
Contents
- 1 150 Kotincha Hawa Mahal: हा तर युती सरकारचा दीडशे कोटीचा हवामहाल! – ‘आप’चा सरकारवर घणाघात!
150 Kotincha Hawa Mahal: हा तर युती सरकारचा दीडशे कोटीचा हवामहाल! – ‘आप’चा सरकारवर घणाघात!
Politics News 22 April 2025: (सौ.कल्पना पुडे यांच्याकडुन)
150 Kotincha Hawa mahal: चोंडी येथे २९ एप्रिल – अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.मात्र यासाठी केवळ दोन-तीन तासांच्या कार्यक्रमासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जाणार आहे. हे सगळं तात्पुरत्या स्वरूपाचं असूनही ‘भव्यदिव्य’ उभारण्यात येणार आहे.

वातानुकूलित शामियाना, ग्रीन रूम्स, स्टेज, सीसीटीव्ही, जनरेटर—
या बैठकीसाठी वातानुकूलित शामियाना, ग्रीन रूम्स, स्टेज, सीसीटीव्ही, जनरेटर अशा अनेक सुविधा केवळ तीन दिवसांत उभ्या राहणार आहेत. यांचा वापर केवळ काही तासांसाठीच होणार आहे.ही बैठक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी आयोजित करण्यात आली आहे. मध्यप्रदेश सरकारने इंदूर येथे घेतलेल्या बैठकीच्या धर्तीवरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more >>
What’s App Var Seva : महाराष्ट्र सरकार करणार 500 सरकारी सेवा व्हाट्स अपवर उपलब्ध !
खर्चावर टीकेची झोड उठली आहे–
मात्र या खर्चावर टीकेची झोड उठली आहे.
“हा तर युती सरकारचा दीडशे कोटींचा हवामहाल आहे, जो दोन तासात हवेत विरून जाणार आहे,” अशी सडकून टीका आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांची सडकून टीका —
ते पुढे म्हणाले “राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. शाळांचे काम, एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, शिष्यवृत्तीचे पैसे, परिपूर्ण शिक्षणाचा अभाव – हे सगळं प्रलंबित आहे. अशा वेळी केवळ प्रसिद्धीसाठी एवढा मोठा खर्च करणे म्हणजे जनतेच्या विश्वासाला तडा देणं आहे.”
Shinde Fadnavis Cold War : तर तुमचा टांगा पलटी करु – एकनाथ शिंदे !
कर्ज काढून दिवाळी–
“कर्ज काढून दिवाळी साजरी करण्यापेक्षा ही गिरीशिखरावर फुलं उधळण्याची सत्ताधाऱ्यांची वृत्ती आहे,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.आम आदमी पार्टीने सरकारला आवाहन केले आहे की, या तात्पुरत्या हवामहालावर वायफळ खर्च टाळावा आणि जनतेच्या खऱ्या गरजांकडे लक्ष द्यावे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३१ मध्ये काय वाचाल ..👇
• भारताच्या शासन संस्थेचे सर्वंकष आरिष्ट व त्याची क्रांतीकारक सोडवणुक…..
• शूर्पनखेच्या जनस्थानाचा काम्रेड शरद पाटील पुरस्कृत शोध…
• एक सांस्कृतिक युगप्रवर्तरक शाहिर गव्हाणकर….
मावळाई प्रकाशन ची पुस्तकें. …