
Contents
ब्रेकिंग न्युज विद्युत रोहित्र चोरी करणार्या टोळीचा अखेर पर्दाफाश : 48 गुन्हे , 14,50,000 रुपये किमतीचा मुददेमाल व 9 जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात !
ब्रेकिंग न्युज विद्युत रोहित्र चोरीचा सिलसिला अखेर शिरुर व पुणे ग्रामीण पोलिसांनी केला बंद ! कसा ते वाचा ….
शिरुर , दि .24 जुन : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून)

ब्रेकिंग न्युज विद्युत रोहित्र चोरी करणार्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. 48 गुन्हे , 14,50,000 रुपये किमतीचा मुददेमाल व 9 जणांची टोळी पोलिसांनी ताब्यात ताब्यात घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी व शिरुर शाखा यांनी ही कामगीरी पार पाडली आहे.
बर्याच दिवसांपासुन रोहित्र चोरीच्या घटना….
बर्याच दिवसांपासुन पुणे जिल्ह्यातील शिरुर,रांजणगाव,शिक्रापुर,यवत,राजगुरुनगर, जेजुरी,दौंड या पुणे जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला शेतातील महत्वाच्या कामासाठी लागणारे रोहित्र चोरीला जात होते.त्यामुळे शेतकरी व नागरिक हैराण झाले होते. या संपुर्ण टोळीचाच , ‘खेळ’ करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.विद्युत रोहित्र चोरी करणार्या घटनांचे शिरुर व दौंड या उपविभागामधे प्रमाण वाढले होते.त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले होते. विद्युत रोहित्र चोरी गेल्याने परिसरातील शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान होत असे.तसेच परिसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत होते.
दुर्गम भागात चोरी?…
विद्युत रोहित्र चोरी ही दुर्गम भागात होत असल्याने चोरी झाल्यानंतर प्रत्येकक्षदर्शी साक्षीदार ,सी सी टी व्ही याद्वारे तपास होणे अडचणीचे होते.पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक यांनी या गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर विभागीय पोलिस अधिकारी, अंमलदार यांची बैठक घेतली.गुन्हे घडलेली ठिकाणे,गुन्ह्यांची वेळ,गुन्ह्यांची कार्यपद्धती यांचा आढावा घेतला. मार्गदर्शन व सुचना दिल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार करण्यात आली.या तपास पथकांनी रेकार्ड वरील गुन्हेगारांचा तपास सुरू केला. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली. गोपनीय माहिती दारांकडून माहिती मिळवली.त्यानुसार पथकांना सुचना दिल्या गेल्या.तीन पथकांनी उरलेली Action पार पाडली. हे आरोपी तळेगाव ढमढेरे परिसरातील असल्याचे समजल्यावर पोलिसांनी सापळा Trap लावला.आणि या पकडत Operation पुर्ण केले.
आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत —
1. विशाल बंडु पवार, वय-25,धंदा -जेसीपी चालक,राहणार- तांबेवाडी,वडगाव सावताळ,ता.पारनेर जिल्हा – अहमदनगर.
2. प्रदिप राजेंद्र शिंदे ,वय-26 वर्षे, धंदा – ड्रायव्हर, राहणार- साकुर गाडेकर, तालुका – संगमनेर, जिल्हा- अहमदनगर.
3. ओंकार अजित घोडेकर, वय-19 वर्षे, धंदा – ड्रायव्हर, राहणार- साकुर ,घोडेकर मळा,तालुका – संगमनेर, जिल्हा- अहमदनगर.
4. आदेश सयाजी भुजबळ,वय- 24 वर्षे, व्यवसाय — शेती , राहणार- साकुर,हळदावस्ती, ता. संगमनेर, जिल्हा – अहमदनगर.
5. हर्षल राजेंद्र शिंदे, वय-24 वर्षे, व्यवसाय – शेती,राहणार- साकुर,गाडेकरमळा ,ता.संगमनेर, जिल्हा- अहमदनगर.
6. श्रिकांत शिवाजी जाधव, वय- 22 वर्षे, व्यवसाय – मासेमारी व विक्री,राहणार- वांगदरी, ता.श्रीगोंदा, जिल्हा – अहमदनगर.
7. करण नाना माळी,वय- 19 वर्षे, शेती,राहणार- दहिवडी, मांजरेवस्ती, तालुका – शिरुर,जिल्हा- पुणे, मुळ राहणार- वांगदरी, तालुका – श्रीगोंदा, जि.अहमदनगर.
8. सोनु विकास धुळे,वय- 18 वर्षे, धंदा – मजुरी,रा.आंबळे,तालुका -शिरुर, जिल्हा-पुणे.
9. दिपक पांडुरंग सांगळे,वय-27 वर्षे, ,धंदा – भंगार ब्रेकिंग न्युज विद्युत रोहित्र चोरीचा सिलसिला अखेर शिरुर व पुणे ग्रामीण पोलिसांनी केला बंद ! कसा ते वाचा ….विक्री,राहणार- व्हाईटहाउस,बोलेगाव फाटा,नागापुर,अहिल्यानगर.हा या आरोपींकडून चोरीचे सामान विकत घेत असे.म्हणून याला सुद्धा या गुन्ह्यांमधे ताब्यात घेण्यात आले आहे.
48 गुन्हे उघडकिस ! …
आरोपींनी गुन्हा करण्यासाठी चारचाकी पिक अप चा व दुचाकी वाहणांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणून एक चारचाकी पिक अप, सहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापेकी एक मोटरसायकल देखील चोरीची आहे हे विशेष! या गुन्ह्यांत चोरी केलेल्या मालापैकी 500 ग्रम वजणाच्या तांब्याच्या पट्ट्या व तारा हस्तगत करण्यात आल्या आहेत. एकुण मुददेमाल 1450000 रुपयांचा आहे.तर या कारवाईत आतापर्यंत 48 गुन्हे उघडकिस आणले आहेत. गुन्ह्यातील आरोपी विशाल पवार वर 11 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. प्रदिप शिंदे याच्यावर तीन गुन्हे दाखल असुन ओतुर पोलिस स्टेशनकडील चोरीच्या गुन्ह्यात हा फरार आहे.
कारवाईत वरिष्ठ पोलिस अधिकार्याचा सहभाग….
विद्युत रोहित्र चोरी करणार्या टोळीवरील या Operation मधे श्री.पंकज देथमुख,पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण, श्री.संजय जाधव,बारामती विभाग,अपर पोलिस अधिक्षक, श्री.सुरेश चोपडे, अपर पोलिस अधिक्षक श्री. रमेश चोपडे , पुणे विभाग ,श्री.प्रशांत ढोले,एस डी पी ओ ,शिरुर विभाग, श्री.स्वप्निल जाधव दौंड विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर, श्री.ज्योतीराम गुंजवटे, पोलिस निरीक्षक, शिरुर पोलिस स्टेशन, श्री.राहुल गावडे,योगेश लंगुटे,पोलिस सब इंस्पेक्टर अभिजीत सावंत,एकनाथ पाटील, अंमलदार तुषार पंदारे,दिपक साबळे,जनार्दन शेळके,राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन घाटगे,अजित भुजबळ, संजय जाधव, योगेश नागरगोजे, स्वप्निल अहिवळे,विजय कांचन, संदिप वारे,अमोल शेडगे,धीरज जाधव,सागर धुमाळ,अक्षय नवले, निलेश सुपेकर,अक्षय सुपे,हनुमंत पासलकर,दत्ता तांबे,रामदास बाबर,राहूल पवार, विनोद पवार, समाधान नाईकनवरे,तुषार भोईटे, मंगेश भगत,महिला पोलिस नाईक सुजाता कदम,नितीन सुद्रिक,परशुराम सांगळे, नाथा जगताप,रघुनाथ हाळनोर,निलेश थोरात, शिक्रापुर पोलिस स्टेशनचे किशोर तेलंग,प्रशांत गायकवाड, प्रतिक जगताप यांनी पार पाडले आहे.
आरोपी पोलिस कस्टडी रिमांड मधे असुन शिरुर पोलिस स्टेशन पुढील तपास करत आहेत.