
Contents
- 1 रांजणगाव येथे दरोडा – महिलांचे दागिने लुटले!
- 1.1 रांजणगाव येथे दरोड्यासह चोर्यांचे सत्र सुरुच !
- 1.1.1 अचानक ‘झडप’ आणि महिलांमधे घबराट! —
- 1.1.2 तक्रार नोंदवायलाच बराच वेळ जातो? —
- 1.1.3 ताजी घटना रांजणगाव गणपती परिसर व पुणे अहिल्यानगर हायवेवर —
- 1.1.4 रांजणगाव गणपती पोलिस ठाण्यात फिर्याद—
- 1.1.5 घटना कशी घडली?—
- 1.1.6 रांजणगाव येथील या दरोड्यात लुटलेले दागिने—
- 1.1.7 रांजणगाव गणपती पोलिसांची कारवाई–
- 1.1.8 About The Author
- 1.1 रांजणगाव येथे दरोड्यासह चोर्यांचे सत्र सुरुच !
रांजणगाव येथे दरोडा – महिलांचे दागिने लुटले!
रांजणगाव येथे दरोड्यासह चोर्यांचे सत्र सुरुच !
दिनांक १७ ऑगस्ट २०२५|प्रतिनीधी |
“शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे दरोडा पडला आहे. रांजणगाव गणपती येथे दोन अज्ञात इसमांनी चाकू आणि कोयत्याच्या धाकावर महिलांचे ८५ हजारांचे दागिने लुटले. रांजणगाव पोलिसांकडून तपास सुरु.”

रांजणगाव येथे दरोडा पडला आहे. भरदिवसा हा दरोडा पडणे आणि दरोडेखोर पळुन जाण्यात यशस्वी होणे.ही घटना लाजीरवाणी आहे.पोलीसांचा धाक न उरणे हे यामागचे प्रमुख कारण आहे.शिरुर, शिरुर तालुका,रांजणगाव एम आय डी सी भाग अशा दोन्ही प्रकारच्या भागात सातत्याने गेल्या काही दिवसात विशेषतः स्रियांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून नेणे ही पद्धत दिसुन येत आहे.हे एक soft टार्गेट बनले आहे. तत्काळ चोरटे पकडले गेले नाहीत हे खरे आहे. कदाचित त्यामुळे अशा प्रकारची चोरी करणे चोरट्यांसाठी सोपी पद्धत ठरत आहे, असे दिसते.रांजणगाव येथील दरोडा हे हा प्रकार असाच आहे.
अचानक ‘झडप’ आणि महिलांमधे घबराट! —
दुसरे एक इथे स्पष्ट दिसते.कोनतीही ही अचानक चोर समोर आला आणि झडप टाकली तर भयंकर घाबरतात.आरडाओरडा सहज होतो.स्री शारिरीक प्रतिकार करणे हे अशा स्थितीत फार अवघड असते.चोरटे बराच ,’होमवर्क'(?) करत असावेत.ते तत्काळ पळुन जातात.आरडाओरडा झाला तरी सध्याचे समाजातील लोक लगेच मदतील धावुन येत नाहीत.पुर्वी लगेच येत होते.अगदी चोरट्यांचा पाठलाग सुद्धा केल्याचे इथेच शिरुर शहरात घडले आहे.पण आता असे घडत नाही.आपण कुणाच्या मदतीला गेलो तरच कोणी आपल्या मदतीला येईल ! पण ‘अप्पलपोटेपणा’ हा गुणधर्म समाजात वाढलेला आहे.अन्यथा ताबडतोब नागरिकांनी फोन फिरवले तरी चोरांची एक प्रकारे नाकेबंदी होवु शकते.राजकीय,सामाजिक कार्यकर्ते ,तरुण यांची काही कमी नाही.
तक्रार नोंदवायलाच बराच वेळ जातो? —
पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवायलाच बराच वेळ जातो.हा अनुभव अनेकांना आहे.तर तपासाची चक्रे फिरवुन चोराला चारी बाजुंनी घेरण्यासाठीची क्विक एक्शन लवकरात लवकर जी व्हायला पाहिजे ती होत नाही. या वेळात चोर पळुन जाण्यात यशस्वी होतो. चोरही हल्ली तालुके व जिल्हे बदलुन चोरीला ‘अंजाम’ देत आहेत.हे पकडलेल्या चोरांच्या पत्त्यांवरुन दिसते.त्यामुळे स्थानिकांना ते लवकर ओळखुन येत नाहीत. अशी बरीचशी निरिक्षणे नोंदवता येवु शकतात.पर्यायाने आता रोज चोर्या होवु लागल्या आहेत. महिलांमधे या प्रकाराने घबराट पसरत आहे.
ताजी घटना रांजणगाव गणपती परिसर व पुणे अहिल्यानगर हायवेवर —
या ताज्या घटनेत शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात १५ ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली आहे. तब्बल ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
रांजणगाव गणपती पोलिस ठाण्यात फिर्याद—
फिर्यादी राम बाबासाहेब तायनाक ,वय – २० वर्षे, व्यवसाय – शेती, राहणार – कानड, तालुका- शेलु, जिल्हा – परभणी यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यात नमूद केले आहे की १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४:१० वाजता ते आपल्या नातेवाईकांसह एर्टिगा कार क्रमांक . MH 14/HN 9909) मधून पुणे-भुगाव येथे जात होते.
घटना कशी घडली?—
गाडी चालक गणेश खडसे यांनी लघुशंकेसाठी रांजणगाव गणपती मंदिराजवळ गाडी थांबवली. मागून मोटारसायकलवर दोन अनोळखी इसम आले.त्यांनी गाडीला अडवले. त्यानंतर त्यांनी चालकाच्या गळ्यावर चाकू लावला. तसेच गाडीत बसलेल्या महिलांना कोयता दाखवून धमकावले.अचानक समोर आलेल्या अशा प्रसंगाने गाडीतील महिला ,मुले सर्व घाबरून गेले.चोरट्यांनी त्यांचा ‘कार्यभाग’ साधला.
रांजणगाव येथील या दरोड्यात लुटलेले दागिने—
रांजणगाव गणपती येथील या दरोड्यात महिलांच्या अंगावरील मंगळसूत्र व कानातील दागिने मिळून अंदाजे ₹८५,००० किमतीचे दागिने लुटून आरोपी फरार झाले.अगदी दिवसाढवळया!
रांजणगाव गणपती पोलिसांची कारवाई–
या प्रकरणी पोलीस हवालदार श्री. मोरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस सब इन्पेक्टर श्री. थोरात करत आहेत.
पोलिस निरीक्षक श्री. एम. एस. वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली या आरोपींचा शोध सुरु आहे.
नागरिकांनी स्वतः लक्ष असणे हे फार आवश्यक बनले आहे. 112 फोन नंबर चा वापर करुन पोलीस मदत घेणे गरजेचे आहे. पिडीत भयग्रस्त स्थितीत असताना त्या परिसरातील नागरिकांनी परस्पर या नंबरवर मदत घ्यायला कचरु नये.असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहिती मिळवा खालील लिंकवर क्लिक करून •••
पुणे पोलीस विभाग अधिकृत संकेतस्थळ
सत्यशोधक च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून •••
दलित मुली, ‘कोथरूड प्रकरण’, पोलिसांची वर्तणूक आणि आजची स्थिती — एक संपादकीय