
Old Parents Harassment Case: वयोवृद्ध आई वडिलांचा न्यायासाठी लढा प्रकरण: शिक्रापुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार!
Old Parents Harassment Case Shirur
दिनांक १२ जुलै २०२५ | प्रतिनीधी |
Old Parents Harassment Case: ८२ वर्षीय वृद्धांनी मुलाविरुद्ध शेती आणि बंगला फसवून घेतल्याचा आरोप केला आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे गावातील ही घटना सामाजिक दृष्टिकोनातून गंभीर असून कायदेशीर कारवाईस पात्र आहे.
(वयोवृद्ध खेडकर दांपत्य आता न्यायासाठी शिक्रापुर पोलिस स्टेशनमध्ये! )
न्हावरे (ता. शिरूर) येथील ८२ वर्षीय दत्तु उर्फ दत्तात्रय खेडकर आणि त्यांची पत्नी गंगुबाई (वय ७८) यांनी आपल्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप करत आज शिक्रापुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या स्वतःच्या कष्टाची आणि मालकीहक्कातील शेतजमीन त्यांचा मुलगा महादेव खेडकर याने जोरजबरदस्तीने, फसवणूक करून खरेदी करून घेतली असून, सध्या तो आईवडिलांना सांभाळण्याऐवजी त्यांना त्रास देत आहे.
तक्रारीनुसार, खेडकर कुटुंबाची न्हावरे गावात मालकी हक्काची मिळकत असून, गट नंबर १०२९/२ या शेतजमिनीपैकी २.४२ आर क्षेत्रफळाची जमीन ही दत्तात्रय खेडकर यांची स्वतःच्या कष्टार्जित संपत्ती आहे. त्यांनी त्या जमिनीत शेती केली असून, त्या परिसरात त्यांचा स्वतःचा बंगला देखील आहे.
महत्त्वाचे म्हणजे, अर्जदारांनी अद्यापपर्यंत या मिळकतीची कोणतीही वाटणी केलेली नाही, तसेच कोणत्याही मुलाला वा मुलीला कायदेशीर हक्क दिलेला नाही. तरीही मुलगा महादेव खेडकर (वय ४७, सध्या राहणार शिक्रापुर-जातेगाव रोड) याने जणू सर्व हक्क स्वतःकडे असल्याचा दावा करत वडिलांना आणि आईला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकरणावर जिल्हाधिकारी किंवा संबंधित प्राधिकरण काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वृद्ध पालकांचा सांभाळ करण्याचे कर्तव्य मुलांचे असतानाही अशा प्रकारच्या घटनांमुळे सामाजिक आणि नैतिक अधःपतन दिसून येते.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील लिंकस् ना••••
🔗 माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 (IndiaCode)
National Helpline for Senior Citizens – Elderline
Legal Services for Senior Citizens – NALSA
Join our affiliate community and maximize your profits—sign up now! https://shorturl.fm/pGwoF