
Contents
- 1 पाकिस्तान काश्मीर साठी भारताबरोबर 10 युद्धे लढण्यास तयार ! पण एका लढाई नंतर शिल्लक राहिला तर ना ?
- 1.1 पाकिस्तान चे जनरल असिर मुनीर यांची ललकार !
- 1.1.1 शिरुर , दिनांक 15 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 पाकिस्तान : बडत्याला आधार काडीचा !
- 1.1.3 कांगावा करणे पाकिस्तान ची जुनीच सवय —-
- 1.1.4 पाकिस्तान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी —
- 1.1.5 पाकिस्तान Victim Card खेळण्यात पटाईत—
- 1.1.6 ट्रम्फ चीनला सोडत नाही तर पाकिस्तान काय चीज ? ट्रम्फ
- 1.1.7 अमेरिका आता कंगाल पाकिस्तान च्या पाठीशी राहु शकत नाही —
- 1.1.8 About The Author
- 1.1 पाकिस्तान चे जनरल असिर मुनीर यांची ललकार !
पाकिस्तान काश्मीर साठी भारताबरोबर 10 युद्धे लढण्यास तयार ! पण एका लढाई नंतर शिल्लक राहिला तर ना ?
पाकिस्तान चे जनरल असिर मुनीर यांची ललकार !
शिरुर , दिनांक 15 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
( Thanks to pixabay.com for Images in this content)

पाकिस्तान काश्मीर साठी भारताबरोबर 10 युद्धे लढण्यास तयार असल्याची ललकार पाकिस्तान चे जनरल असिर मुनीर यांनी दिली आहे . पण एका लढाई नंतर पाकिस्तान शिल्लक राहिला तर ! एवढे मात्र नक्की ! पाकिस्तान च्या रावळपिंडीत जनरल असिर मुनीर यांचे तापमान वाढले आहे. कारण काश्मीर चे तापमान या दिवसातच वाढत असते ! पण त्याचा फैलाव रावळपिंडीत बसलेल्या या पाकिस्तानी जनरलला होवुन तो ‘गरम’ झाला आहे हे नक्की. पण काय करणार बिचारा ? बिर्याणी तर सोडा पण दाल ,चावल ,आटा ,सब्बीला पाकिस्तान महाग झाला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानी सैनिक किमान उभे राहण्यासाठी तरी या वस्तुंची गरज पाकिस्तान सरकारला पडणार आहे. सर्वसामान्य पाकिस्तानी जनतेशी मात्र पाकिस्तानी लष्कराला कधी सोयरसुतक नव्हते. पाकिस्तानी लष्करातील अधिकार्यांची व्यक्तीगत संपत्ती मात्र करोडो रुपयांची असते. जेणेकरुन पाकिस्तानातुन कोनतीही क्षणी पळुन जावुन अमेरिकेत वास्तव्य करता यावे म्हणुन !
Read more>>
Lucky Bisht लकी बिश्त भारताच्या शत्रूंसाठी कर्दनकाळ ! वाचा ते कोण आहेत आणि काय करतात सविस्तर. …
पाकिस्तान : बडत्याला आधार काडीचा !
पाकिस्तान च्या बाबतीत ‘ बुडत्याला आधार काडीचा ‘ ही मराठीतील म्हण सध्या लागु पडत आहे. पाकिस्तान च्या बांगलादेश भेटी वाढत आहेत. बांग्लादेश मधुन एक फ्रंट उभा करुन भारतविरोधी कारवाया करता येतील का याची चाचपणी पाकिस्तान आर्मी करत आहे. गार पडलेल्या जैश ए मोहमद, लष्कर ए तोयबा यांसारख्या जिहादी गटांना पुन्हा सक्रिय करुन भारतात विशेषतः काश्मीर मधे कारवाया सुरुच ठेवण्याचे मनसुबे पाकिस्तान च्या लष्कराचे आहेत. लोक नियुक्त सरकार पाकिस्तान मधे केवळ ‘ बुजगावणे ‘ असते . सत्ता लष्कराच्या हातात असते. बांग्लादेश चे प्रमुख मोहमद युनुस यांच्या दारिद्यनिर्मुलन कार्याला नोबल पारितोषिक मिळाले. त्यातुन भारताने देखील काही घेण्यासारखे होते. भारताने त्यांचा उचीत सन्मान केला देखील ! पण त्यांनी समाजकारण च करणे योग्य ठरले असते. ते बांग्लादेश चे पंतप्रधान बनले. भरला माणुस ! पण पाकिस्तान, चीन ,अमेरिका, रशिया ,भारताच्याही गुप्तचर यंत्रणांच्या सापळ्यात सापडले ! त्यामुळे ते भारत विरोधी बनले.आणि बांग्लादेश च्या जनतेला वेठीस धरले गेले. बांग्लादेश मधुन पाकिस्तान व चीन च्या ‘इंटेलिजंट’ स नी ,’ शेख हसिना ‘ ड्रामा घडवुन आणला. भारतासारखा मित्र गमावला .भारताशी पंगा घेवुन बांग्लादेश सरकार ला परवडणारे नाही. त्याची निर्मितीच भारताने केली होती. हे ते विसरले. पुर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान मधे जमीन आसमान चे अंतर होते. बांग्लादेश मुक्तीच्या युद्धात पाकिस्तानी सैनिकांनी बांग्लादेश मधे घराघरात घुसुन लोकांना गोळ्या घातल्या होत्या. महिलांवर बलात्कार केले होते. त्यांना भारतीय सैनिकांनी वाचवले. 90 हजार पाकिस्तानी सैनिकांनाच पकडुन बंदी बनवले होते.जनरल नियाझी यांनी थेट भारतासमोर शरणागती पत्करली होती. पुर्व पाकिस्तान सुद्धा हातुन जाईल अशी अवस्था भारताने पाकिस्तान ची केली होती.
Read more >>
Worker’s Exploytation : कामगारांचे शोषण : रांजणगाव एम आय डी सी त नित्याचेच !
कांगावा करणे पाकिस्तान ची जुनीच सवय —-
आता जनरल असिर मुनीर हे खैबर पश्तुन मधील तेहरिक ए तालिबान, पाकिस्तान! अफगाणिस्तान नव्हे ! पाकिस्तानच्याच भागात असणारा छोटा गट असणारा हा पाकिस्तान विरुद्ध उठाव केल्याचे चित्र आहे. एक वर्षात पाकिस्तान चे 1500 सैनिक मारले गेले . या अंतर्गत युद्धात ! 17 पाकिस्तानी चौक्या सोडुन पाकिस्तानी सैनिकांना तेथुन पळुन जावे लागले. बाजोर सारखी महत्त्वाची पाकिस्तान ची चौकी देखील तेहरिक ए तालिबान ने कब्जात घेतली. नामुष्कीची हद झाली .
पाकिस्तान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी —
बलुचिस्तान हा पाकिस्थान चा भाग आहे. त्याची आपली स्वतःची अस्मिता व ओळख आहे. त्यांच्यावर सतत अन्याय पाकिस्तान ने केला. विकास केला नाही. म्हणुन ‘ बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ‘ ची निर्मिती झाली. तीने ही पाकिस्तान सरकार विरोधात दंड थोपडले. आपल्याच एका लष्करी अधिकार्याला संपवुन त्याचा ठपका बलुचिस्तान लिबरेशन आर्मी वर ठेवला. आणि बलुचींवर अत्याचार सुरु केले. या लढाईत पाकिस्तान चे 70 सैनिक कार झाले आहेत. पाकिस्तान चे तीन चार तुकडे होण्याची भीती जनरल असिर मुनीर यांना झोप येवु देत नाही.
Read more>>
गेट टुगेदर : खरचं अविस्मरणीय अनुभव !
पाकिस्तान Victim Card खेळण्यात पटाईत—
या सर्व घटनांमागे भारतीय गुप्तचर संस्था RAW असल्याचा दिंडोरा पाकिस्तान जगभर पिटु लागला.पण कोणी मदतीस पुढे येईना ! 1971 साली असाच दिंडोरा पाकिस्तान ने पिटला होता. संयुक्त राष्ट्रसंघात भारत विरोधी ठराव आणला होता. पण भारताचा मित्र रशियाने नकाराधिकार Veto वापरला. तेव्हा अमेरिका भारत विरोधी होता. आपल्या नौदलाच्या सातव्या आरमाराची मदत पाकिस्तान साठी पाठवु लागला होता. पण रशियाने देखील भारताच्या बाजुने आपली लष्करी जहाजे समुद्रातुन भारताच्या दिशेने रवाना करायची तयारी केली. जागतिक तिसर्या महायुद्धाचा भडका उडेल ! अन्वस्र युद्ध अमेरिका व रशिया या महासत्तांमधे होईल. असा जागतिक दबाव अमेरिकेवर पडला. तेव्हा अमेरिकेने माघार घेतली. भारतानेच प्रथम बांग्लादेश ला एक देश म्हणुन मान्यता दिली.
ट्रम्फ चीनला सोडत नाही तर पाकिस्तान काय चीज ? ट्रम्फ

अमेरीकेला पुन्हा ‘ महान ‘ राष्ट्र बनवण्याची वाच्यता ट्रम्फ यांनी केली. याचा अर्थ अमेरिकेचे महासत्ता पद दोलायमान झाले असा होतो. युक्रेन युद्ध काही संपेना ! अमेरिका व नाटो देशांना फार काळ युक्रेन ला मदत करणे परवडणारे नव्हते. झेलेंस्की काही हार मानायला तयार नाहीत. रशियाने आपली एक्सपायर झालेली शस्त्रे या निमित्ताने संपवली. युक्रेन जमिनदोस्त झाला. हमास व इस्राईल युद्ध सुद्धा चालुच राहिले. याला इराणने हातभार लावला आहे. त्यामुळे ट्रंफ संतापले आहेत. चीनला दम देऊ लागले आहेत. बेकायचा अमेरिकेत राहणार्या भारतीयांना बेड्या ठोकुन भारताकडे हाकलुन दिले. तरी मोदी ट्रम्फ मैत्रीत फरक पडला नाही. तसे करणे भारताच्या हिताचे नव्हते. मोदींनी मुत्सद्देगिरीचा प्रत्यय दिला.
अमेरिका आता कंगाल पाकिस्तान च्या पाठीशी राहु शकत नाही —
भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हे अमेरिकेलाच काय पण चीनलाही टक्के ठावुक आहे. म्हणुन चीन भारताशी संघर्ष टाळतो आहे. आजचा भारत 1962 चा भारत नाही.याची जाणीव चीन सारख्या धुर्त देशाला नाही.असे होवु शकत नाही. भारताकडे अणुबाम्ब व लांब पल्याची क्षेपणास्रे आहेत. हे चीनला माहित आहे. आणि भारतात सध्या असलेले सरकार हे किलर इंस्टिंक्ट असणारे आहे.
एकुणच भारताच्या भितीपोटी , आर्थिक दैन्यावस्था , दुसरीकडुन पुर्वीप्रमाणे मदत मिळण्याची शक्यता कमी होणे, तेहरिक ए तालिबान व बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलेले उठाव अशा अनेक बाबी पाकिस्तान चे अस्तित्व च संपवु शकतात. अशा एका निराशेच्या अवस्थेत जनरल असिर मुनीर यांनी हा ललकार केला आहे. लष्कर प्रमुखाला असेच बोलावे लागते. नाही तर सैनिकांचे व जनतेचे देखील मनोधैर्य ढळते. या दृष्टीने त्यांचे वक्तव्य समजुन घेता येईल. पण 10 युद्धे मात्र जरा अतीच झाले ! एक लढले तरी दुसरे लढण्यासाठी पाकिस्तान अस्तित्वात असणे आवश्यक आहे. अशी आजची पाकिस्तान ची अवस्था नक्कीच आहे.