
रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन, कारेगाव.
Contents
- 1 रांजणगाव एम आय डी सी त मोठा बेकायदा गुटका साठा पोलिसांना सापडला !
- 1.1 अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांची देखील धाड !
- 1.1.1 यात रांजणगाव पोलिसांना सापडले बेकायदा विमल,लाज निवास,राजश्री,सम्राट असे सर्व बेकायदा गुटक्याचे प्रकार?
- 1.1.2 रांजणगाव जवळच्या कारेगाव हद्दीत पोलिसांची धाड….
- 1.1.3 यावेळेस रांजणगाव एम आय डी सी पोलिसांना सापडलेला माल पुढीलप्रमाणे –
- 1.1.4 यातील आरोपी-
- 1.1.5 अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसारही गुन्हा दाखल. ..
- 1.1.6 अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांची देखील धाड !
- 1.1.7 आरोपी मुळ राजस्थानचा…
- 1.1.8 About The Author
- 1.1 अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांची देखील धाड !
रांजणगाव एम आय डी सी त मोठा बेकायदा गुटका साठा पोलिसांना सापडला !
अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांची देखील धाड !
यात रांजणगाव पोलिसांना सापडले बेकायदा विमल,लाज निवास,राजश्री,सम्राट असे सर्व बेकायदा गुटक्याचे प्रकार?

रांजणगाव,शिरुर दिनांक 20 सप्टेंबर:( श्री. अनिल डांगे यांच्याकडुन )
रांजणगाव एम आय डी सी त मोठा बेकायदा गुटका साठा पोलिसांना नुकताच सापडला आहे.पोलिसांना यात बेकायदा विमल,लाज निवास,राजश्री,सम्राट असे सर्व बेकायदा गुटक्याचे प्रकार सापडले आहेत. ते जप्त करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक श्री.वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.तर अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी देखील धाड टाकली आहे.
रांजणगाव जवळच्या कारेगाव हद्दीत पोलिसांची धाड….
राजणगाव एम आय डी सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 13/09/2024 रोजी 16: 30 व 17.00 वाजण्याच्या सुमारास कारेगावच्या हद्दीतील कल्याणी कंपनीच्या पाठीमागील बाजुच्या “साई बाबा किराणा” दुकानामध्ये व “गहिनीनाथ किराणा” दुकानामध्ये फिर्यादी श्री. ज्ञानेश्वर रमेश शिंदे, वय -45 वर्षे, पोलिस हवालदार, नेमणुक – रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांना खालील बेकायदा गुटका व तत्सम अमली पदार्थ सापडले.’रांजणगाव‘
यावेळेस रांजणगाव एम आय डी सी पोलिसांना सापडलेला माल पुढीलप्रमाणे –
1) 1,890/रु. राजश्री पान मसाला चे 07 पॅकेट, प्रति पॅकेटची किंमत 270/रु. प्रमाणे जु.वा.किं.अ.
2) 1452 राज निवास सुगंधित पान मसालाचे 11 पॅकेट प्रतिपेकडे ची किंमत 132 रुपये प्रमाणे जु आ की आ
3) 1,320/रु. सम्राट पान मसाला चे 11 पॅकेट, प्रति पॅकेटची किंमत 120/रु. प्रमाणे जु.वा.कि.अं.
4) 550/रु. शुध्द प्लस सिल्वर पान मसला चे 02 पॅकेट, प्रति पॅकेटची किंमत 275/रु. प्रमाणे जु.वा.कि.अं.
5) 340/रु. राजश्री पान मसालाचे 01 पॅकेट प्रति पॅकेटची किंमत 340/रु. प्रमाणे जु.वा.कि.अं.
असा एकूण 1,890 रुपये किंमतीचा बेकायदा माल
वर नमूद केलेल्या तारखेस,वेळी व ठिकाणी सापडला आहे.
यातील आरोपी-
1) सुमन संजय चौधरी, वय -21 वर्षे, राहणार – कारेगाव, माळवाडी रोड, तालुका – शिरुर, जिल्हा- पुणे, मुळ राहणार – अकहा मधेपुर, तालुका – उजियापुर, जिल्हा- समस्तिपुर, राज्य- बिहार
(2) शंकर कैलास भालके, वय- 22 वर्षे, राहणार-कारेगाव, तालुका – शिरुर, जिल्हा- पुणे, मुळ राहणार- तोंडापुर, तालुका- कळमनुरी, जिल्हा – हिंगोली यांच्याकडे सापडला आहे.
तसेच त्यांच्या ताब्यात एकूण 9,632 रुपये किमतीचा राजनिवास ,राजश्री ,सम्राट, विमल व शुद्ध प्लस पान मसाल्याचा माल विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या स्थितीत सापडला आहे. त्यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थाचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री हेतू साठा केला होता. त्यावरून महाराष्ट्र शासनाच्या वतीने अन्नसुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये अधिसूचित केलेल्या प्रतिबंधित गुटखा ,पान मसाला ,सुगंधित तंबाखू इत्यादी तत्सम अन्नपदार्थाचा विक्री हेतू महाराष्ट्र राज्यातून उत्पादन वाहतूक साठा विक्री आदेशाचे भंग करत केला आहे.या व वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसारही गुन्हा दाखल. ..
आरोपींवर रांजणगाव पो स्टे गुर नं 532/2024 असा आहे.तर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223,274,275,123 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26 (2) (i), 26(2)(iv), 27(3)(d), 27(3)(e), 30(2)(a),59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलीस हवालदार जगदाळे हे आहेत.
तपास अंमलदार सहायक फौजदार शिंदे हे आहेत.
प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
——-
अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांची देखील धाड !
तर याच दरम्यान दिनांक 13/09/2024 रोजी 15:00 वाजण्याच्या सुमारास रांजणगाव गणपती संकल्प सिटी पिंपरी रोड, तालुका -शिरूर जिल्हा -पुणे येथे श्रीमती क्रांती बारवकर, वय-41 वर्षे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, प्लॉट नं 4/2 नवनगर विकास प्राधिकरण, अॅकॉर्ड हॉस्पिटल शेजारी, मोशी, पुणे-412105 पुणे
यांनी रांजणगाव गणपती येथील रामदेव सुपर मार्केट या आस्थापनेमध्ये दुपारी 15:00 वा. सुमारास छापा घातला असता तिथे …
1) राज निवास फ्लेवर्ड पानमसाला,
2) केसरयुक्त विमल पानमसाला
3) व्हि-1 सुगंधित तंबाखू
4) ZL 01 जाफराणी जर्दा असा हा माल पुढीलप्रमाणे वर्णनाचा आहे…
1) राज निवास फ्लेवर्ड पानमसाला (रु.4 प्रति पाऊच) 19 पाऊचेस किंमत अंदाजे 76 रूपये किंमतीचा,
2) केसरयुक्त विमल पानमसाला (रु. 18 प्रति पाऊच) 15 पाऊचेस किंमत अंदाजे 270 रूपये किंमतीचा ,
3) व्हि-1 सुगंधित तंबाखू (रु. 02 प्रति पाऊच) 15 पाऊचेस किंमत अंदाजे 30 रूपये किंमतीचा,
4) ZL 01 जाफराणी जर्दा (रु. 01 प्रति पाऊच) 38 पाऊचेस किंमत अंदाजे 38 रूपये किंमतीचा असा
एकुण 414 रूपये इतक्या किंमतीचा बेकायदा साठा सापडला आहे.
आरोपी मुळ राजस्थानचा…
असा एकुण 414 रूपये किंमतीचा बेकायदा गुटका व तत्सम अमली पदार्थ सापडले आहेत. या सापडलेल्या मालासह सरदाराराम थानाराम देवासी, वय -39 वर्ष ,राहणार सध्या- संकल्प सिटी जवळ, रांजणगाव गणपती ,तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे ,मुळ राहणार 235 रभारीया गावास ,बिजोवा बिजोवा पाली ,राजस्थान 306601 याने बेकायदेशीरपणे प्रतिबंधित अन्नपदार्थाची विक्रीसाठी साठा व विक्री केल्यामुळे त्याच्यावर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
आरोपीवर रांजणगाव पो स्टे गुरनं 530/2024 असा आहे.तर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223,274,275,123 व अन्नसुरक्षा मानके अधिनियम 2006 चे 26(2)(i),26(2)(iv), 27(3)(d),27(3) (e), 30(2) (a) सहवाचन क 3 (i) (zz) (v), 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल आमदार पोलीस हवालदार जगदाळे हे आहेत. तर पुढील तपास अंमलदार पोलीस हवालदार ढगे हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.