
Contents
News Shrirampur Manase :
स्वप्निल सोनार यांची श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड : मनसेच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ
News Shrirampur Manase Adhyakshapadi Swapnil Sonar
श्रीरामपूर दिनांक 30 मे 2025 | विठ्ठल ठोंबरे यांच्याकडुन |
News Shrirampur Manase नुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) श्रीरामपूर शहराध्यक्षपदी स्वप्निल सोनार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे निरीक्षक व मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी जाहीर केली.
ही निवड केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित न राहता, श्रीरामपूर शहरातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. श्रीरामपूर सारख्या राजकीय दृष्टिकोनातून प्रभावी मतदारसंघ असलेल्या शहरात स्वप्निल सोनार यांच्यावर शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आल्याने स्थानिक पातळीवरही ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
उत्साह आणि स्वागत सोहळा—
स्वप्निल सोनार यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होताच संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पसरले. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून, स्वागताचे कार्यक्रम आयोजित करून आनंद व्यक्त केला. अनेकांनी ही निवड वेळेवर आणि दूरदृष्टीपूर्ण असल्याचे नमूद केले.
संघटनेला नवे बळ—-
मनसेच्या शहर शाखेने यापूर्वीही विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. अशा पार्श्वभूमीवर कर्मठ आणि झपाटलेल्या कार्यकर्त्याला नेतृत्व देणे ही पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
नव्याने रचलेली भूमिका—
शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्वप्निल सोनार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,
“पक्षाच्या नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण निष्ठेने काम करणार आहे. जनतेच्या समस्यांवर आम्ही आंदोलनात्मक व रचनात्मक पद्धतीने लढा देणार आहोत. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, बेरोजगारी यासारख्या प्रश्नांवर कार्ययोजना आखण्यात येईल.”
News Shrirampur Manase: नवनिर्वाचित स्वप्निल सोनार म्हणतात —-

ते पुढे म्हणाले, “मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार संपूर्ण शहरात पक्ष संघटना नव्याने उभी करून, आगामी नगरपालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार विजयी होतील यासाठी मी झपाटून कार्य करेन.”
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर—
या निवडीचा कार्यक्रम श्रीरामपूर येथील मनसे कार्यालयात पार पडला. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सतीश कुदळे, जिल्हा संघटक प्रवीण रोकडे, तालुकाध्यक्ष अमोल साबणे, रोजगार सेना तालुकाध्यक्ष भास्कर सरोदे, सहकार सेना तालुकाध्यक्ष निलेश सोनवणे, कामगार सेना तालुकाध्यक्ष विलास पाटणी, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष संकेत शेलार, तालुकाध्यक्ष अतुल खरात, शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी, शहर सचिव सुजित गायकवाड, उपाध्यक्ष किशोर भागवत, सरचिटणीस नितीन जाधव, उपाध्यक्ष संदीप विशंभर, महिला सेना शहराध्यक्ष उज्वला दिवटे, उपशहराध्यक्ष सुवर्णा ससाने, तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदर्भासाठी खालीलसाईटला भेट द्या —-
https://www.manase.org – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत वेबसाइट
https://maharashtra.gov.in – महाराष्ट्र शासन
https://www.loksatta.com – लोकसत्ता (मराठी बातम्या)
https://www.esakal.com – सकाळ (राजकीय बातम्या)
आणखीन माहिती व लेख वाचा satyashodhak.blog वर…
—
आणखीन बातम्या व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. …
Alibag News | वादळामुळे नुकसान – शेतकरी कामगार पक्षाची तत्काळ मदतीची मागणी