‘प्लास्टिकचा तांदुळ’ रेशनिंग दुकानांत ? रांजणगाव गणपती येथे ‘आप’ चे अनिल डांगे यांची ‘ धाड ‘ !
'प्लास्टिकचा तांदुळ' रेशनिंग दुकानांत दिला जातो,अशी माहिती मिळाली. त्यानंतर रांजणगाव गणपती येथे 'आप' चे अनिल डांगे यांनी ' धाड ' च जणु टाकत 'प्लास्टिकचा तांदुळ' हे सत्य की मिथक ? हे शोधण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.
‘प्लास्पिकचा तांदुळ’ रेशनिंग दुकानांत दिला जातो, अशी माहिती मिळाली. त्यानंतर रांजणगाव गणपती येथे ‘आप’ चे अनिल डांगे यांनी ‘ धाड ‘ च जणु टाकत ‘प्लास्टिकचा तांदुळ’ हे सत्य की मिथक ? हे शोधण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.
‘प्लास्टिकचा तांदुळ’ रेशन दुकानात? ..
‘रांजणगाव गणपती परिसरात रेशनिंग दुकानातुन प्लास्टिक तांदूळ मिळतोय ..’ अशी कुजबुज आम आदमी पार्टी चे पुणे जिल्हा प्रवक्ते श्री.अनिल डांगे यांना मिळाली. दि-२९ जून २०२४ रोजी रांजणगाव गणपती परिसरातील रेशन धारक नागरिकांच्या ‘रेशन दुकानातून प्लास्टिक तांदूळ मिळतोय ‘ अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी ‘सत्यशोधक न्यूज’, न्युज पोर्टलला प्राप्त झाल्या होत्या.
तांदुळाचे एक परिक्षण !
त्यानुसार ‘सत्यशोधक न्यूज’ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष दुकानावर भेट देऊन सदर प्रकरणाची शहानिशा करत असताना मिळालेल्या माहितीचा हा स्पेशल रिपोर्ट..तसे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. की ते दाखवतात की खरा तांदुळ आणि प्लास्टिकचा तांदुळ हे मिक्स करुन विकले जात आहेत. नफेखोरी ही वृत्ती आज किती खालच्या लेवलला पोचली आहे, हे यातुन समजते. हे प्लास्टिक खाणार्याच्या शरीरात गेल्यानंतर काय पुढे उभे ठाकणार आहे ? याची आपण कल्पना करु शकतो !
रांजणगाव गणपती येथील एक रेशन दुकान.
रेशन धारकांना आली होती शंका?
रांजणगाव गणपती रेशन लायसन धारक दुकानदार १६८/०२ मालक – एन.आर. कटारिया यांच्या दुकानातुन रेशन घेतलेल्या अनेक रेशन धारकांना शंका आली होती. (रांजणगाव गणपती ) एका ग्राहकाला त्यांनी रेशन तांदूळ घरी घेऊन गेल्यानंतर शंका आली. त्यांनी ‘सत्यशोधक न्यूज’ ला संपर्क साधत प्रतिक्रिया दिली आहे.
” सदर दुकानातून तांदूळ मी घरी घेऊन गेल्यानंतर ,बायकोला तो तांदूळ धुण्यासाठी लावला तर त्यातले काही तांदूळ पाण्यावर ” तरंगत असताना आढळले..! ” गोरगरिबांच्या मुखी जाणार हा घास, शाळेतील मुलांना सकस आहाराच्या नावाखाली दिला जाणारा हा तांदूळ त्यांच्या आरोग्याशी खेळत तर नाही..ना”..!! ” असे वाटायला लागले ! या शंकेमुळे मी संबंधित गोष्टीची शहानिशा करायची ठरवली . त्यानुसार सत्यशोधक न्युज ला संपर्क साधला.” – —- रेशन कार्ड धारक,रांजणगाव गणपती.
अनेक रेशनकार्ड धारक व्यक्तीकडून मिळालेल्या तक्रारी नंतर आम्ही संबंधित गोडाऊन जे आम्हाला रेशन धान्य देते त्या ठिकाणी असणाऱ्या रावसाहेब व इतर अधिकारी यांना माहिती विचारले असता त्यांनी सांगितले ” प्लास्टिक तांदूळ वगैरे काही , नाही लोकांचे गैरसमज आहेत .!!” —
तर रेशन लायसन्स धारक दुकानदार -राजू कटारिया यांनी सांगितले आहे.
” सदर दुकानांना वितरित होणारा तांदूळ हा प्लास्टिकचा नसून फर्टीलायझर केलेला आहे . त्या तांदळा मधले पोषणमूल्य अधिक वाढविण्यासाठी काही प्रमाणात तो त्या तांदळामध्ये असतो . त्यासंबंधीचा व्हिडिओ सरकारने जाहीर केलेला असून आपल्या शंकेचे निरसन होण्यासाठी संबंधित आणि तो व्हिडिओ अवश्य पहावा..!”
व्यवस्थापक रावसाहेब अनिल लाटे –
“शिरूर तालुक्यातील काही भागातून प्लास्टिक तांदूळ बाबत तक्रार झाल्यानंतर आम्ही संबंधित तांदूळ संकलित करून प्रयोगशाळेत तांदूळ पाठवला असता तो तांदूळ प्लास्टिकचा नाही असे सिद्ध झाले आहे..!!”
सदर वितरित होणारा तांदूळ हा प्रक्रिया केलेला आहे . उत्तम दर्जा असणारा आहे. त्यामुळे नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये..!!-
–पुरवठा अधिकारी, शिरूर, श्री. सतीश पंचरास.
” मागील काही दिवसांमध्ये प्लास्टिक तांदूळ बाबत तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार संबंधित ठिकाणी तपासणी पथक पाठवले असता, कुठल्या स्वरूपाचा प्लास्टिक तांदूळ वगैरे असे काही आढळले नाही..!! नागरिकाचा गैरसमज दूर होण्यासाठी संबंधित दुकानावर तपासणी पथक पाठवू..!! नागरिकांनीअफवांवर विश्वास ठेवू नये..!!
” तहसीलदार,शिरूर मस्के. या आहेत प्रतिक्रिया !
‘प्लास्टिकचा तांदुळ’ वर दक्ष ठेवा…
या सर्व संबंधित रेशन धारक ग्राहक , दुकानदार संबंधित अधिकारी यांच्या प्रतिक्रिया नंतर असे लक्षात येते की व संबंधित दुकानात जाऊन ‘ सत्यशोधक न्यूज प्रतिनिधी’ यांनी पाहणी केल्यानंतर असा निष्कर्ष निघतोय तो प्लास्टिक तांदूळ नसून खाण्यायोग्य असा तांदूळ आहे. हे फक्त या दुकानाबाबत आजची माहिती आहे . मात्र नागरिकांनी या प्रकारावर लक्ष ठेवावे. संबंधीत अधिकार्यांनी खास लक्षात ठेवावे. आम्ही लक्ष ठेवून आहोत. नागरिकांनी काही शंका आल्यास ‘सत्यशोधक न्युज’ घ्या 7776033958 / 81492 32235 वर संपर्क करावा.
याआधी आम्ही शिरुर वार्ता यु ट्यूब चेनलला एक short केला होता. त्यात असली तांदुळ व प्लास्टिकचा तांदुळ यातला फरक एका महिलेने दाखवत प्लास्टिकच्या तांदुळाचा पुरावाच दिला होता !
खालील लिंकवर क्लिक करून तो पहावा…
तसेच आपल्या भागातील विविध प्रश्नांसाठी ,बातम्यांसाठी संपर्क ही करा, असे आम्ही आवाहन करतो. आम्ही सदर विषयाची सत्य शोधून नक्कीच त्याचा पाठपुरावा करू.
एकंदरच विषय विचार करायला लावणारा आहे. शरिरात प्लास्टिक गेले तर लिव्हर , किडनी सह अनेक घातक परिणाम शरिरावर होतात. हा जिवाशी खेळ असु शकतो. म्हणून या संबंधी जास्त जागरुकता नागरिकांनी बाळगली पाहीजे, हेच खरे !
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com