
Contents
- 1 News Domestic Violence | शिरूरमध्ये विवाहिता अनुराधा मिसाळ हिचा दीर्घकाळ छळ; पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल !
- 1.1 News Domestic Violence Shirur Woman |
- 1.1.1 🧊 गुन्ह्याचा तपशील —
- 1.1.2 या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत—
- 1.1.3 🧊 छळाचे स्वरूप व कालावधी —
- 1.1.4 🧊 पोलीस कारवाई —-
- 1.1.5 🔍 News Domestic Violence : सामाजिक प्रश्नाचा गंभीर संदर्भ—
- 1.1.6 सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून •••• घरफोडी : शिरूर तालुक्यातील मलठण येथे बंद घर फोडून 37,500 रुपयांचा माल चोरीला
- 1.1.7 About The Author
- 1.1 News Domestic Violence Shirur Woman |
News Domestic Violence | शिरूरमध्ये विवाहिता अनुराधा मिसाळ हिचा दीर्घकाळ छळ; पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल !
News Domestic Violence Shirur Woman |
दिनांक: ८ जुलै २०२५ |शिरूर प्रतिनिधी |
शिरूरमध्ये विवाहिता अनुराधा मिसाळ हिचा दीर्घकाळ छळ; पती, सासरच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल. News Domestic Violence अंतर्गत पोलिसांची कारवाई सुरू.
शिरूर शहरात News Domestic Violence प्रकारातील एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. सौ. अनुराधा भरत मिसाळ (वय ३३, व्यवसाय: गृहिणी, सध्या राहणार पानसरे पाराडाईज, आनंद सोसायटी, फ्लॅट नं. ६०६, शिरूर, पुणे) हिने आपल्या पतीसह सासरच्या सदस्यांविरोधात दीर्घकाळ चाललेल्या मानसिक आणि शारीरिक छळाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
🧊 गुन्ह्याचा तपशील —
फिर्यादी अनुराधा मिसाळ यांनी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८१/२०२५ अन्वये भा. न्या. संहिता २०२३ चे कलम BNS-85, 115(2), 351(2)(3), 352, 3(5) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत—
1. भरत शंकर मिसाळ (पती)
2. शंकर उत्तम मिसाळ (सासरे)
3. कमल शंकर मिसाळ (सासू)
4. धनश्री शंकर मिसाळ (नणंद)
सर्व रा. सात्रा म्युनिसिपल कॉलनी, बागरोजा हुडको, नालेगाव, दिल्ली गेट, अहिल्यानगर, ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर
🧊 छळाचे स्वरूप व कालावधी —
तक्रारीनुसार ऑक्टोबर २०२३ ते १ जून २०२५ दरम्यान, कल्याण शिळ रोड, ठाणे येथील सनराईज पार्क व्ह्यू परिसरात राहते असताना अनुराधा यांच्यावर आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. फिर्यादीने नमूद केले की, तिच्या नणंदेने वारंवार पतीस सांगितले की, “तुला हिच्यापेक्षा चांगली सरकारी नोकरी करणारी बायको मिळाली असती.” तसेच, पती भरत मिसाळ यांनी तिला वेळोवेळी मारहाण केली.
पती व सासरच्या मंडळींनी ₹५,५०,०००/- ची आर्थिक मागणी करून, त्यासाठी तिला मानसिक त्रास दिला. या सर्व प्रकारांमुळे अनुराधा यांनी समोपदेश नको असून थेट कायदेशीर कारवाईच व्हावी अशी भूमिका घेतली आहे.
🧊 पोलीस कारवाई —-
दाखल अंमलदार : पोहवा पवार
तपास अधिकारी : पो. हवा. कोथळकर
शिरूर पोलिसांनी सदर तक्रारीवर त्वरित गुन्हा नोंदवला असून तपासाची कार्यवाही सुरू आहे.
🔍 News Domestic Violence : सामाजिक प्रश्नाचा गंभीर संदर्भ—
ही घटना News Domestic Violence या सामाजिक समस्येचा ज्वलंत नमुना आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजात बळकट महिला हक्क, वैवाहिक सन्मान आणि न्याय या बाबींसाठी अधिक सजगता व कार्यवाहीची गरज आहे.
🔖 संबंधित माहिती व मदतसंपर्क —
National Commission for Women – Domestic Violence Help
Government Helpline 181 – Women in Distress
Legal Aid for Women – India