

Contents
कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात सर्व प्रशासकीय आणि तपास यंत्रणाच विकली गेल्याचे दिसते – मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी.
कल्याणीनगर कार अपघात प्रकरण : आमदाराचा काय व का रोल?
शिरुर, दि.28 मे : डा.नितीन पवार, संपादक.
कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात सर्व प्रशासकीय आणि तपास यंत्रणाच विकली गेल्याचे दिसते आहे . पुणेकरांच्या आवाज उठवण्यामुळे यावेळेस सर्वांवरच दबाव निर्माण झाल्यामुळे किमान काही गोष्टी समोर येत आहेत .
‘आप’ची कठोर टिका…
राज्याच्या एक्साईज विभाग, परवाना विभाग, वाहतूक पोलीस यंत्रणा, आरटीओ, अनधिकृत बांधकाम विभाग, पोलीस यंत्रणा, सरकारी वकील आणि आता फॉरेन्सिक तपासणी मंत्रणा,व ससुनची लब,डाक्टर या सर्वच अतिश्रीमंत आरोपीच्या मदतीसाठी धावून जात होते हे उघड झाले आहे . त्या सोबतीला संशयाची सुई एका आमदाराकडे पण आहे.
कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात काल काही पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आज रक्त तपासणी मध्ये पण फेरफार केले गेले असे आढळून आल्याने दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे . या सोबतच यंत्रणेतील अनेकजण ह्या घटनेला अप्रत्यक्ष जबाबदार आहेत. त्यांच्यावरही कामातील हलगर्जीपणाबद्दल गंभीर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे .
पुणेकर भ्रष्टाचाराने पोखरल्या गेलेल्या व्यवस्थेत !
पुणेकर एका भ्रष्टाचाराने पोखरल्या गेलेल्या व्यवस्थेच्या हातात सापडले आहेत. अश्या वेळी फडणवीस आणि पोलीस आयुक्त यांची दिशाभूल करणारी माहिती देत आहेत.पालकमंत्री यांची चुप्पी बरेच काही सांगून जाते.असेही श्री.मुकुंद किर्दत म्हटले आहे.दरम्यान रविंद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी आज सरकारवर हल्लाबोल करत खोकी व नोटांचे बंडल दाखवत राज्यातील सरकारवर, ‘खोकेबाज‘ सरकार म्हटले आहे.
हा आमदार कोण?काय आहे त्याचा रोल?
एक आमदार या घटनेच्या सुरुवातीलाच पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. तेथे त्यांनी काही हस्तक्षेप केला होता. तो कोनत्या स्वरुपाचा व का केला होता। , असा मुद्दा जोर पकडत आहे.कारण हा आमदार राजकारणात येण्याआधी अगरवाल कुटुंबांकडे कामाला होता. अशी माहीती आहे.तो पोलिस स्टेशनमध्ये गेला. आरोपी व त्याचे कुटुंब हे त्याच्या घनिष्ट संबंधातील आहेत.म्हणून त्याने आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. ससून येथील lab प्रमुख त्याच्या शिफारशीनुसार नेमण्यात आला होता. आज याला व दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे .
रोज नवीन खुलाशे. ..
कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी दररोज नवे खुलाशे आणि अटका होत आहेत. ससुनमधुन अनेक वेळा विविध चाचण्या बोगस केल्या गेल्याचा आरोप होत आहे.काही वरिष्ठ अधिकारी व मोठ्या राजकीय व्यक्तींना वाचवण्यासाठी कनिष्ट अधिकारी, डाक्टर,पोलिस यांच्यावर दिखाऊ कारवाई होत आहे, असा आरोप माद्ध्यमांसमोर सुषमा अंधारे यांनी केला आहे. एका अल्पवयीनाची रक्त तपासणी व डी एन ए तपासणी अशा संशयास्पद बाबी यात दिसत आहेत. आरोपीच्या मित्रांची नावे व रक्त तपासणी करण्यात हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी पुणेकर नागरिक माद्ध्यमांतुन करत आहेत. पोलिस आयुक्त ही केस अपवादातुनही अपवाद अशी आहे ,असे मानुन अल्पवयीन आरोपीला प्रौढ मानुन खटला कोर्टाने चालवावा , असे प्रयत्न पोलिस करण्यात येत आहेत, असे सांगतात. तसेच ते सांगतात की आरोपी घरातुन बाहेर निघण्याच्या पासुन तेथील सिक्यूरिटी गार्ड कडील नोंदींपासुन सगळा घटनाक्रम उलगडत आहेत.पोलिसांसमवेत असताना आरोपीला पिझ्झा,बर्गर,बिर्यानी दिली की नाही ? याबाबत खात्रीशीरपणाची माहिती अद्याप स्पष्ट झाली नसुन ती करत असल्याचे सांगत आहेत. मात्र पोलिस स्टेशनमध्ये सी सी टी व्ही फुटेज का तपासले जात नाहीत, असा प्रश्न पुणेकर नागरिक करत आहेत. गाडीला नंबर कसा नाही?आर टी ओ चे कामकाज किती भंपकपणे चालते हे स्पष्ट करते.अल्पवयीन मुलांना दारु पिऊ कसे पब,बार कडुन दिले जाते? याच एक्साईज विभाग काय झोपा काढतो का?की झोपेचे सोंग करत?. पोलिसांचा थोडाही धाक राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे. हे सर्व अशा पैशाचा पुर वाहणार्या या भागात पैशासाठी होत आहे का ? दुर्घटना झाल्यावर सर्वजण नेहमीप्रमाणे जागे होतात. काही तक्रारी आधीही काही लोक करत असतात, पण त्याकडे सोईस्करपणे डोळेझाक का केली जात ? लोकांच्याच करातुन मिळालेल्या पैशातुन शासकिय यंत्रणा पगार घेउन मग काय आणि कुणासाठी काम करतात? पोलिसांचा धाक राहिलेला नसेल तर पोलिस खातेच बंद का करु नये? लोकांच्या पैशाचा किती मोठा हा अपव्यय आहे?
पुणेकरांची जबाबदारी…
जागरुक पुणेकरांनी या कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात मोठी प्रशंसनीय भुमिका बजावली आहे. धाडसाने माध्यमांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. मिटींग,निदर्शने,मागण्या,प्रसंगी आक्रामक भुमिका घेवुन संबंधीत व्यक्ती व यंत्रणा यांना धारेवर धरले आहे. पुणेकरांनी शेवटपर्यत हा निर्भया प्रकरणाप्रमाणे अपवादातीलही अपवादात्मक घटना म्हणून आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत लढा द्यावा, अशी अपेक्षा महाराष्ट्रासह देशाला आहे .
अशातच काल या घटनेला आठवडा उलटून जातो न जातो तोच अशाच प्रचंड वेगाने एक गाडी याच मार्गावरुन गेल्याची बातमी एका वर्तमानपत्राने दिली आहे. याचा अर्थ काय होतो ?साहजीकच ही लढाई सर्व पातळीवर समाजानेच लढावी लागणार आहे.असा होतो व तिही दीर्घकाळ !