पत्नी पंजाबी ड्रेस घालते म्हणून तिला पोळपाटाने मारले ! पतीवर गुन्हा दाखल!
पत्नी पंजाबी ड्रेस घालते म्हणून पोळपाटाने मारले आहे.या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसर्या घटनेत चुलत्याने भाडेकरुचे प्रांपचिक सामानाचे नुकसाण केले आहे. या दोन्ही घटनांचा गुन्हा रांजणगांव गणपती एम आय डी सी पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रांजणगांव पोलिस करत आहेत.
पत्नी पंजाबी ड्रेस घालते म्हणून तिला पोळपाटाने मारले ! पतीवर गुन्हा दाखल!
दुसर्या घटनेत चुलत्याने प्रांपचिक सामानाचे नुकसाण केले !
शिरुर,रांजणगाव , दि. 8 जुलै : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून )
पत्नी पंजाबी ड्रेस घालते म्हणून पोळपाटाने मारले आहे.या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसर्या घटनेत चुलत्याने भाडेकरुचे प्रांपचिक सामानाचे नुकसान केले आहे. या दोन्ही घटनांचा गुन्हा रांजणगांव गणपती एम आय डी सी पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रांजणगांव पोलिस करत आहेत.
पत्नीने पंजाबी ड्रेस घालणे पतीराज्यांना नाही आवडत….
याबाबबत हकिकत अशी आहे की दिनांक 05/07/2024 रोजी सकाळी 08:00 वाजण्याच्या सुमारास खंडाळे ,तालुका- शिरुर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत सौ. प्राजक्ता जयसिंग दरवडे या राहत आहेत.त्यांचे वय- 32 वर्षे, धंदा क्लासेस घेणे, रा. खंडाळे, ता. शिरुर, जि पुणे आहे. यांना वर नमूद केले तारखेस , वेळेस व ठिकाणी ‘तु सारखा सारखा पंजाबी ड्रेस का घालतेस? साडी घाल’ असे फिर्यादीचे पती म्हणाले.
Dr.Nitin Pawar,Editorial, Shirur.
‘संपादकिय टच’….
घरेलु हिंसा , Domestic Violence ला आपल्या समाजातील विशेषतः महिलांना सामोरे जावे लागते.लैंगिक आधारावरील ही हिंसा असते.किंवा तत्सम कृत्ये असतात.उदाहरणार्थ स्रीने सकाळी लवकरच उठले पाहिजे. स्री ने नवर्यासमोर,दिरासमोर ,किंवा सासर्यासमोर मोठ्याने बोलू नये इ . हे घरोघरी आहे.साध्या साध्या या घटना असतात.पण काही वेळेस गंभीर स्वरुप धारण करतात.या पद्धतीचा हिंसाचार, अत्याचार जणु अन्याय नसतोच ! अशी पुरुषी मानसिकता समाजात अस्तित्त्वात आहे. यावर कधी कोणी गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे हे चालुच असतात.
स्रियांमधे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढणे व स्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनणे हा त्यावरील उपाय आहे. सरकार यावर गंभीर नाही. कशाकशावर सरकारने गंभीर रहावे ? नागरिक लोकशाहीत सर्वोच्च असतात.म्हणून नागरिकांची जबाबदारी /कर्तव्ये देखील सर्वोच्च असतात.
पोळपाटाने मारो,लाटण्याने मारो किंवा गालात चापट मारो ! हे स्री म्हणुनच आहे.असते. इथे फिर्यादी स्री जागृत आहे.म्हणून किरकोळ म्हणून सोडून देत नाही. हे आवश्यक आहे. समाजातील इतर स्रियांनी देखील आपल्यावर किरकोळ जरी अन्याय झाला तरी जागरुकतेने त्याबाबत जाब विचारला पाहिजे.महिला मंडळे,बचत गट,भिसी ,सण,उत्सव, लग्न समारंभ इ.निमित्ताने महिला एकत्र येत असतात. तिथे जागरुक महिलांनी प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले पाहिजेत.
दुसर्या घटनेत भाडेकरुचा दोष काय? पण गप्प बसावे लागते.तो लांबून कामासाठी आलेला असतो.स्थानिकांची भिती वाटते.याचा गैरफायदा घेतला जातो.घर जाळणे हा गुन्हा आहेच.पण नात्यांतील भांडणे नात्यांतच राहावीत.त्याचा राग भाडेकरुवर सर्रास काढला जातो.हे थांबले पाहिजे. बर्याच वेळा कायदे माहितही असतात.पण ते कायदे राबवणार्यांचा धाक नसतो.हे मग असेच चालते.आंधळं दळतयं आणि कुत्रं पिठ खातयं ! असे रामभरोसे चालुच राहते. म्हणून व्यवस्थेत हस्तक्षेप करणारे कार्यकर्ते,बातमीदार,पत्रकार,समाजसेवक, स्वयंसेवक यांची नितांत आवश्यकता आहे.
— संपादक , डा. नितीन पवार, शिरूर.
पोळपाटाने मारले पत्नीला?…
सौ. प्राजक्ता जयसिंग दरवडे, वय – 32 वर्षे, धंदा क्लासेस घेणे, राहणार- खंडाळे, तालुका – शिरुर ,जिल्हा- पुणे यांना आरोपी पती जयसिंग संपत दरवडे ,राहणार, खंडाळे, तालुका,शिरुर ,जिल्हा – पुणे, यांनी 05/07/2024 रोजी सकाळी 08/00 वाजण्याचा सुमारास खंडाळे ,तालुका . शिरुर ,जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत राहत्या घरी हाताने व अन्य पद्धतीने मारहाण केली. तांच्या आईवडिलांना शिवीगाळ दमदाटी केली. स्वयंपाक घरातील चपाती लाटण्याच्या लाकडी पळपोटाने सौ.दरवडे यांच्या डोक्यात मारहाण करुन दुखापत केली आहे.
पतीवर गुन्हा दाखल. …
म्हणुन सौ.प्राजक्ता दरवडे यांनी पती जयसिंग संपत दरवडे यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद रांजणगाव गणपती एम आय डी सी पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. पती जयसिंग संपत दरवडे राहणार- खंडाळे ,तालुका – शिरुर, जि पुणे यांच्यावर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 118(1), 115(2),352,351 (2).(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार मोरे हे करत आहेत.
बंद खिडकीवाटे घरात शिरले आरोपी ….
तर शिरुर तालुक्यातील दुसर्या एका घटनेत रांजणगांव गणपती, तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीतील जमीन गट नं. ७०९ ८ ६४६ मधील मोरेश्वर भुजबळ , वय -३८ वर्षे, व्यवसाय- लेबर कॉन्ट्रॅक्टर, रा. भुजबळ वस्ती, रांजणगाव गणपती ,तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे यांच्या मालकीच्या व ताबा, वहिवाटीस असलेल्या १५ बाय ३० फुट लांबी रुंदीचे विट बांधकाम व पत्रा शेड मध्ये भाडयाने रहाण्यास असलेल्या अनिल चौधरी याच्या बंद घरात खिडकीवाटे त्यांचे चुलते बापुसाहेब रामभाउ भुजबळ हे शिरले.ते केशव नगर, मुंढवा, पुणे येथे राहतात . यांनी काहीतरी टाकुन घर व आतील प्रांपचिक सामान पेटवुन नुकसाण केले.
म्हणुन मोरेश्वर भुजबळ यांनी चुलते बापुसाहेब रामभाउ भुजबळ यांच्या विरूद्ध कायदेशीर फिर्याद रांजणगाव पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. रांजणगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.”
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com