
Contents
33 फुटी रस्ता अतिक्रमणांमुळे बंद पडला ! कोठे आणि का यावर आवाज उठवला गेला? ते वाचा सविस्तरपणे !
रस्ता अतिक्रमणांमुळे बंद पडल्याने ‘ महाराष्ट्र जमीन महसुल संहीता कायद्यानुसार अतिक्रमणे हटवा ! ‘— शेतक-यांची मागणी !
शिरुर ,दिनांक 12 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

33 फुटी रस्ता अतिक्रमणांमुळे बंद पडला आहे. हे कोठे आणि का घडले ? यावर आवाज उठवला गेला का ? ते वाचा सविस्तरपणे ! संबंधित रस्ता अतिक्रमणांमुळे बंद पडल्याने ‘ महाराष्ट्र जमीन महसुल संहीता ‘ कायद्यानुसार अतिक्रमणे हटवा अशी शेतक-यांची मागणी पुरंदर तालुक्याचे तहसिलदार विक्रम राजपूत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आले.
अतिक्रमणांमुळे रस्ता बंद पडला?
महाराष्ट्र जमीन महसुल संहीता कलम – १४२ व १४३ नुसार गावांच्या सिमेवरील रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवून रस्ते मुक्त करावेत.आणि नियमानुसार ३३ फुटी रस्ता सबंधीत शेतकरी बांधवांना ऊपलब्ध करुन मिळावा. असा अर्ज महेश जेधे व इतर शेतकरी बंधु निरा , शिवतक्रार , तालुका – पुरंदर जिल्हा – पुणे केला आहे.
Read more >>
उसतोड कामगार देतो म्हणुन 5 लाख 5 हजार रुपयांना गंडा घातला ! 420 पणा केला ! पुढे काय घडले ते वाचा.
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय Stay ते वाचा…..
तहसिलदार यांना लेखी निवेदन —
त्या अर्जात त्यांनी मागणी करताना ते म्हणतात, ‘
‘ शेतकरी आपणाला विनंती करतो की, खालील शिव रस्त्यावर १- निरा- शिवतक्रार व पिंपरे खुर्द थोपटे वाडी,
२- निरा – शिव तक्रार व 3. निंबूत तालुका- बारामती
यावर अतिक्रमण होऊन नियमानुसार ३३ फुटी असलेला रस्ता पुर्णतया संपुष्टात आला आहे. तो आपण मुक्त करुन द्यावा. यासाठी आपण किंवा महसुल आधिका-यांच्या मार्फत सदर रस्त्यांचा पंचनामा करावा. वस्तुस्थिती जाणुन घ्यावी. आणि शिवरस्ते मोकळे करुन दयावेत हि विनंती. या अर्जात केली आहे.
बारमाही शेतमालाची ने आण —

सध्या दोन्ही ठिकाणी शिवरस्ते ऊपलब्ध नाहीत. सबंधीत शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वाहतुकीची सुध्दा प्रचंड गैरसोय होत आहे. या भागातील सर्व क्षेत्र हे ओलीताखाली असल्यामुळे बारमाही शेतमालाची ने आण करावी लागत असते. आणि रस्ता ऊपलब्ध नसल्यामुळे वादविवाद आणि तक्रारी ही होतात. तरी वादविवाद व तक्रारी टाळण्यासाठी आपण लवकरात लवकर शिव रस्ते मोकळे करुन द्यावेत ही विनंती.
Read more >>
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात दि. २७-२८ डिसेंबर २०२४ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन !
सासवड या ठिणाणी निवेदन दिले —-
१) निरा शिव तक्रार येथील गावाच्या सीमेवरील रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवावेत. व रस्ते मुक्त करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देताना कलम 142 व 143 नुसार गावाच्या सीमेवरील रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवावत. रस्ते मुक्त करण्यासाठी आज नवीन प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देण्यात आले आहे.
शेतकरी बांधव महेश अण्णा जेधे, माणिकराव थोरात, अरविंद बापू जेधे, रियाज सय्यद, शंकर जेधे आदी शेतकऱ्यांनी हे निवेदन सादर केले.
रस्यांचा पंचनामा करावा —
नियमानुसार ते 33 फुटी रस्ता हा संबंधित शेतकरी बांधवांना खुला करून मिळावा. निरा शिव तक्रार, पिंपळे खुर्द, थोपटेवाडी, निरा शिव तक्रार ,निंबूत या ठिकाणचे अतिक्रमण जे झाले आहे. त्यासाठी तेथे 33 फुटी असलेला रस्ता पूर्णपणे संपुष्टात आला आहे. तो मुक्त करून द्यावा. यासाठी महसूल अधिकारी यांच्या मार्फत सदरील रस्त्याचा पंचनामा करावा . त्या ठिकाणची वस्तुस्थिती जाणून ते मोकळे करावेत. यासाठी हे रस्ते उपलब्ध नसल्याच्या संदर्भात, संबंधित शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. वाहतुकीची सुद्धा प्रचंड गैरसोय होत आहे. या भागातील सर्व क्षेत्र ओलिताखाली असल्यामुळे, 12 महिने शेतातील माल ने आणण्यासाठी खूप कसरत करावी लागते. रस्ता उपलब्ध नसल्याने वाद विवाद, तक्रारी या वाढत चालल्या आहेत. हे टाळण्यासाठी महसूल विभागाने लवकरात लवकर पंचनामा करून, हे रस्ते खुले करून द्यावे. असे आवाहन आम आदमी पक्षाचे पक्षाचे महेश अण्णा जेधे या शेतकऱ्याने केले आहे.
Read more >>
आज पुरंदर तहसिलदार यांना निवेदन देताना उपस्थित शेतकरी बांधव
मानिकराव थोरात, रियाज सय्यद,शंकर जेधे,अरविंद जेधे व महेश आण्णा जेधे इ. कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
एकंदरीत अतिक्रमण ही समस्या वाढत आहेच. पण गरीब असो वा श्रिमंत ! कायद्याचे उल्लंघन केले तर कारवाई आवश्यक असतेच.अतिक्रमण या विषयाला कांगोरे आहेत. त्यात माफिया, राजकारणी, बेकायदेशीर धंदे,जमीन कब्जा करणे. तेथे घरे, दुकाने, दारु, मटका, जुगार अड्डे बनवणे इ.गोरख धंदे चालवण्याची सोड होणे. ही एक ‘प्रेरणा’ असते.तर तेथे घरे,आपल्या बांधुन भाड्याने देणे. असा प्रकारही असतो.शेवटी त्याबाबतचा अधिकार असणारा काय निर्णय व का घेतो ? हे पाहणे कुतुहलच असते.