
Contents
- 1 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चित्रपट,कला व सांस्कृतीक विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी ‘तृप्ती ‘ श्री.रामदास राऊत !
- 1.1 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कला विभागाचा कार्यक्रम शिरुर येथे संपन्न !
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चित्रपट,कला व सांस्कृतीक विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी ‘तृप्ती ‘ श्री.रामदास राऊत !
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कला विभागाचा कार्यक्रम शिरुर येथे संपन्न !
शिरुर, दि.26 जुन : (संपादक डा.नितीन पवार यांच्याकडून )

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चित्रपट,कला व सांस्कृतीक विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी ‘तृप्ती ‘ श्री.रामदास राऊत यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने शिरुर येथे कार्यक्रम शिरुर येथे संपन्न झाला आहे. यावेळी रामदास राऊत यांचा सत्कार समारंभ करण्यात आला होता. रामदास राऊत यांच्या तृप्ती एंटरप्राइजेस या संस्थेच्या कार्यालयात हा समारंभ कार्यक्रम पार पडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे राउत बनले पदाधिकारी. …..
दिनांक २४/०६/२०२४ रोजी शिरूर येथे तृप्ती इंटरप्राईजेस या कार्यालयामध्ये श्री. रामदासजी राऊत, उपाध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष, चित्रपट कला व सांस्कृतिक विभाग पुणे जिल्हा यांची चित्रपट, कला व सांस्कृतिक विभाग पुणे जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर, पारनेर, शिरूर येथील नाभिक समाजाच्या असंख्य कार्यकर्त्याच्या समवेत श्री. रामदासजी राऊत सन्मान करण्यात आला . यावेळेस बाळासाहेब भुजबळ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नाभिक महामंडळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संत सेना महाराज ट्रस्ट, पिंपळगावचे पदाधिकारी उपस्थित. …
त्याचबरोबर भाऊ बीडे ,अध्यक्ष, श्री संत सेना महाराज ट्रस्ट, पिंपळनेर, अनिल शंकरराव निकम , उपजिल्हाध्यक्ष, नाभिक महामंडळ , अहमदनगर, संतोष घायतडक, मा. उपसरपंच करडे, मच्छिंद् घायतडक , उद्योजक M.I.D.C , कारेगाव, शामराव जाधव , उपजिल्हाध्यक्ष , नाभिक महामंडळ, अहमदनगर, सुनील आतकर , सचिव, श्री. संत सेना महाराज ट्रस्ट पिंपळनेर, प्रसाद भोसले सहसचिव , श्री. संत सेना महाराज ट्रस्ट पिंपळनेर, संजय वाघचौरे (मेजर) , श्री. संत सेना महाराज ट्रस्ट पिंपळनेर सदस्य, नवनाथ राऊत , श्री. संत सेना महाराज ट्रस्ट पिंपळनेर सदस्य, आदिनाथ बांगर, कृष्णकांत राऊत, गणेश वाघमारे इ.मान्यवर उपस्थित होते .
यावेळेस बाळासाहेब भुजबळ यांनी रामदासजी राऊत यांचा मान्यवरांना परिचय करून दिला. तसेच भाऊसाहेब बीडे यांनी रामदासजी राऊत यांस कडून श्री संत सेना महाराज ट्रस्ट पिंपळनेर या संस्थेला मागील वर्षी आहुजा कंपनीचा स्पीकर सेट भेट दिला होता.त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री संत सेना महाराज ट्रस्ट पिंपळनेरच्या समाज मंदिराचे वॉल कंपाऊंड झाल्यानंतर लोखंडी गेट देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. ” रामदासजी राऊत यांचा समाजाच्या जडणघडणमध्ये मोलाचा वाटा आहे त्यांचे सहकार्य आम्हास नेहमी राहील असा विश्वास आहे.” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद भोसले यांनी केले आणि सर्व मान्यवरांचे आभार नवनाथ राऊत यांनी मानले. याप्रमाणे हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
रामदास राऊत आल राउंडर व्यक्तीमत्व !
नाभिक समाजातुन येवुन श्री.सामायिक, राजकिय, कला क्षेत्रात आपला ठसा उमटवला. रामदास राऊत हे एक All Rounder व्यक्तीमत्व आहे. आपला पारंपारीक नाभिकीचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत सलुन च्या शाखा वाढवल्या. यशाचे एक एक टप्पे पार पाडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कला विभागाचे जिल्हा स्तरावरही ते आज पोचले आहेत.श्री. रामदास राऊत तृप्ती फिल्म प्रोडक्शन चे निर्माता, दिग्दर्शक लेखक,आहेत.
तृप्ती फिल्म प्रोडक्शन. …..
फिल्म प्रोडक्शन ची सर्व टीम टेक्निकल टिम ,अभिनेते ,अभिनेत्री त्यांनी घडवल्या .अथक प्रयत्नाने ‘ हास्यता धिंगाणा पंचरंगी ” या कार्यक्रमाचे १०६ भाग पूर्ण केले आहेत. आणि याही पुढे ते चालू राहणार आहेत. ते लवकरच घेऊन येत आहेत एक नवीन वेब फिल्म ‘घुसमट‘! याही फिल्मला आपण भरभरून साथ चित्रपट रसिकांनी द्यावी अशी अशा ते व्यक्त करतात. त्यांचा पत्ता रामदास राऊत, तृप्ती फिल्म प्रोडक्शन , शिरूर ,पोस्ट ऑफिसजवळ,येथे असा आहे. तर मो नं :-९८२२२४७६९१ आहे.https://youtube.com/@truptifilmproduction4659 हा त्यांचा यु ट्यूब चेनल आहे.
अभिनय हे एक विशेष अंग श्री.रामदास राउत यांनी स्वतः मधे विकसित केले आहे.हे सहसा चाकोरीबाहेरील काम आहे. ते सुचने आणि ते धाडस करुन यशही मिळवणे काही सोपी गोष्ट नसते.समाज ,’ हे तुम्हाला शोभतं का ? ते आपलं काम नाही.आपण काय शाहरुख खान, अमिताभ बच्चन समजता का?असे आपल्या जवळपास वावरणारे लोक म्हणत असतात. जग अशा मलहुस लोकांनी भरलेले आहे.अशा लोकांना जे पुरुन उरतात,ते यशस्वी होतात.अशाचा मग मुखभंग होतो.मला (संपादक) असे मलहुस लोक लोक रोज भेटतात. पण मला आज भारतासह 60 देशांतुन online traffic आहे.वाचक व दर्शक आहेत.हिंदी आणि English content लाही ! आणि हे मलहुस चेहरे पडलेले दिसतात.
श्री.रामदास राऊत हे मात्र त्यांना जे वाटले ते करत राहिले. करत राहिले.किती तरी लोक सोडुन गेले.काही नवीन आले.येणारे आणि चिकटणारे गुळाला चिकटणार्या मुंगळ्या सारखेच असतात.त्यांच्या भरवशावर मुळात राहू नये.पण मुख्य काम करत राहिले पाहिजे. एकाग्रता,सातत्य आणि संयम,धीर धरला तर यश नक्की मिळते !