
Contents
- 1 PMPLM Bus Travelling Now Costly :पीएमपीएमएल बसच्या दरवाढीवर ‘आप’चा जोरदार विरोध,स्वस्त सार्वजनिक वाहतुकीसाठी संघर्ष!
- 1.0.1 PMPLM Bus Travelling Now Costly मुळे स्वारगेट चौकात ‘आप’तर्फे निदर्शने—-
- 1.0.2 PMPLM Bus च्या दरवाढीची सविस्तर माहिती अशी—
- 1.0.3 ‘आप’चा मुद्दा : दरवाढ नव्हे, सुविधा वाढवा—-
- 1.0.4 स्वस्त किंवा मोफत प्रवासाचा पर्याय?—-
- 1.0.5 प्रशासनाचे स्पष्टीकरण आणि ‘आप’चा विरोध—
- 1.0.6 ‘आप’चा इशारा : निर्णय मागे घ्या नाहीतर तीव्र आंदोलन—-
- 1.0.7 उपस्थित नेते आणि कार्यकर्ते—-
- 1.0.8 निष्कर्ष असा—-
- 1.0.9 About The Author
PMPLM Bus Travelling Now Costly :पीएमपीएमएल बसच्या दरवाढीवर ‘आप’चा जोरदार विरोध,स्वस्त सार्वजनिक वाहतुकीसाठी संघर्ष!
Pune News 20 May 2025:
( Satyashodhak News Report)
PMPLM Bus Travelling Now Costly ! होय हे गरज आहे. पुणे शहरात PMPLM Bus Travelling करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक मोठी चिंता उभी राहिली आहे. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पीएमपीएमएलने तिकीट दरात मोठी वाढ केली असून, या दरवाढीला आम आदमी पार्टी (आप) ने तीव्र विरोध केला आहे.
PMPLM Bus Travelling Now Costly मुळे स्वारगेट चौकात ‘आप’तर्फे निदर्शने—-
आज सकाळी स्वारगेट चौकात ‘आप’तर्फे निदर्शने करण्यात आली. त्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध करताना PMPLM Bus Travelling च्या दरवाढीमुळे सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसेल, असा इशारा दिला.
PMPLM Bus च्या दरवाढीची सविस्तर माहिती अशी—
• किमान तिकीट: ₹५ वरून थेट ₹१०
• दैनिक पास: ₹४० वरून ₹७०
• मासिक पास: ₹९०० वरून ₹१५००
ही दरवाढ पुण्यातील रोजंदारीवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांसाठी आर्थिकदृष्ट्या मारक आहे. विशेषतः PMPLM Bus Travelling वर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि कामगारांसाठी हे अतिशय अडचणीचे ठरणार आहे.
‘आप’चा मुद्दा : दरवाढ नव्हे, सुविधा वाढवा—-
‘आप’च्या म्हणण्यानुसार, ही दरवाढ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरास अडथळा ठरेल. नागरिक खासगी वाहने वापरण्याकडे वळतील, ज्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी व प्रदूषण वाढेल. पुणे आधीच जगातील चौथ्या क्रमांकाचे वाहतूक कोंडीचे शहर आहे.त्यामुळे प्रशासनाने PMPLM Bus Travelling अधिक सोयीस्कर व किफायतशीर ठेवण्याचे धोरण राबवावे, अशी मागणी ‘आप’ने केली आहे.
स्वस्त किंवा मोफत प्रवासाचा पर्याय?—-
लक्झेमबर्ग, माल्टा, फ्रान्स, इटली व ब्राझीलसारख्या देशांमध्ये सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात आली आहे. त्यांचा उद्देश नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा हा आहे.
सार्वजनिक वाहतूक मोफत करणारे देश – Wikipedia
त्याच धर्तीवर, पुणे महापालिकेने देखील PMPLM Bus Travelling चे दर वाढवण्याऐवजी, खर्चाची जबाबदारी स्वतः घ्यावी, असे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे.
प्रशासनाचे स्पष्टीकरण आणि ‘आप’चा विरोध—
प्रशासनाच्या मते, ही दरवाढ PMPLM Bus Travelling सेवेस लागणाऱ्या वार्षिक तोट्यामुळे आवश्यक होती. मात्र ‘आप’च्या मते हा तोटा व्यवस्थापनातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचारामुळे आहे. त्यामुळे प्रवाशांवर बोजा टाकण्याऐवजी, अधिक बसेस रस्त्यावर आणाव्यात, एंड-माईल कनेक्टिव्हिटी सुधारावी, आणि कमाईचे पर्यायी स्रोत निर्माण करावेत.
‘आप’चा इशारा : निर्णय मागे घ्या नाहीतर तीव्र आंदोलन—-
आंदोलनादरम्यान ‘आप’ने जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की, ही दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी. अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
उपस्थित नेते आणि कार्यकर्ते—-
राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, वाहतूक आघाडीचे सेंथिल अय्यर, निलेश वांजळे, नौशाद अंसारी, उमेश दीक्षित, सुभाष करांडे आदींसह अनेक कार्यकर्ते स्वारगेट येथे उपस्थित होते.
निष्कर्ष असा—-
PMPLM Bus Travelling ही केवळ प्रवासाची गरज नसून, शहराच्या पर्यावरणीय आणि आर्थिक समतोलासाठी अत्यंत आवश्यक सेवा आहे. त्यासाठी दरवाढीऐवजी सुविधांमध्ये गुंतवणूक करणे हेच सरकारचे व प्रशासनाचे खरे कर्तव्य ठरेल.
जर तुम्हाला सार्वजनिक प्रवास व पर्यावरण या विषयांवर आणखी माहिती हवी असेल, तर खालील लिंकला भेट द्या:
Centre for Science and Environment – Public Transport
Smart Cities Mission – Pune
पुढील बातम्यांसाठी भेट द्या—-
satyashodhak.blog
जर या बातमीबद्दल तुमचे जे मत असेल, तर आम्हाला comment box मधे लिहुन कळवा !