक्तीच्या भावनांनी भारलेले वातावरण यामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. यावेळी सेवानिवृत्त सीमाशुल्क अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.मदन लाला पवार यांच्या हस्ते देशाचा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. ध्वजवंदनानंतर उपस्थित सर्वांनी मिळून राष्ट्रगीत गायले.परिसर देशभक्तीच्या निनादाने दुमदुमून गेला.
फॉरेस्ट हिल सोसायटीच्या प्राधिकृत अधिकारी (सहकार श्रेणी–१) श्रीमती अंजली वझरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व सदस्यांना शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या –
” फॉरेस्ट हिल सोसायटी ही विविध धर्म, जाती आणि पार्श्वभूमीतील कुटुंबांची संस्था आहे.एकात्मता आणि बंधुभाव हीच आपल्या संस्थेची खरी ताकद आहे.या कार्यक्रमाने फॉरेस्ट हिल संस्थेची बंधुता आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे.”
कार्यक्रमात लहान मुलांनी , महिलांनी पारंपरिक वेशभूषा करुन कार्यक्रमात सहभाग घेतला. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली त्यामध्ये प्रामुख्याने मान.श्री परशुराम कांबळे (सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त),मान. सय्यद नासिर हुसेन (प्रवक्ता, काँग्रेस) व सौ. फातिमा नासिर हुसेन, मान. मोहम्मद अर्शद (वरिष्ठ संघटक व प्रवक्ता, शिवसेना),मान. सतीश चंद्राजी (सेवानिवृत्त ओएनजीसी अधिकारी),मान. अजयसिंह बंकावत (मा.वरिष्ठ वार्ताहर, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप) इंजिनीयर सागर तावडे, इंजिनीयर शार्दुल पवार (एम. जी. मोटर्स),मान. कौशिक,सौ. जोत्स्ना तावडे,श्रीमती शीला पवार,विकी कांबळे यांच्यासह संपूर्ण सोसायटीतील कुटुंबांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.सौ फातिमा आणि सौ जोत्स्ना तावडे त्यांच्याकडून सर्वांसाठी मिठाईचे वितरण करण्यात आले.