
शिरूरमध्ये ३.५६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त – एकाला अटक
प्रतिबंधित गुटखा शिरुर मधे सर्रास विक्री.
शिरूर | दि. २५ जुलै २०२५ | प्रतिनीधी |
शिरूर पोलिसांची मोठी कारवाई – बुरुड आळी येथून ३.५६ लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा व तंबाखू जप्त. आरोपी रफिक शेख विरोधात गुन्हा दाखल. तपास सुरु.
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत बुरुड आळी येथील गुलमोहर अपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखू साठवणूक करून विक्रीसाठी ठेवलेल्या आरोपी रफिक चांद शेख (रा. गुलमोहर अपार्टमेंट, बुरुड आळी, शिरूर, जि. पुणे) यास पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
पोलिसांनी पो. हवा. संजु ज्ञानदेव जाधव (स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपीकडे एकूण ३,५६,७८१/- रुपयांचा गुटखा आणि तंबाखू आढळून आला. हे सर्व साहित्य विविध कंपन्यांच्या गोण्या व पुड्यांमध्ये भरलेले होते आणि तो विक्रीसाठी बाळगले होते.
या कारवाईत विमल, व्ही वन, गोवा १०००, जी-१, हिरा, रॉयल ७१७, डायरेक्टर स्पेशल, आरएमडी, रजनीगंधा, तुलशी रॉयल अशा अनेक नामांकित कंपन्यांचा गुटखा व तंबाखू जप्त करण्यात आला आहे.
हा माल महाराष्ट्र शासनाच्या अन्न व सुरक्षा मानके अधिनियम २००६ व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये बेकायदेशीर व आरोग्यास हानिकारक असल्याचे स्पष्ट आहे. आरोपीकडून सदर प्रतिबंधित माल विनापरवाना साठवून विक्रीसाठी ठेवल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेले कलम—-
भा.दं.स. १२३, २७४, २७५, २२३ सह
अन्न व सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम – २६(२)(i), २६(२)(ii), २६(२)(iv), २७(३)(d), ३०(२)(a)
या कारवाईचे तपास PSI शेळके यांच्याकडे असून गुन्हा दाखल अधिकारी पो. हवा. वाडेकर (2120) आहेत.
🔍 ही कारवाई पोलीस निरीक्षक संदेश केंजळे (शिरूर पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••
🔗 1. FSSAI – Food Safety Act Overview
2. India Code – Food Safety and Standards Act, 2006
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••••
शिरूर : होंडा शाईन मोटारसायकल चोरीला ! अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
https://shorturl.fm/9nnv9
https://shorturl.fm/mRq9O
https://shorturl.fm/Iuwph
https://shorturl.fm/RByeg
https://shorturl.fm/NhBYi
https://shorturl.fm/M12B9