
Contents
News Crime Shirur: हातभट्टी दारू विकत होता! पुढे काय घडले?वाचा सविस्तर. …
News Crime Shirur Hatbhatti Daru Japt
📍शिरूर प्रतिनिधी | दिनांक: 7 जून 2025 |
” News Crime Shirur: शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे गावठी हातभट्टी दारू तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून एक आरोपी अटकेत आहे. जाणून घ्या संपूर्ण बातमी व कायदेशीर तपशील.”
शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूचा साठा पकडत मोठी कारवाई केली. (News Crime Shirur) महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
🔍 गुन्ह्याची माहिती—
शिरूर पोलीस स्टेशनच्या मांडवगण फराटा उपस्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वडगाव रासाई गावातील तळईमाळ परिसरात, एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला 6 जून 2025 रोजी रात्री 9:45 वाजता छापा टाकण्यात आला. छाप्यात 700 रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू सापडली. 10 लिटरच्या प्लॅस्टिक कॅनमध्ये 7 लिटर तयार दारू आढळून आली.
👮 आरोपीची ओळख—-
आरोपीचे नाव बंटी रोहीदास गव्हाणे (वय 23, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) असे आहे.
👥 तपास आणि कारवाई—-

पोलीस अंमलदार अमोल संभुदेव माने यांनी ही कारवाई केली. पोलीस हवालदार गवळी यांच्या तपासाअंती हा गुन्हा गु. र. नं. 393/2625 नुसार नोंदविण्यात आला आहे. पंचासमक्ष जप्त केलेल्या दारूचा काही भाग सॅम्पल घेऊन कागदोपत्री साक्षांद्वारे शासकीय सिल व लेबलसह ठेवल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
⚖️ कायदेशीर कारवाई—–
सदर गुन्ह्याची नोंद महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अंतर्गत करण्यात आली असून आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—
1. महाराष्ट्र दारूबंदी कायदा माहिती (Govt)
2. शिरूर पोलीस स्टेशन – अधिकृत माहिती
3. दारूबंदी कायद्याचे कलम 65 (ई) माहिती
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंक वर क्लिक करुन —-
Shirur Missing News: मलठण गावातील ४० वर्षीय अजित अल्हाट बेपत्ता, कुटुंबीयांची मदतीची विनंती