
Contents
- 1 ‘रात्रीस खेळ चाले…..’ या बातमीनंतर येत आहे आणखीन माहिती उघडकीस ? ( पहा व्हिडीओ सह)
- 1.1 ‘रात्री खेळ चाले….. ‘ वृतानंतर संबधीत अधिकाऱ्यांशी चर्चा ?
- 1.1.1 शिरुर,दिनांक 11 डिसेंबर: (सत्यशोधक न्यूज टिम)
- 1.1.2 कुकडी वसाहतीतील पडकी घरे…..
- 1.1.3 तुम्हाला काय करायचे. …
- 1.1.4 आयटीआय प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील आडोशाच्या जागेवर अनेक वेळा रात्री त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी तरुण आल्याची माहिती तेथील सूत्रांकडून मिळाली आहे. ‘नको त्या अवस्थेमध्ये’ देखील तेथे अशा लोकांना पाहिल्याचे देखील रखवालदार यांनी सांगितले आहे. रखवालदार हे देखील भितीच्या छायेत वावरत त्या ठिकाणी ड्युटी करत असतो. आणि त्यांनी विचारले असता ,’ तुम्हाला काय करायचे आहे’, असा दम देऊन त्या ठिकाणी रासरोजपणे हा प्रकार चालू आहे.अशी माहिती मिळत आहे. कोण हे आहेत आणि त्या ठिकाणी तरुणी,श्रिया, दलाल किंवा अशा प्रकारे लैंगिक शोषण करणारे कोण आहेत ? शिरुर शहरातील ‘पैसेवाले’ आहेत की ‘गुंड’ लोक आहेत की ‘दारूबाजू’ तरुण आहेत हे संबंधित यंत्रणा शोधत आहेत.
- 1.1.5 रात्री दहाच्या नंतर बस स्थानकाजवळ ‘थवा’ जमतो….
- 1.1.6 कर्मचार्यांना दम देतात. …
- 1.1.7 सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यात आला. …
- 1.1.8 पोलिसाना हुलकावणी देतात….
- 1.1.9 पालकांची जबादारी. …
- 1.1.10 ते रिक्षा चालक कोण?
- 1.1.11 सेंटर शाळेमागे पार्टी…..
- 1.1.12 दलाल कोण आहेत? …..
- 1.1.13 About The Author
- 1.1 ‘रात्री खेळ चाले….. ‘ वृतानंतर संबधीत अधिकाऱ्यांशी चर्चा ?
‘रात्रीस खेळ चाले…..’ या बातमीनंतर येत आहे आणखीन माहिती उघडकीस ? ( पहा व्हिडीओ सह)
‘रात्री खेळ चाले….. ‘ वृतानंतर संबधीत अधिकाऱ्यांशी चर्चा ?
शिरुर,दिनांक 11 डिसेंबर: (सत्यशोधक न्यूज टिम)
‘रात्रीस खेळ चाले……..’ या शिर्षकाअंतर्गत ‘सत्यशोधक न्यूज’ ने शिरुर शहरातील सरकारी आवारात बेकायदेशीर वेश्याव्यवसाय (?) ,दारुच्या पार्ट्या,धुम्रपान, काॅलेज, शाळांमधील मुले, मुली ,तरुण ,तरुणी,झोपडपट्टीतील काही स्रीया,मुली,दलाल,दारुबाज,दादागीरी करणारे व रात्री अपरात्री या आवारांमधे रिक्षा,कार,बाईक इ.बाबत दिलेल्या बातमीनंतर ‘सत्यशोधक न्यूज’ च्या टिम ने आणखीन माहिती घेत असताना नवीन माहिती ही मिळत आहे.
या बाबत संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा केली जात आहे. अनेक नावे ‘सत्यशोधक न्यूज टिम’ कडे येत आहेत.मात्र याबाबबत शिरुर पोलीस स्टेशन कडुन याबाबत सर्व तपास केला जावा आणि बेकायदेशीरपणे चालणारे सरकारी आवारामधील हे ‘चाळे, अश्लीलता,दादागिरी,कर्मचार्यांना धमकावणे इ. कृत्यांना प्रतिबंध केला जावा, अशी या परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा आहे.शिरुर शहरातील नागरिक, विवीध पक्ष,संघटना,पालक संघटना,शिक्षक,प्राध्यापक,वकिल,इ.या परिसरातील लोक सत्यशोधक न्यूज टिम शी बोलताना वरील अपेक्षा व्यक्त करत आहेत.’रात्रीस खेळ ‘चा ले
कुकडी वसाहतीतील पडकी घरे…..
‘सत्यशोधक न्यूज टीम’ च्या कामाला पाठिंबाही देत आहेत.
सत्यशोधक न्यूज टीमने याबाबत अनेकांकडुन माहिती घेतली असता अनेक बाबी समोर येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कुकडी कॉलनीतील खुडको जवळील मोडकळीस आलेली कुकडी वसाहतीतील घरे ,बोळी, झाडी यांचा आसरा घेऊन या ठिकाणी अनेक तरुण तरुणी वावरत असतात.असे समक्ष दिसले आहे. शाळकरी मुली मुले देखील वावरत असतात. सिगारेट ओढत असतात आणि ‘खास’ भेटण्याची जागा म्हणून या जागेचा वापर करत असतात, अशी माहिती मिळत आहे. या ठिकाणी आम्ही जाऊन पाहिले असता या ठिकाणी खरोखरच एक ग्रुप आडोशाला उभा होता आणि आमच्या प्रतिनिधीला पाहून ते त्या ठिकाणावरून पळून गेले.

तुम्हाला काय करायचे. …
आयटीआय प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील आडोशाच्या जागेवर अनेक वेळा रात्री त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी तरुण आल्याची माहिती तेथील सूत्रांकडून मिळाली आहे. ‘नको त्या अवस्थेमध्ये’ देखील तेथे अशा लोकांना पाहिल्याचे देखील रखवालदार यांनी सांगितले आहे. रखवालदार हे देखील भितीच्या छायेत वावरत त्या ठिकाणी ड्युटी करत असतो. आणि त्यांनी विचारले असता ,’ तुम्हाला काय करायचे आहे’, असा दम देऊन त्या ठिकाणी रासरोजपणे हा प्रकार चालू आहे.अशी माहिती मिळत आहे. कोण हे आहेत आणि त्या ठिकाणी तरुणी,श्रिया, दलाल किंवा अशा प्रकारे लैंगिक शोषण करणारे कोण आहेत ? शिरुर शहरातील ‘पैसेवाले’ आहेत की ‘गुंड’ लोक आहेत की ‘दारूबाजू’ तरुण आहेत हे संबंधित यंत्रणा शोधत आहेत.
रात्री दहाच्या नंतर बस स्थानकाजवळ ‘थवा’ जमतो….
येथे आणल्या जाणार्या मुली,महिला देखील दारु या ठिकाणी पित असतात.तोंडाला फडके बांधलेले असते.आधी अशांचा एक ‘थवा’ बस स्थानकाजवळील एका चहा दुकानाजवळ जमा होतो.चहापानही होते.नंतर काही कार,रिक्षा यांच्यामधुन ते इच्छित स्थळी जात असतात.असे समजते.पलीकडील रिक्षा थांब्यापासुन देखील कार मधुन या व्यक्तींना नेले जाते. अशीही माहिती मिळत आहे. अशी व इतर याबाबत अनेक माहिती तपासांतीच आम्ही देऊ.

कर्मचार्यांना दम देतात. …
परंतु तेथील सूत्रांकडून माहिती मात्र अशा प्रकारची खात्री लाईट मिळत आहे. या ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टीकचे ग्लास, गर्भनिरोधक साधने कंडोम इ.,देखील कचर्यात पडलेले आहेत.याचा अर्थ हा भाग म्हणजे जणू काही ‘थायलंड’ बनलेले आहे की काय? असा प्रश्न निर्माण होतो. आणि सरळ सरळ दादागिरी करून, ‘तुम्हाला काय करायचे आहे’ अशा पद्धतीने सरकारी, शासकीय कर्मचाऱ्यांना देखील जर दम दिला जात असेल तर त्या ठिकाणी ही गुन्हेगारी आणखीन गंभीर स्वरूपाची घडत आहे. तर तेथील अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रास होईल याचा धोका देखील या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सत्यशोधक न्यूज शी बोलताना सांगितला आहे.

सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्यात आला. …
आणि या ठिकाणी सत्यशोधक न्यूज च्या बाबतीनंतर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला आहे .आडोशाच्या ठिकाणी असलेली झाडी आणि गचपण वाढलेले आहे. त्या ठिकाणी साफसफाईचे काम चालू करण्यात आले आहे .आणि सर्व ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण मुख्य अधिकारी यांच्या ऑफिस मध्ये करण्यात येत असल्याची माहिती याची अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे. अधिकारी किंवा कर्मचारी यांचे नाव आम्ही लगेच देऊ इच्छित नाही कारण त्यांना गुंडांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र ‘सत्यशोधक न्यूज’ कडे अशा विषयातील सर्व बर्य्याच जणांची आणि त्यांच्या मैत्रिणीची (की वेश्यावृती असणार्यांची ?) माहिती,नावे, पत्यांसह हळूहळू प्राप्त होत आहेत.
पोलिसाना हुलकावणी देतात….
योग्य ती माहिती आम्ही शिरुर पोलीस स्टेशनला देऊन सहकार्य करू. मात्र बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी पोलिसांचा राऊंड होत नाही, अशी ही माहिती मिळत आहे .त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे आणि त्या ठिकाणी पोलीस आल्याची माहिती कळाली की लगेच पडलेल्या भिंतीच्या जागांमधून किंवा उडी मारून पलीकडे जाणे सोपे असते आणि त्या ठिकाणी हे लोक पळून जातात आणि पोलिसांची दिशाभूल देखील करतात ,अशी देखील माहिती मिळाली आहे.
पालकांची जबादारी. …
शाळा , कॉलेज यांतील मुले या ठिकाणी वावरणे आणि त्यांची संख्या जास्त असणे ही गोष्ट गंभीर स्वरूपाची आहे . सर्व शहरातील पालकांनी आपली मुले शाळेत किंवा कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती तिथे काय करतात ?काय करत नाहीत? याबाबत जागरूक राहून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.पण हे होताना दिसत नाही. अल्पवयीन असलेले मुले मुली देखील या भागांमध्ये आपल्या मित्रांना भेटण्यासाठी, मैत्रिणींना भेटण्यासाठी आडोशाच्या जागेचा भाग पाहून त्या ठिकाणी ‘भेट'(?) घेतात. हे चित्र काही चांगले नाही. कारण हे अल्पवयीन आणि अल्प समज असणारे मुले,मुली असल्यामुळे ही बाब गंभीर आहे.
ते रिक्षा चालक कोण?
शहरातील गावगुंड, गुंड ,इतर दारूबाज आणि बेवडे आणि वेश्यावृत्ते असणाऱ्या काही स्त्रिया, तरुणी ,बायका या ठिकाणी रिक्षांमधून आणल्या जात असतात आणि रिक्षांना दोन्ही बाजूने पडदे लावलेले असतात आणि तेही रात्री दहाच्या नंतर कोणत्याही वेळेस त्यांची उपस्थिती त्या ठिकाणी अधून मधून असतेच ,अशी माहिती मिळालेली आहे .असे रिक्षावाले कोण आहेत? हे तपासून पाहिले .त्यांचा तपास करणे ही गरजेचे आहे. याबाबत ‘सत्यशोधक न्यूज’ ची टीम आणखीन तपास आणि माहिती मिळवत आहे आणि लवकरच शिरुर शहरातील अशा दारूबाज, रंडीबाज, दलाल, त्यांचे मित्र, मैत्रिणी यांचा पर्दाफाश करणार आहे. यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याबाबत प्रयत्न करणार आहेत आणि त्या कामी शिरूर शहरातील नागरिकांनी, पोलिसांनी ‘सत्यशोधक न्यूज’ च्या पत्रकारितेला सहकार्य करण्याची अपेक्षा आहे ! नागरिक बोलायला घाबरत आहेत.पण आमच्याकडे माहिती पाठवावी असे आवाहन आहे.
सेंटर शाळेमागे पार्टी…..
बस स्थानकाचे पाठीमागील नगरपालिकेची शाळा ; तिच्या मागील आवारातील गेट सर्रास उघडे असते आणि या ठिकाणी देखील अशा प्रकारच्या दारूच्या बाटल्या आणि इतर वर उल्लेख केलेल्या वस्तू दिसून येतात .याबाबतची माहिती संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात आलेली आहे आणि त्याबाबत त्यांनी विशेष लक्ष घालण्याचे आश्वासन ‘सत्यशोधक न्यूज’ च्या टीमला दिलेले आहे .त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्याचे गेट व सुरक्षारक्षक यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे सांगण्यात आलेले आहे.
दलाल कोण आहेत? …..
सध्या आम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांचे किंवा कर्मचाऱ्यांच्या नावांचा उल्लेख करत नाही. कारण याबाबत सत्यशोधक न्यूज, आणि इतर अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांच्याकडून याबाबत अधिक तपास काम चालू असल्याने हे करण्यात येत आहे. मात्र या संपूर्ण विषयाची शिरूर शहराच्या दृष्टीने असलेली, नागरिकांच्या दृष्टीने असलेली, तरुण तरुणींच्या भवितव्याच्या दृष्टीने असलेली महत्त्वाची माहीती, गुंड आणि वेश्यावृत्तीच्या स्त्रियांच्या बाबतची असलेली,दलाल आणि इतर यांचा पर्दाफाश लवकरच होणार आहे. मात्र अशा प्रकारची वर्तणूक शहरातील वातावरण बिघडवण्याचे आणि त्यातून काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेऊन याबाबत पुढील तपास केला जात आहे.