
Contents
Ranjangaon MIDC News: MIDC पोलिसांकडून घरफोडी व चोरी प्रतिबंधासाठी ग्रामसुरक्षा दल सक्रीय
Ranjangaon MIDC News Police Action
📅 दिनांक ५ जुलै २०२५ | प्रतिनिधी |
Ranjangaon MIDC News: रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनने वाढत्या चोऱ्या आणि घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित केले आहे. यामध्ये CCTV बसवणे, गस्त वाढवणे आणि गावपातळीवर सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले.
रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन अंतर्गत वाढत्या चोऱ्या व घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलिस निरीक्षक श्री. महादेव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसुरक्षा दल कार्यान्वित करण्यास सुरुवात करण्यात आली असून, यासाठी स्थानिक गावांमध्ये विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले.
🛡️ ग्रामसुरक्षा दलाचे कार्य—
रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात ०५/०७/२०२५ रोजी झालेल्या बैठकीमध्ये विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व सदस्य उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी गावातील महत्त्वाच्या चौकात, वर्दळीच्या ठिकाणी, धार्मिक स्थळी CCTV कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग व पोलिस अंमलदारांसोबत नियमित संपर्क ठेवण्यावर भर देण्यात आला.
👮 पोलीस निरीक्षक श्री. वाघमोडे यांचे मार्गदर्शन—+
“ग्रामसुरक्षा दलाच्या तर्फे दररोज लाठी-टी शिल्ड पथक गावात फिरवण्यात येईल,” असे श्री. वाघमारे यांनी स्पष्ट केले.
🏘️ सहभागी गावांमध्ये भांबर्डे, बाभुळसर खुर्द, करंजापूर, खंडाळे माथा, वाघोली, पिंपरी दुमाला, तर्डोबाची वाडी यांचा समावेश होता.
📢 सर्व ग्रामस्थांना आवाहन—-
पोलीस निरीक्षकांनी ग्रामस्थांनी ग्रामसुरक्षा दलाच्या बैठकीत सहभागी व्हावे व सुरक्षेसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🔗
Maharashtra Police Official Website
Digital India – CCTV Surveillance Guidelines