
Contents
- 1 Online Fraud News : शिरूरमध्ये ऑनलाइन फसवणूक – नागरिकाच्या खात्यातून 1 लाख रुपये लंपास !
Online Fraud News : शिरूरमध्ये ऑनलाइन फसवणूक – नागरिकाच्या खात्यातून 1 लाख रुपये लंपास !
Online Fraud News Shirur 1 Lakh
🗓️ तारीख : 10 जुलै 2025 📍 स्थळ: शिरूर, पुणे |
🔶 घटना संक्षेप—–
Online Fraud News Shirur – शिरूरमधील प्रितम प्रकाश नगरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून एक लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक. पोलिसांकडून तपास सुरू.
शिरूर येथील प्रितम प्रकाश नगर येथील रहिवासी किशोर सावळेराम कवडे (वय 39) यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून एकूण 1,00,000 रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन फसवणूक करून काढले. ही घटना 8 जुलै 2025 रोजी सायंकाळी 8.10 वाजता घडली असून, त्यानंतर 9 जुलै रोजी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔍 घटनेचे तपशील—-
फिर्यादी किशोर कवडे हे घरी असताना, त्यांच्या एचडीएफसी बँक शाखा-शिरूर (खाते क्रमांक 22601140001890) मधून Ref No-518920147281 व 518920148817 या क्रमांकांवरून परस्पर 50,000 रुपयांचे दोन व्यवहार, एकूण 1 लाख रुपये, OTP किंवा परवानगी न देता वळवले गेले.
या संदर्भात त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
📜 गुन्हा नोंदविण्याची माहिती—-
गुन्हा क्र.: 484/2025
दाखल दिनांक: 09/07/2025
वेळ: सायं. 5.26 वा.
कायद्याचे कलम:
भारतीय नवीन फौजदारी संहिता (BNS) कलम 118
माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66, 66C, 66D
👮♂️ तपास अधिकारी व अंमलदार—-
दाखल अंमलदार: पोसई पवार
तपास अधिकारी: पोनि संदेश केंजळे
प्रभारी अधिकारी: श्री. संदेश केंजळे (पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण)
📢 सतर्कतेसाठी सूचना—–
शहरातील नागरिकांनी OTP शेअर करू नये. अनोळखी नंबरवरून येणाऱ्या बँक संबंधित कॉल, SMS अथवा लिंकवर क्लिक करू नये. फसवणूक झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🏷️
1. HDFC Bank Fraud Prevention Tips
2. Maharashtra Police Cyber Crime Unit
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून ••••
Beaking News: रांजणगाव MIDC मध्ये मारहाणीचा धक्कादायक प्रकार; दगड, कोयत्याने हल्ला
Join our affiliate program today and start earning up to 30% commission—sign up now! https://shorturl.fm/DNggK