
Contents
Ranjangaon MIDC Case: रांजणगावमध्ये तलवार व दगडाने हल्ला केल्याची प्रतितक्रार नोंद !
Ranjangaon MIDC Case Cross Complaimt?
दिनांक 4 जून 2025 | सत्यशोधक न्युज |
” Ranjangaon MIDC Case: रांजणगाव शिरूर येथे निवडणुकीतील पराभवाच्या रागातून युवकावर तलवार व दगडाने हल्ला. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. संपूर्ण बातमी वाचा.”
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना ( Ranjangaon MIDC Case ) घडली आहे. या प्रकरणी अभिजीत नंदू बत्ते (वय 29, व्यवसाय शेती, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
➡️ गुन्हा रजिस्टर नंबर: 178/2025
➡️ IPC कलमे: 118(2), 115(2), 352, 351(2)(3), 3(5)
आरोपी—-
1. आकाश संजय बत्ते
2. विकास संजय बत्ते
(दोघेही रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे)
घटना कशी घडली?—-
दि. 4 जून 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता अभिजीत बत्ते यांच्या घरासमोर ही घटना घडली. फिर्यादीच्या निवडणुकीतील पराभवामुळे संतप्त झालेल्या आरोपी आकाश संजय बत्ते याने लोखंडी तलवारीने त्यांच्या कपाळावर हल्ला केला. त्याचवेळी दुसरा आरोपी विकास संजय बत्ते याने त्यांच्या पाठीत दगड मारून गंभीर दुखापत केली. आरोपींनी संगनमताने शिवीगाळ, दमदाटी करत लहान-मोठ्या दुखापती केल्या.
पोलिस तपास—-

सहाय्यक फौजदार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, पोलीस हवालदार अगलावे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या —
https://pune.police.gov.in – पुणे ग्रामीण पोलीस विभाग
https://indiacode.nic.in – भारतीय दंड संहिता संदर्भ
https://www.eci.gov.in – भारत निवडणूक आयोग
🌐 पुढील अपडेटसाठी वाचा–
satyashodhak.blog
“सत्यशोधक न्यूज – आपल्या गावाचा आवाज!”
सत्यशोधक न्युजच्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंक वर क्लिक करुन —
Ranjangaon MIDC News:रांजणगाव मधे एकास मारहाण : कुटुंबातील वादातून गंभीर जखमी, गुन्हा दाखल!