
Contents
News Theft Shirur: शिरूर वडगाव रासाई सोनसाखळी चोरी प्रकरण: किराणा दुकानात घडली धक्कादायक घटना!
News Theft Shirur Vadgaon Rasai
दिनांक 6 जुन 2025 | सत्यशोधक न्युज |
” News Theft Shirur : शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे किराणा दुकानात घडलेली सोनसाखळी चोरीची घटना. दोन अज्ञात इसमांनी दुकानात शिरून पाण्याच्या बाटलीच्या बहाण्याने तब्बल ₹1.58 लाखांचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने चोरले. तपास शिरूर पोलिसांकडून सुरू.”
➡️ गु.र.नं.– 381/2025 | भा.दं.वि कलम 304(2), 3(5)
➡️ ठिकाण – वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे
➡️ आरोपी – दोन अज्ञात इसम | चोरीचा एकूण ऐवज – ₹1,58,400
🧾 घटनेचा संक्षिप्त आढावा—-
दिनांक 4 जून 2025 रोजी सकाळी 4.08 वाजता, शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील शांभवी किराणा दुकानात घडलेली एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे.
पाण्याच्या बाटलीच्या बहाण्याने दुकानात आला—
फिर्यादी सौ. सुरेखा अनिल कुंभार (वय 46), व्यवसाय – किराणा दुकान, यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात इसम पाण्याच्या बाटलीच्या बहाण्याने दुकानात आला आणि काही क्षणांतच त्याच्यासोबत आलेल्या दुसऱ्या इसमासोबत मिळून त्यांच्या गळ्यातील 1 तोळा 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने ओढून चोरी करून पळ काढला.
या गंठणाची अंदाजे किंमत ₹1,58,400 रुपये असून दोघे अज्ञात इसम हा प्रकार करुन पसार झाले आहेत.
🕵️♀️ पोलिस तपास सुरू —-

सदर प्रकरणावर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. 381/2025 नोंद करण्यात आला असून,
भारतीय दंड संहितेचे कलम 304(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा तपास पोसई नकाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून,
गुन्हा पो.ह. कळमकर यांनी नोंदवला आहे.
संपूर्ण तपासाची जबाबदारी प्रभारी अधिकारी मा. पो.नि. चिवडशेट्टी (शिरूर पोलीस स्टेशन) यांच्याकडे आहे.
📢 नागरिकांसाठी आवाहन—-
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून ज्यांना या घटनेविषयी काही माहिती असेल त्यांनी तातडीने शिरूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
📌 घटना लक्षात ठेवावी म्हणून—
📍 घटना स्थळ: शांभवी किराणा दुकान, वडगाव रासाई, शिरूर
📅 घटना वेळ: 04/06/2025 रोजी, सकाळी 4:08
💍 चोरीचा ऐवज: 1 तोळा 8 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण – ₹1,58,400/-
🧑💼 तपास अधिकारी: पोसई नकाते
👥 आरोपी: दोन अज्ञात इसम
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना–
2. Crime Reporting Online – NCRB
3. Google Maps – Wadgaon Rasai
4. Pune District Official Website
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा पुढील लिंक वर क्लिक करुन —
Accident News | टाकळी हाजी येथील भीषण अपघात! निष्काळजी वाहनचालकावर गुन्हा दाखल, पती-पत्नी जखमी.