
Contents
- 1 शिरुर मधील ‘सेंट जोसेफ’ शाळेत मद्यधुंद डान्स डी जे सह ? 17 जणांवर गुन्हा दाखल !
- 1.1 शिरुर मधे आता शिक्षक शिक्षिका मद्यधुंद! पण कुठे काय आणि केव्हा घडले वाचा…
- 1.1.1 शिरुर,दिनांक 22 आगस्ट : (विशेष रिपोर्ट : श्री.अनिल डांगे यांच्याकडुन)
- 1.1.2 शिरुरमधे ‘वेगळा’,”आवाज वाढव डीजे तुला,आईची शपथ हाय..”!
- 1.1.3 आवाज कमी करण्यावरून वाद !
- 1.1.4 सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुल मधील पुरुष महिला मद्यधुंद. …
- 1.1.5 लाथ ही मारली?
- 1.1.6 मुलाला ‘खल्लास’ करण्याची धमकी?
- 1.1.7 About The Author
- 1.1 शिरुर मधे आता शिक्षक शिक्षिका मद्यधुंद! पण कुठे काय आणि केव्हा घडले वाचा…
शिरुर मधील ‘सेंट जोसेफ’ शाळेत मद्यधुंद डान्स डी जे सह ? 17 जणांवर गुन्हा दाखल !
शिरुर मधे आता शिक्षक शिक्षिका मद्यधुंद! पण कुठे काय आणि केव्हा घडले वाचा…
शिरुर,दिनांक 22 आगस्ट : (विशेष रिपोर्ट : श्री.अनिल डांगे यांच्याकडुन)
शिरुर मधील ‘सेंट जोसेफ’ शाळेत मद्यधुंद डान्स डी जे सह चालु होता.यात 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे सुत्रांकडून समजते.! ही ब्रेकिंग न्युज घडली आहे. यात आता शिक्षक शिक्षिका मद्यधुंद डान्स करत असल्याचे दिसून आले आहे.
शिरुरमधे ‘वेगळा’,”आवाज वाढव डीजे तुला,आईची शपथ हाय..”!
हे सर्रास डिजेवर वाजवले जाणारे गाणे आणि त्यामुळे होणारा त्रास ! आणि आनंद सर्वांना परिचित आहे.या त्रासातूनच ज्यांच्याकडून समाज घडवण्याची अपेक्षा आहे,त्यांच्याकडूनच समाज बिघडवण्याचे काम सुरू असेल तर ! मात्र ते घडले आहे ! त्याबाबतची तक्रार शिरुर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. असल्याचे या घटनेवरून निदर्शनास येत आहे सदरील घटना खालील प्रमाणे आहे. शिरुर’
आवाज कमी करण्यावरून वाद !
डीजेचा आवाज कमी करण्यावरून झालेला या वाद प्रकरणी १७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुमन सखाराम साळवे ,४४ वर्ष, व्यवसाय गृहिणी ,राहणार- .बगाड रस्ता, रामलिंग, शिरूर तालुका-शिरूर जिल्हा- पुणे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेश चौगुले, अभिषेक जाधव व इतर १५ आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुल मधील पुरुष महिला मद्यधुंद. …
दिनांक २० जून २०२४ रोजी सुमन साळवे यांच्या घराच्या शेजारी असणारा सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम बगाड रस्ता,रामलिंग,शिरूर येथे रात्री १०:३० वा सुमारास डी.जे वाजण्याचा कर्ण कर्कश आवाज येत होता .साळवे यांची मुले यु.पी.एस.सीचा अभ्यास करत असल्याने त्यांनी शाळेचे गेटवर जाऊन वॉचमन (नाव माहित नाही) कडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी शाळेचे आत मध्ये कोणाला तरी फोन केला .त्यावेळी वॉचमनने सांगितले की,’ तुम्हालाच आत मध्ये बोलविले आहे’. म्हणून सुमन साळवे व त्यांचा मुलगा असे दोघेही शाळेचे आत मध्ये गेले. तेव्हा पुरुष व महिला असे १० ते १५ जण दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. म्हणून सुमन साळवे त्याचा व्हिडिओ प्रिन्सिपल मॅडमला दाखवण्यासाठी काढू लागल्या. त्यावेळी प्रिन्सिपल ज्ञानसी पायस व इतर दोन महिला आल्या.
साळवेंनी ज्ञानसी पायस यांना ,’डी.जे चा आवाज कमी करा असे म्हणाले असता त्या सुमन यांना म्हणाल्या की,’ तू कोण’ असे म्हणून इतर लोकांना म्हणाल्या की, ‘हिला धरून ठेवा आणि पोलिसांना बोलवा’ हे सगळे दारूच्या नशेत होते.सुमन साळवे तिथून बाहेर निघाल्या.
लाथ ही मारली?
तेव्हा बाहेर जात असताना मॅडम (पूर्ण नाव माहित नाही) यांनी साळवे यांना लाथ मारली. त्यांचा मोबाईल काढून घेतला व त्यांचा मुलगा जीवन सखाराम साळवे यांस सुरेश चौगले ( पूर्ण नाव माहित नाही) यांनी गचांडले . त्यांचे साथीदार यांनी देखील धक्का-बुक्की केली.अंधार असल्यामुळे किती व्यक्ती होत्या दिसले नाही. त्यानंतर प्रिन्सिपल ज्ञानसी पायस यांनी सुमन साळवे व त्यांचे मुलांचे विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे खोटी तक्रार दिली.
मुलाला ‘खल्लास’ करण्याची धमकी?
त्यानंतर सुरेश चौगुले व अभिषेक जाधव हे रस्त्याने येत- जात असताना शिवीगाळ करून सुमन साळवे यांचा मुलगा जीवण याला ‘खल्लास’ करून टाकतो, अशी धमकी देऊ न,’ तुम्ही आमचे काही वाकडे करू शकत नाही ‘असे म्हणून त्रास दिला. त्यासंदर्भात दिनांक-२२ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय उगले करीत आहे. ‘बदलापूर’ ची घटना ताजी असतानाच असे प्रकार शांत-संयमी असणाऱ्या शिरूर शहर व पंचक्रोशी मध्ये घडत असतील तर या घटनेकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक दखल घेऊन संबंधित शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची अपेक्षा ‘सत्यशोधक न्युज’ प्रतिनिधीकडे नागरिकांनी बोलून दाखवली.