संविदणे (ता. शिरूर) येथे शिक्षकावर कथित मारहाण; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू
Contents
- 1 सविंदणे शिक्षक मारहाण प्रकरण | 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- 1.0.1 📌 काय घडलं?
- 1.0.2 📄 फिर्याद
- 1.0.3 महत्त्वाची सूचना ⚖
- 1.0.4 “कलमे ही भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita – BNS 2023) अंतर्गत असण्याची आहेत. खाली दिलेली माहिती ही सर्वसाधारण कायदेशीर समजावणीसाठी आहे. अचूक तरतुदींसाठी अधिकृत कायदा ग्रंथ किंवा सरकारी अधिसूचना तपासाव्यात.”
- 1.0.5 📘 कायदा समजून घ्या: नमूद कलमांचा सोपा तक्ता
- 2 📊 महत्वाची नोंद
सविंदणे शिक्षक मारहाण प्रकरण | 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सविदणे (ता. शिरूर) | 26 फेब्रुवारी 2026|
शिरूर तालुक्यातील संविदणे गावात एका शिक्षकावर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.आधीच्या बातमीत थोडी पार्यावभुमी जास्त देण्याचा प्रयन्त होता. ताजी अपडेट हाती आली आहे.शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा (क्रमांक 169/2026) नोंदविण्यात आला आहे. हा 12 जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📌 काय घडलं?
पोलीस नोंदीनुसार दिनांक 24/02/2026 रोजी सायंकाळी 5:30 ते 6:20 या वेळेत संविदणे गावाच्या हद्दीत शिक्षकावर घरात घुसून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीस दुचाकीवरून कवठे येमाई परिसरात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार काही आरोपींनी हॉकी स्टिक, लाकडी दांडे व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा उल्लेख आहे.
📄 फिर्याद
फिर्यादी:
श्री. नितीन अशोक चव्हाण (वय 29 वर्षे)
व्यवसाय: शिक्षक
सध्या रा. संविदणे, ता. शिरूर
⚖ गुन्हा नोंद
शिरूर पोलीस स्टेशन गु.र.न. 169/2026
दिनांक: 25/02/2026
वेळ: 23:10
विविध भारतीय दंड संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल.
👮 पोलिसांची भूमिका
या प्रकरणाचा तपास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
⚠ महत्वाची नोंद
सदर माहिती ही फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवर आधारित आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आरोपी दोषी असल्याचे गृहित धरले जात नाही.
मात्र पत्रकार म्हणून आम्हाला काही प्रश्न पडत असतात. 12 आरोपीना जे वेगवेगळ्या परिसरात राहतात. त्यांनाच अशा व्हिडीओ बाबत एवढी सन्वेशिलता का वाटली? ‘यांना गावात राहू द्यायचे नाही ‘असे वाक्य समोर येत आहे.
याला दुसरा विषय जोडलेला असु शकतो. या शिक्षकाचे व त्याच शाळेतील दुसर्या एका शिक्षिकेचे Promotion होणार आहे. अर्थात स्थानिक शाळेच्या जवळच नोकरीचे ठिकाण योग्य आहे.पण प्रतिस्पर्धी आहे. शिक्षिकेचा पती मुलांना ने आण करणार्या गाडीवर चालक आहे.
त्याचे कवढे येथील बरेच मित्र आहेत. ही बाब लक्षात घेऊन देखील तपास शिरुर पोलिसांनी करायला पाहिजे. कोणी या 12 जणांकडुन ही मारहाण करवुन घेतली का? की तो हे ठिकाण सोडून दुसऱ्या शाळेत जावा!अशी गावात चर्चा आहे.
महत्त्वाची सूचना ⚖
“कलमे ही भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita – BNS 2023) अंतर्गत असण्याची आहेत. खाली दिलेली माहिती ही सर्वसाधारण कायदेशीर समजावणीसाठी आहे. अचूक तरतुदींसाठी अधिकृत कायदा ग्रंथ किंवा सरकारी अधिसूचना तपासाव्यात.”
📘 कायदा समजून घ्या: नमूद कलमांचा सोपा तक्ता
| कलम | साध्या भाषेत अर्थ | संभाव्य शिक्षा (साधारण) |
|---|---|---|
| 137(2) | बेकायदेशीर जमाव करून हिंसक कृत्य करणे | 2 ते 5 वर्षांपर्यंत कारावास व दंड |
| 333 | शासकीय कर्मचारी/कर्तव्य बजावताना गंभीर दुखापत करणे | 10 वर्षांपर्यंत किंवा आजीवन कारावास + दंड |
| 118(1) | गुन्हेगारी कट/पूर्वनियोजन | मुख्य गुन्ह्यानुसार शिक्षा लागू |
| 115(2) | जीवितास धोका निर्माण करणारी कृती | 7 ते 10 वर्षांपर्यंत कारावास |
| 189(2) | धमकी देणे/भीती निर्माण करणे | 2 ते 7 वर्षांपर्यंत कारावास |
| 191(2) | बेकायदेशीररीत्या अडवणे किंवा रोखून धरणे | 1 ते 3 वर्षे + दंड |
| 190 | अपहरण/जबरदस्तीने नेणे (प्रसंगानुसार) | 7 वर्षांपर्यंत कारावास |
| 352 | मारहाण किंवा हल्ला (शस्त्राविना) | 1 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड |
| 351(2) | सामूहिक हेतूने हल्ला | 3 ते 5 वर्षे + दंड |
| 351(3) | शस्त्रासारख्या वस्तू वापरून हल्ला | 5 ते 10 वर्षांपर्यंत कारावास |
वरील शिक्षेची तरतूद ही कायद्यातील सर्वसाधारण माहिती असून अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनुसार होते.
📊 महत्वाची नोंद
- शिक्षा गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार व न्यायालयीन निर्णयानुसार बदलू शकते.
- दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष मानले जातात.
- काही कलमे जामिनपात्र/अजामिनपात्र असू शकतात — ते प्रकरणावर अवलंबून असते.
Read more >>>>
सोशल मीडियावरील गैरवापर थांबवा; शिरुर पोलीसांचा इशारा!
