
रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलिस स्टेशन
Contents
- 1 ओला उबेर कंपणीच्या गाड्या बुक करुन चालकांना लुटणारा रांजणगांव गणपती एम आय डी सी पोलिसांनी केला जेरबंद !
- 1.1 ओला उबेर कंपणीची गाडी पुण्यातुन बुक करतो ! रांजणगावला आणतो ! चालकाला मारहाण करुन मोबाईल लुटतो…पण ?
ओला उबेर कंपणीच्या गाड्या बुक करुन चालकांना लुटणारा रांजणगांव गणपती एम आय डी सी पोलिसांनी केला जेरबंद !
ओला उबेर कंपणीची गाडी पुण्यातुन बुक करतो ! रांजणगावला आणतो ! चालकाला मारहाण करुन मोबाईल लुटतो…पण ?
शिरुर, दिनांक 10 जुलै :(श्री.अनिल डांगे यांच्याकडुन )
ओला उबेर कंपणीच्या गाड्या बुक करुन चालकांना लुटणारा रांजणगांव गणपती एम आय डी सी पोलिसांनी पकडला आहे. हा मोबाईल चोर ओला उबेर कंपणीची गाडी पुण्यातुन बुक करत होता . रांजणगावला देवदर्शनाला म्हणून प्रवाशांना आणत होता. प्रवाशी विश्वास ठेवून यायचे. तिथे या ओला उबेर कंपणीच्या गाडीवरील चालकाला हा आणि याचे साथीदार प्रवाशाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल लुटत होता. असे एकंदरीत मोबाईल फोन चोरी करण्याची पद्धत याने तयार केली होती.हे एक नवीनच संशोधन म्हणावे असा हा सारा प्रकार चालला होता. त्याने असे तंत्र किती वेळा वापरले याचा तपास रांजणगांव गणपती एम आय डी सी पोलिस करत आहेत. यशावकाश याबाबत आणखी माहिती मिळेल !
पण ! पुढे काय घडले ते वाचा….
मांजर दुध पिताना डोळे झाकते. त्याला असे वाटते की त्याने डोळे झाल्यानंतर जसे त्याला काहीच दिसत नाही. तसे दुधाचा मालक देखील पाहु शकत नसेल ! आणि याच परिस्थितीचा आपण फायदा करुन घेवु. घरातील दुध पिऊन पळ काढू ! पण तसे नसते. कुणाचे ना कुणाचे डोळे उघडे असतात. मांजर पकडले जाते. हुसकले जाते. अर्थात लगेच त्याला मालक दंड करत नाही. असे या चोरटयाच्या बाबतीतही घडले आहे.
ओला उबेर कंपणीची गाडी पिंपरी चिंचवड येथुन बुक केली….
6 जुलै रोजी पिंपरी चिंचवड़ , पुणे येथुन ओला उबेर कार चालक दत्ता बामाजी फड , राहणार- कात्रज, पुणे यास ,’ रांजणगांव गणपती ‘ येथे देव दर्शनाला जायचे आहे का ?’ असे सांगुन एका अनोळखी इसमासाठी गाडी बुक केली होती.
त्यानुसार कारचालक दत्ता बामाजी फड हे सदर अनोळखी इसमास घेउन रांजणगांव गणपती येथे रात्री 2:20 वाजता रांजणगाव गणपती पार्किंग जवळ आल्यानंतर पैसे मागु लागला. त्यावेळी त्या अनोळखी इसमाने बरोबर त्याच्या आणखी एक साथीदाराला बोलावून घेतले. त्यानंतर हे दोन्ही अनोळखी इसम दत्ता बामाजी फड यांना दमदाटी करु लागले. भाडेही दिले नाही. शिवाय फड यांचा 15,000 रुपये किंमतीचा MI कंपनीचा मोबाईल फोन घेऊन फरार झाले.
रांजणगाव गणपती पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल. ….
दिनांक 6 जुलैला चालक दत्ता बामाजी फड यांनी रांजणगांव पोलिस स्टेशनला या दोन अनोळखी इसमांवर जबरीने मोबाइल फोन चोरुन नेल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र त्याला त्याचा मोबाईल फोन गमवावा लागला होता. सामान्य माणसासाठी एकढेही नुकसाण किती क्लेशदायक असते.ते अनुभवणाराच जाणो !
सदरचा गुन्हा दाखल होताच रांजणगांव गणपती एम आय डी सी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.महादेव वाघमोडे व सहायक पोलिस निरीक्षक श्री. मनोजकुमार नवसरे यांनी पोलिस तपास पथकास आवश्यक त्या सुचना दिल्या. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या संदर्भात सर्व सुचना दिल्या.
सी सी टी टिव्हीठरतयं एक चांगलं साधन गुन्हेगार पकडण्याचे….
त्यानुसार पोलिस पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे , उमेश कुतवळ, यांनी रांजणगांव परिसरातील 10 ते 12 सी सी टी व्ही फुटेज व कमेरे चेक केले.हे एक नवे आधुनिक तंत्रज्ञानाने निर्माण केलेले डोळेच आहेत. ते सतत रस्त्यावर व अन्य दुरार्या ठिकाणांवर दक्ष ठेउन असतात.समजा एखाद्या आडबाजुला कमेर्यातील या डोळ्यांचे लक्ष जात नसेल तर त्यापरिघाच्या बाहेर इतर कुणाचेही सी सी टी व्ही फुटेज, कमेरे हे चालु असतात. चोर त्या परिसरातुन बाहेर तर निश्चित गेलेला असतो. तिथेच कशाला थांबेल? आणि कुणाकडे हा अनोळखी राहू शकेल? तो बाहेर पडतो.त्याला वाटते आपण निसटलो आहोत ! पण या दुसर्या फेरीत तो बाद होतो. कॅमर्यात अडकला जातो. पोलिस असेच त्या परिसराचा शोध घेतात.हा त्यात दिसतो.आरोपी निश्चित केला जातो.त्याला थांगपत्ता ही लागु न देता उचलतात ! हे काम रांजणगांव गणपती पोलिस पथकाने पार पाडले !
त्यानुसार-
1. गुरुप्रीत इंद्रजीत सिंग , वय-21 वर्षे, राहणार- नेहरू नगर,पिंपरी चिंचवड , पुणे
2. कृष्णा सचिन तांगतोडे, वय -19 वर्षे, सध्या राहणार- रांजणगांव गणपती ,तालुका -शिरुर, जिल्हा- पुणे,मुळ राहणार- पाथर्डी, तालुका, जिल्हा – नाशिक
यां दोघांना दिनांक 6 जुलै रोजी रात्री 8: 41 वाजता अटक केली. त्यांच्या कडून चोरलेला रुपये 15000 किंमतीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळवले .
- ही कामगिरी श्री.पंकज देथमुख ,पोलिस अधिक्षक,पुणे ,श्री.रमेश चोपडे,अपर पोलिस निरीक्षक, श्री.प्रशांत ढोले,उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरुर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक श्री. मनोजकुमार नवसरे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस काॅन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलिस हवालदार विलास आंबेकर यांनी पार पाडली आहे.
या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे ,रांजणगांव एम आय डी सी पोलिस स्टेशन हे करत आहेत.