
Contents
- 1 ओशो कोणत्या धर्माचे होते? | Osho Ka Dharm Kya Tha?
- 1.1 ओशो यांचा धर्म कोणता होता? जन्माने जैन ते ‘ बुद्धत्व ‘! | Janma Jain Pariwar me par pahunche ,’Buddhatwa’ Tak’|
- 1.2 प्रस्तावना —
- 1.3 ओशोंचे धर्मविषयक विचार—-
- 1.4 ओशो मग कोणत्या धर्माचा मानत होते?
- 1.5 ओशो यांचे खरे तत्त्वज्ञान मग कोनते? – “ध्यान,प्रेम व स्वातंत्र्य”
- 1.6 ओशोंच्या विचारांवरील वाद व टीका—
- 1.7 ओशोंचा प्रभाव व वारसा कोनता?—
- 1.8 समारोप—
ओशो कोणत्या धर्माचे होते? | Osho Ka Dharm Kya Tha?
ओशो यांचा धर्म कोणता होता? जन्माने जैन ते ‘ बुद्धत्व ‘! | Janma Jain Pariwar me par pahunche ,’Buddhatwa’ Tak’|
(Satyashodhaknews Article By Editor Dr.Nitin Pawar,Pune.)
ओशो यांचा धर्म कोणता होता? असा प्रश्न अनेकांना पडतो.एवढे मोठे दार्शनिक ! मग त्यांनी नवीन कोनता धर्म स्थापन केला का? तर तसेही म्हणता येणार नाही ! तर सत्याचा शोध त्यांच्या विचारांचा मुख्य विषय राहिलेली दिसतो. जन्माने ते जैन होते.पण त्यांची अंतर्यात्रा ‘ बुद्धत्वा’ पर्यंत गेली.पण ते बौद्ध होते का? तर नाही ! ‘बुद्धत्व’ ही मानवी संभावनेची उच्चतर अवस्था आहे.ती अनेकांनी गाठली आहे.बुद्धाने,येशुंनी,पैगंबरांनी,संत मिराबाई,संत दारु,संत तुकाराम इ.अनेक लोक ,’ बुद्धत्व ‘ अवस्थेला उपलब्ध झाले.तोच धर्म ! ती वस्था कोनताही व्यक्ती प्राप्त करु शकतो.बुद्ध पुरुष फक्त मार्ग दाखवतात.त्यावर चालणे मात्र स्वत:चे च घडावे लागते !
प्रस्तावना —
ओशो रजनीश हे 19 व्या शतकातील एक जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू व एक तत्त्वज्ञ होते.यावर कुणाचे दुमत होईल असे वाटत नाही.ओशोंचे विचार जगला आजपर्यंत प्रभावित करत राहिलेले मात्र नक्कीच आहेत. अशा या गुढ ‘गुरु’ बद्दल अनेकांना प्रश्नही आहेत.आणि ते नानाविध आहेत.अगदी गंमत वाटावी असे सुद्धा आहेत.जसे ओशोंच्या किती प्रेमिका होत्या? तसा त्यांनी एवढे तत्वज्ञान सांगुनही अनेक जण विचारतात की “ओशो यांचा स्वतःचा धर्म कोणता होता?” किंवा “ते कोणत्या धर्माचे अनुयायी होते?” अर्थात ओशों पारंपरिक धर्मांच्या चौकटीत मावण्यासारखे नाहीत. त्यांनी कोणत्याही एका धर्माबरोबर स्वतःला बांधून घेतले नव्हते. त्यांच्या मते खरा धर्म हा व्यक्तीच्या अंतर्मनातील/अंतर्जगतातील अनुभवांवर आधारित असतो. तो एका पंथाच्या वा धर्मग्रंथाच्या चौकटीत मर्यादित राहणारा नाही.
Osho Thoughts:ओशो विचार: जगण्याचे तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक ‘बुद्धत्वा’चा मार्ग !
ओशोंचे धर्मविषयक विचार—-
1. ओशो हिंदू होते का?
ओशोंचा जन्म भारतातील प्राचीन परंपरेतील जैन धर्मीय कुटुंबात झाला. पण त्यांचे विचार कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित राहिले नाहीत. हिंदूंमधील वेद, उपनिषदे, गीता यांचा सखोल अभ्यास त्यांनी जरुर केला होता. त्यांची प्रवचने बर्याच वेळा हिंदू धर्मातील वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित असायची. परंतु त्यांनी मूर्तिपूजा, अंधश्रद्धा व कर्मकांडांवर कठोर टीका केलेली आहे असे दिसते.
2. ओशो जैन धर्मीय होते का?
ओशोंवर बालपणी संस्कार हे जैन धर्माच्या मुनींच्या शिकवणींचे झाले होते.हे अगदी सहज आहे.त्यांचा प्रभाव ओशोंच्या विचारांवर होताही. अहिंसा, ध्यान,सर्वसंगपरित्याग यांसारख्या संकल्पना त्यांनी जैन परंपरेतुन आत्मसात केल्या होत्या. पण जैन धर्मातील कठोर नियम व बंधनांशी ते सहमत नव्हते. ते मानत असत की कोणताही धर्म हा व्यक्तीला मुक्त करण्याऐवजी त्याला बंधनात अडकवतो.अगदी मार्क्सप्रमाणे हे अगदी स्पष्टपणे त्यांनी मांडलेले जागोजागी दिसते.
3. ओशो बौद्ध धर्मीय होते का?
ओशो रजनीश यांच्यावर गौतम बुद्धांच्या ध्यानसाधनेचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या प्रवचनांमध्ये झेन या पंथाचा बौद्ध धर्मासंबंधात उल्लेख वारंवार येतो. बुद्धांच्या ‘मग्ग’ (मार्ग)व ‘ ध्यान तंत्रां’वर त्यांनी सखोल विचार मांडलेले आहेत. बौद्ध धर्माच्या पुष्कळ संकल्पनांना त्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकारलेही दिसते. परंतु परंपरागत बौद्ध धर्माच्या नियमांना त्यांनी विरोध केलेला देखील दिसुन येतो.
4. ओशो इस्लाम धर्मीय होते का?
ओशो यांनी पैगंबर साहेबांच्या इस्लामसंबंधातील तत्त्वज्ञानावरही चर्चा केलेली दिसते.राबीया, सूफी परंपरेतील प्रेम व भक्तीपर विचारसरणी ओशोंना अधिक भावलेली दिसते . त्यांच्या प्रवचनांमध्ये रूमी, हाफिज व अन्य सूफी संतांचे उल्लेख वारंवार येतात.
5. ओशो ख्रिश्चन धर्मीय होते का?
ओशोंनी येशूंना एक महान आत्मज्ञानी व क्रांतिकारक व्यक्तिमत्त्व मानले आहे. ओशोंना येशु ख्रिस्ताच्या शिकवणींमधील प्रेम, दयाभाव प्रभावित करताना दिसतो. तरी ख्रिश्चन धर्मसंस्थेच्या नियमबद्धता किंवा शब्दप्रामाण्यावर ,पाखंडीपणावर ओशोंनी टीका केलेली दिसते.
ओशो मग कोणत्या धर्माचा मानत होते?
ओशो म्हणायचे की “मी कोणत्याही धर्माचा नाही, मी फक्त सत्याचा शोध घेणारा आहे.”म्हणुन त्यांना कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत पहाटे योग्य ठरणार नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘धर्म केवळ एक संकल्पना आहे ! जी माणसाला स्वातंत्र्य न देता बंधनात अडकवते.’
ओशो यांचे खरे तत्त्वज्ञान मग कोनते? – “ध्यान,प्रेम व स्वातंत्र्य”
1. ध्यान ही खरी साधना आहे असे ओशो सांगतात.त्यांच्या मते “ध्यान हाच खरे धर्म आहे.” कोणत्याही बाह्य कर्मकांडांपेक्षा अंतर्यात्रा ,आत्मशोध अधिक महत्त्वाचे आहे.
2. ओशोंची स्वतंत्र विचारसरणी: ओशो म्हणत की, ‘प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा मार्ग शोधला पाहिजे . कोणत्याही एका विचारांना आंधळेपणाने अनुसरु नये.
3. प्रेम व आनंद: ओशोंच्या मते जीवनाचा मुख्य उद्देश आनंद प्रेममय होणे हा आहे.
ओशोंच्या विचारांवरील वाद व टीका—
ओशोंच्या विचारांवर जगभरातील संस्थात्मक धर्मांनी टीका केली आहे. पारंपरिक धर्मसत्ता, पुरोहितवर्ग त्यांच्या अशा मुक्त विचारांमुळे त्यांना विरोध करत होते. पण त्यांचे विचार लाखो लोकांना भावले, प्रेरणा देणारे ठरले !
ओशोंचा प्रभाव व वारसा कोनता?—
आज जगभरात ओशोंचे लाखो अनुयायी,चाहते,फैन आहेत.भारतातील पुणे येथे ‘ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट‘ हे त्यांच्या ध्यान पद्धतींच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले केंद्र आहे. ओशोंची पुस्तके, प्रवचने दृश्य,श्राव्य स्वरुपात आजही अनेकांना मार्गदर्शन करत आहेत .
समारोप—
ओशोंनी कोणत्याही एका धर्माशी स्वतःला जोडून घेतले नाही. ते जीवनाच्या मूलभूत सत्याचा शोध घेणारे होते. त्यांच्या मते, खरा धर्म म्हणजे आत्मशोध, ध्यान व प्रेम आहे. त्यामुळे “ओशो कोणत्या धर्माचे होते?” या प्रश्नाचे उत्तर एकच आहे – ओशो कोणत्याही धर्माचे नव्हते. ते केवळ सत्य ,मुक्ती व स्वातंत्र्याचे पुजारी होते.
1. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट
2. ओशो यांच्या प्रवचनांचे व्हिडिओ
3. ओशो यांच्या पुस्तकांची यादी (गूगल बुक्स)
——