पेठ येथील अंगणवाडी क्र. २१६ मध्ये ज्येष्ठ नागरिकांनी बालकांना गुड मॅनर्स व स्वच्छतेचे धडे दिल्याचा उपक्रम
Contents
Hygiene, Discipline आणि Etiquette वर Practical Guidance; ग्रामीण भागातील Unique Educational Initiative
पेठ,ता. वाळवा, दिनांक 5 एप्रिल 2026 : प्रतिनिधी

Peth Anganwadi पेठ, ता. वाळवा येथे ज्येष्ठ नागरिकांनी लहान बालकांसाठी संस्कार आणि शिस्तीचे धडे देत एक आगळावेगळा उपक्रम राबविला. “ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचे ज्ञानभांडार” या विचाराला साजेसा हा उपक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, पेठ यांच्या वतीने आयएसओ मानांकन प्राप्त अंगणवाडी क्र. २१६ येथे पार पडला.
‘आऊट ऑफ बॉक्स’ पद्धतीने घेण्यात आलेल्या या सत्रात गुड मॅनर्स, एटिकेट्स आणि स्वच्छतेचे महत्त्व मुलांना संवादातून आणि प्रात्यक्षिकातून समजावून सांगण्यात आले. अशा प्रकारचे बालविकास कार्यक्रम देशभरातील अंगणवाड्यांमध्ये राबविले जातात, याची माहिती सम्बन्धीत (खाली लिंकस पहा) संकेतस्थळावर पाहायला मिळते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठांनी बालकांशी मनमोकळा संवाद साधत स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली. अंगणवाडी सेविका सौ. माने यांनी “दात स्वच्छ घासावे, हात स्वच्छ धुवावे” या संदेशावर आधारित गीत मुलांकडून सादर करून घेतले. त्यानंतर “दात का घासावे?” आणि “हात स्वच्छ का धुवावे?” या प्रश्नांवर मुलांनी दिलेली निरागस उत्तरे उपस्थितांना भावली.
एका बालकाने “आम्ही शेतात काम करतो, म्हणून हात धुवायला पाहिजे” असे सांगत स्वच्छतेची जाणीव व्यक्त केली. बालकांमधील स्वच्छतेच्या सवयींचे महत्त्व देखील अधोरेखित केले आहे.
गुड मॅनर्सचे प्रात्यक्षिक हा या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला एक मुलगा! एका मुलाच्या हातातील पाण्याची बाटली इतर मुलांनी थेट घेतल्यावर ज्येष्ठांनी नम्रपणे विनंती करून वस्तू कशी घ्यावी, याची योग्य पद्धत दाखवून दिली. तसेच वस्तू घेतल्यानंतर आभार मानण्याचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.
या माध्यमातून मुलांना दैनंदिन आयुष्यातील शिष्टाचार सहजपणे शिकता आले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व देखील अधोरेखित होते .
कार्यक्रमात सांस्कृतिक वातावरणही अनुभवायला मिळाले. एका बालकाने विठ्ठलाचे भजन सादर केले. तर ज्येष्ठ सदस्य श्री. मदन पवार यांनी राष्ट्रगीत सादर करून देशभक्तीची भावना जागृत केली. मुलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत वातावरण आनंदी केले.
मुलांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करण्यात आले आणि त्यांच्या जिज्ञासेला चालना देण्यात आली. “तुम्हाला मजा आली का?” या प्रश्नावर मुलांनी दिलेला उत्साही प्रतिसाद आणि “तुम्ही बोअर झाला का?” या प्रश्नावर त्यांनी दिलेले हसरे उत्तर यामुळे वातावरण हलके-फुलके झाले. दरम्यान, एका विद्यार्थ्याचा वाढदिवस असल्याने मुलांचे लक्ष केककडे लागले होते. त्यामुळे कार्यक्रमात आनंदाची भर पडली.
हा उपक्रम संघटनेचे अध्यक्ष श्री. सर्जेराव जाधव ( आण्णा ), सचिव श्री. श्रीरंग कदम (गुरुजी) व ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. शांताराम देशमाने (बापू) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला . यामध्ये डॉ. मुसा जमादार, श्री. ताजुद्दीन जकाते, श्री. आर. के. पाटील (बापू) व श्री. मदन पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमाची माहिती फोटोसह सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे कळविण्यात आली असून, या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या Peth Anganwadi Good Manners Training उपक्रमाची माहिती फोटोसह सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे कळविण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारचे उपक्रम राबविणे ही काळाची गरज असून, यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर Peth Anganwadi Good Manners Training सारखे उपक्रम ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. लहान वयातच मुलांना शिस्त, स्वच्छता आणि सामाजिक मूल्यांचे शिक्षण दिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होतो. अशा प्रकारचे उपक्रम केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त ठरतात. त्यामुळे भविष्यात अधिक अंगणवाड्यांमध्ये अशा उपक्रमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
या उपक्रमातून स्पष्ट होते की Peth Anganwadi Good Manners Training ही संकल्पना ग्रामीण भागातही प्रभावी ठरू शकते. बालवयातच चांगल्या सवयी आणि शिस्त लावल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनते. अशा प्रकारचे उपक्रम शिक्षणासोबत संस्कारांची जोड देतात. जे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात अशा उपक्रमांचा विस्तार होणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
या उपक्रमामुळे Peth Anganwadi Good Manners Training हा आदर्श प्रकल्प ठरत असून, इतर गावांसाठीही प्रेरणादायी उदाहरण बनत आहे.
अधिक माहितीसाठी लिंक्स (Authoritative):
- https://icds-wcd.nic.in/
- https://www.unicef.org/india/early-childhood-development
- https://www.who.int/health-topics/hygiene
Read more >>>>>
Aadivasi Girl School News :आदिवासी कन्या छात्रालयात ;पूर्णिमा; फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम!
