
Contents
- 1 बेकायदेशीर गांजा विकुन पैसा कमवायला गेला ! पण उलटाच खेळ झाला !
- 1.1 बेकायदेशीर गांजा जांबुत मधुन जप्त !
- 1.1.1 बेकायदेशीर गांजा 38,440 रुपयांचा—-
- 1.1.2 खास भेट :
- 1.1.3 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.4 बेकायदेशीर गांजा तब्बल 3 किलो 840 ग्रॅम गांजा वजनाचा—
- 1.1.5 गुप्त माहिती आणि शिरुर पोलिसांची धडक कारवाई —-
- 1.1.6 पोलिसांनी रचला नियोजनबद्ध पद्धतीने सापळा—
- 1.1.7 बेकायदेशीर गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल–
- 1.1.8 शिरुर पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी—-
- 1.1.9 पुढील तपास सुरू—
- 1.1.10 आवाहन पोलिसांनी केले आहे आवाहन—
- 1.1.11 वेडाचार प्रतिष्ठेचा बनला आहे–
- 1.1.12 About The Author
- 1.1 बेकायदेशीर गांजा जांबुत मधुन जप्त !
बेकायदेशीर गांजा विकुन पैसा कमवायला गेला ! पण उलटाच खेळ झाला !
बेकायदेशीर गांजा जांबुत मधुन जप्त !
Shirur Crime News 13 March 2025 :
(#satyashodhaknews Report)
बेकायदेशीर गांजा विकुन पैसा कमवायला गेला ! पण उलटाच खेळ झाला आहे. 38,440 रुपयांचा
बेकायदेशीर गांजा जांबुत मधुन जप्त करण्यात आला आहे. समीर इशरत अली शेख असे आरोपीचे नाव आहे. शिरुर तालुक्यातील जांबुत येथे शिरुर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Read more >>
Shirur Crime आता इलेक्ट्रीक मोटर चोरी चा सिलसिला सुरू !
बेकायदेशीर गांजा 38,440 रुपयांचा—-
बेकायदेशीर गांजा विकुन पैसा कमवायला गेला पण उलटाच खेळ झाला आहे. 38,440 रुपयांचा
बेकायदेशीर गांजा जांबुत मधुन जप्त करण्यात आला आहे. समीर इशरत अली शेख असे आरोपीचे नाव आहे. शिरुर तालुक्यातील जांबुत येथे शिरुर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
सविस्तर घटना अशी आहे. शिरूर पोलिसांनी ही कारवाई करत बेकायदेशीर गांजासह एक जण जेरबंद केला आहे.
शिरूर – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. तिच्या आधारे मोठी कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केरण्यात शिरुर पोलिसांना यश मिळाले आहे.
बेकायदेशीर गांजा तब्बल 3 किलो 840 ग्रॅम गांजा वजनाचा—
या कारवाईत तब्बल 3 किलो 840 ग्रॅम गांजा वजनाचा बेकायदेशीर असलेला अंमली पदार्थ गांजा आरोपी कडुन जप्त करण्यात आला आहे. या गांजाची बाजारातील किंमत 38,440 रुपये इतकी आहे.मात्र आता तो जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहिती आणि शिरुर पोलिसांची धडक कारवाई —-

शिरूर पोलिस स्टेशनचे अंमलदार अंबादास मोरे यांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली.ती अशी होती. की समीर इशरत अली शेख (वय- 30, राहणार- जांबूत, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे हा आपल्या घराच्या आसपास मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गांजा बाळगून आहे. त्याबरोबरच तो आपल्या ओळखीच्या लोकांना गांजाची विक्री करत असल्याची माहिती यातुन आता समोर आली.
या माहितीच्या आधारे शिरुर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर उपविभाग यांची परवानगी घेतली. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
Read more >>
पोलिसांनी रचला नियोजनबद्ध पद्धतीने सापळा—
मग त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला.कारण गावात थोडी जरी चाहुल लागली तरी असे बेकायदेशीर अंमली पदार्थ इतरत्र लपवुन किंवा फेकुन असे आरोपी हात झटकत असतात.गावात इतरही कोणाला अशा कारवाई बाबत माहिती होवु देणे पोलिसांना अपयशाकडे नेत असते.आणि असे बेकायदेशीर गांजा,हातभट्टी दारु,देशी दारु,इतर इंग्लीश दारु सुद्धा सर्रास विकली जाते. एकही गाव याला अपवाद असण्याची शक्यता कमी आहे.
मात्र या केसमधे आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.
बेकायदेशीर गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल–
अटक करण्यात आलेल्या समीर शेख याच्या ताब्यातून 3 किलो 840 ग्रॅम इतका गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची एकूण किंमत 38,440 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 169/2025 असा शिरुर पोलिस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आला आहे. एन.डी.पी.एस. कायदा 1985 अंतर्गत समीर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
Swargate Pune Bus Rape Case : आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक ! ,’ संमतीनेच केले ‘ असाआरोपीचा दावा ?
शिरुर पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी—-
ही कारवाई पोलिस अधिक्षक, पुणे ,पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस हवालदार भागवत गरकळ, पोलीस हवालदार बाळू भवर, पोलीस हवालदार अंबादास मोरे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब ठोंसरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
पुढील तपास सुरू—

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक करांडे करत आहेत. आरोपीकडून आणखी काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का? याचीही चौकशी केली जात आहे.
आवाहन पोलिसांनी केले आहे आवाहन—
शिरूर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीस आळा घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे. नागरिकांनीही असे कोणतेही संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
एक गोष्ट मात्र नक्की की ही समस्या मुळापासुन सोडवणे अवघड काम आहे. लोकसंख्या मरणाची ! बेरोजगारांची संख्या मरणाची,संपत्ती, भांडवल,कौशल्य आणि एकुण अर्थकारण केंदीकरणाने ग्रस्त असणे.शिक्षणाचे प्रमाण कमी असणे.नको तिथे पैशाची उधळण करणारा एक वर्ग असणे.याचे उदाहरण पहायचे असेल तर शिरुर मधे वेगवेगळय़ा कारणांसाठी जी जेवणावळी आयोजित केली जाते. त्या खर्चाचा अंदाज घ्या. तिथे फक्त पाण्याच्या बाटल्यांचा खर्च पहा !
वेडाचार प्रतिष्ठेचा बनला आहे–
या अन्नदान विरांना हे कसे कळत नाही की एक दिवसाच्या अन्नामुळे समाजातील अन्नाची समस्या सुटत नाही.किंबहुना हा खर्च व्यर्थच आहे. पण हा वेडाचार प्रतिष्ठेचा बनला आहे. चार लोक आपल्याला मोठे म्हणतील,असे या निर्बुद्धांना वाटते.पण तसे होत नसते.समाजाने कुणाला चांगले म्हटले आहे? तेव्हा आता याला म्हणणार आहे ! तो काहितरी निगेटिव्ह कमेंटच करतो.आणि वेळेला जवळही येत नाही. चोर आल्यावर पहा कोणी कधी शेजार्यासाठी बाहेर येते का ?
शिवाय हा सर्व अंधश्रध्दा मुलक कर्मकांडातुन केला जातो हे आणखिन वेगळेच ! पण माणुस मुर्खांच्या नंदनवनात विहार करत असतो ! असो.