भारतामधील लैंगिक स्वातंत्र्य वादावर आधारित सामाजिक चर्चा दर्शवणारे चित्र:Image Credit: Photo by Dibakar Roy on Unsplash https://unsplash.com/@dibakar16roy
Sexual Freedom Debate India या विषयावर समाजात विविध मतप्रवाह दिसून येतात.माध्यमांमध्ये चर्चेत आलेल्या प्रकरणांबाबत विविध मतप्रवाह दिसतात.लैंगिक स्वातंत्र्य, कायदे, सामाजिक दबाव, खोटे आरोप व न्यायव्यवस्था यांचा परस्पर संबंध अत्यंत गुंतागुंतीचा आहे. या लेखात वैयक्तिक निरीक्षण, सामाजिक वास्तव व मानवी मानसशास्त्र यांच्या आधारे काही मुद्दे मांडले आहेत.
Contents
- 1 🧠माझी निरीक्षणे आणि सामाजिक वास्तव
- 2 ⚖️न्यायव्यवस्था – न्याय की निकाल?
- 3 Sexual Freedom Debate India: मानवी स्वभाव आणि न्यायाची प्रवृत्ती
- 4 🧬Sexual Freedom – गरज की धोका?
- 5 ⚠️पण दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची
- 6 🧠मानसशास्त्र आणि वर्तन
- 7 🌍समाजातील दुटप्पीपणा:Hypocrisy
- 8 📊IQ आणि सामाजिक समज
- 9 ⚖️कायदे आणि सुधारणा
- 10 निष्कर्ष:Conclusion
- 11 📢 Final Note
Sexual Freedom Debate India:
एपस्टीन फाईल्स व महाराष्ट्रातील नाशिक येथील भोन्दु बाबा लैंगिक अत्याचार प्रकरण जगभर व भारतात चर्चेत आहे.पण Behind The Line and Between the Line राजकीय बाबी मला तर स्पष्ट दिसतात. अनेक घटक भावनिक होत प्रतिक्रिया देत आहेत. ही भावना समजण्यासारखी आहे. राजकीय हेतुन्च्या मागील Layer आर्थिक हितसम्बन्ध व शोषण दिसते.
त्याच्याही मागील Layer मुलभुत मानवी लैंगिक प्रवृत्ती आहे. असे दिसते. Reproduction मानवासह सर्व प्राण्यांमधे उपजत प्रवृत्ती आहे. ही जैविक, रासायनिक व मानसिक प्रक्रिया आहे. निसर्गाने ही प्रक्रिया उत्कट आनंद plesure निर्माण करणारी निसर्गदत्त आहे. ही अवस्था काही अन्य बाबीकडे निर्देश करते का? जसे की परमोच्च आनंदाची अवस्था जी चेतनेचे अन्तीम लक्ष आहे. परमात्मा तत्व, Energy या आनंद अवस्थेत अनादी अनन्त विराजमान आहे. तिकडे हा निर्देश आहे का? मी फक्त प्रश्न विचारत आहे स्वत:ला आणि समस्त मानवी चेतनेला.
सत्तावादी, पुरुषप्रधान मानसिकतेने कधीतरी भुतकाळात स्वार्थहेतुने Sex ला बदनाम केले. पुढे इतके की Sex सम्बन्धी विचार हे पुर्ण विकृत झाले. बन्धणे आली. घुसमट आली. दमन आले. त्याची प्रतिक्रिया या ना त्या प्रकारे बाहेर आली. काहीशा विकृत स्वरुपातही. अखंड मानव जात दमित झाली. प्राण्यांमधे बलात्कार होत नाही. नैसर्गिक वेळेस Sex घडतो. मानवात काय झाले?
परिणाम मानवाचा चेहरा कधी समाधानी दिसतच नाही. नजर भिरभिर! शन्का इ. ने व्यापलेला दिसतो. आता इथे थोडक्यात माझे व्यक्तीगत मत सांगतो. आता मानवाला लैंगिक स्वातंत्र्य हवे आहे. नवीन पिढीमधे ही भावना प्रबळ दिसते. मानवाला मानवाने लैंगिक स्वातंत्र्य दिले पाहिजे. ते त्याच्या इतर सर्व सम्भावना सम्पवुन टाकत आहे. काही प्रमाणात ज्या देशामधे, सन्स्कृतीमधे ते स्वातंत्र्य आहे. ते लोक आनंदी दिसतात. आनंदी देशाच्या क्रमवारीत देश खुप पिछाडीवर आहे. आणि हे सर्व प्रकारचे उपदेश, धर्म, दर्शन, तत्वज्ञान, परम्परा, अध्यात्म प्रवाह असताना! कुठेतरी मुलभुत चुक होत आहे.
काही वेळापुर्वी सोशल मिडियावर पाहिले. नाशिक चे व्हिडीओ blur नको, तर स्पष्ट दाखवा, अशा टिप्पण्या काय सांगतात? आणि प्रत्येकाने स्वतः ला विचारुन पहावे की त्याला काय वाटते? नार्को टेस्ट जर अशा विषयावर सार्वत्रिक घेतली तर? पुढचे काही मी बोलत नाही. जगभरच्या मानसशास्रज्ञानी, जैव शास्रज्ञानी, जैवरसायन शास्रज्ञानी, वैज्ञानिक आणि तत्वज्ञानी पुढे येवुन चर्चा करावी. खुली चर्चा करावी. मानवासाठी आज काय हिताचे आहे? अन्तीम सार्थकता कशात असते? स्वातंत्र्यात असते का? Absolute Freedom मधे आहे का? की अन्य कशात?
🧠माझी निरीक्षणे आणि सामाजिक वास्तव
Sexual Freedom Debate India सन्दर्भाने मी लहानपणापासून समाजात फिरताना अनेक घटना, वर्तन पॅटर्न आणि मानवी बॉडी लॅंग्वेज यांचे निरीक्षण केले आहे. अनेक वेळा व्यक्तीचे वर्तन त्याच्या मनातील गोष्टी सांगते. मानवी नातेसंबंध, लैंगिक आकर्षण आणि संवाद यामध्ये सूक्ष्म संकेत असतात.त्यानुसार क्रिया प्रतिक्रिया निर्माण होतात.
तथापि हे देखील महत्त्वाचे आहे की प्रत्येक प्रकरण वेगळं असतं.भासवले वेगळे जात असते. हेतु वेगळा असतो. राजकीय, आर्थिक, सामाजिक खेळातले पत्ते प्रतिपत्ते, डाव, प्रतिडाव असतो.आणि सर्व घटनांना एकाच मोजपट्टीत मोजले जाते . समाजात विविध प्रकारचे अनुभव आणि वास्तव अस्तित्वात आहेत.सापेक्षता ठायी ठायी दिसते.
⚖️न्यायव्यवस्था – न्याय की निकाल?
भारतात एक प्रसिद्ध तत्त्व आहे: 👉 “अनेक दोषी सुटले तरी चालतील, पण एकही निरपराध्याला शिक्षा होऊ नये.”
चांगले आहेच पण हे वास्तवात कधी आले का? पतिवृतेच्या गळ्यात धोन्डा, वेश्येला मनिहार इ. म्हणी का अस्तित्वात आल्या? न्याय मिळतो की निकाल मिळतो? न्यायाची शास्वती कोनती आधुनिक, लोकशाही देऊ शकते का? Sexual Freedom Debate India या चर्चेत ground level ची बारीक सारीक निरिक्षणे विचारत घेणे आवश्यक आहे.
प्रत्यक्षात अनेकदा लोकांना वाटतं:
- काही गुन्हेगार निर्दोषी सुटतात.भगवान के घर देर है लेकिन अन्धेर नहीं | याची सार्वत्रिक प्रचिती कुठे गेली?
- काही निरपराधी अडकतात.हे समाज पहातो. त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही.
यामुळे लोकांमध्ये Justice System वर प्रश्न निर्माण होतात.
Sexual Freedom Debate India: मानवी स्वभाव आणि न्यायाची प्रवृत्ती
मानवामध्ये:
- सूड घेण्याची प्रवृत्ती.हे बलात्कार सारख्या घटनांमधे एक मुख्य कारण असते.काही प्रकरणांमध्ये खोट्या आरोपांबाबतही चर्चा होत असल्याचे दिसते.
- इतर कारणे व हेतू मोठी भुमिका पार पाडतात.
- हिरवा सिग्नल मिळाल्या शिवाय पाऊल पुढे पडत नाही. सामाजिक भिती हे भितीचे एक प्रमुख कारण आहे. Mob Action ची भिती महत्वाचे काम करते.
- दुर्गम भागात लैंगिक अत्याचाराला बराच वाव आहे. पैसा हा घटक महत्वाचे काम पार पाडतो. मी आधी Layers सान्गितल्या आधी.
- स्वतःचं रक्षण करण्याची भावना नैसर्गिक आहे.सामुहिक, सामाजिक सन्रक्षण पुढे येणे फार गरजेचे असते. समाज अन्य अनेक पुर्वग्रहानी ग्रस्त व त्यामुळे धोकादायक बनतो की जो सन्रक्षक बनला पाहिजे.
- भावनिक निर्णय जीवनावर प्रभाव पाडतात.भावना मुळ समस्येपासुन लक्ष विचलित करण्याचे एक साधन म्हणून सत्ताधारी वापरतात. लोकसंख्या वाढल्याने अभाव वाढतो का? की असमान वितरणामुळे? असमान वितरणाने. इ. निरिक्षणे माझ्या वैयक्तिक निरिक्षणातुन येतात.इ. इ.
हे घटक कार्यरत असतात. त्यामुळे अनेक वेळा न्याय आणि सत्य यामध्ये अंतर निर्माण होतं.
🧬Sexual Freedom – गरज की धोका?
काहींचं मत आहे की:
- लैंगिक बंधनांमुळे मानसिक दडपण वाढतं.
- पुरुष-स्त्री दोघेही depression मध्ये जातात.
- समाजात artificial morality वाढते.
👉 या मतानुसार: Sexual Freedom वाढवली तर समाज अधिक खुला होईल.
⚠️पण दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची
✔ Consent (संमती) अत्यंत महत्त्वाची.
✔ कायदे समाजाच्या संरक्षणासाठी असतात.
✔ सर्व प्रकरणे सारखी नसतात.
👉 म्हणून: पूर्णपणे कायदे रद्द करणे हा उपाय नाही.
🧠मानसशास्त्र आणि वर्तन
मानसशास्त्र सांगते:
- आकर्षण नैसर्गिक आहे.
- पण नियंत्रण आणि जबाबदारी आवश्यक आहे.
काही वेळा:
- खोटे आरोप होऊ शकतात.
- पण वास्तविक गुन्हेही घडतात.
👉 त्यामुळे balanced approach आवश्यक आहे
🌍समाजातील दुटप्पीपणा:Hypocrisy
्निरीक्षणानुसार:
- लोक वरून धार्मिक/आध्यात्मिक दिसतात. दाखवतात.
- पण गुपचूप वेगळं वर्तन करतात.भौतिकवाद ठासुन भरलेला असतो. भौतिक सुखे त्याला हवी असतात.
हे वास्तव अनेक ठिकाणी दिसून येतं: 👉 Public image vs Private behavior
📊IQ आणि सामाजिक समज
समाजाने:
- Logical thinking वाढवावी.
- Emotional intelligence वाढवावी.
👉 अंधश्रद्धा, नाटकं आणि ढोंगबाजी नसावी.
⚖️कायदे आणि सुधारणा
👉 काही सुधारणा शक्य आहेत:
- False cases वर कठोर कारवाई.
- Fast-track न्यायालये.
- Scientific investigation (forensics).
👉 पण: कायदे पूर्ण रद्द करणे धोकादायक ठरू शकते.
निष्कर्ष:Conclusion
हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे. निरीक्षण समाजातील एका बाजूचं चित्र दाखवतं.असं नाही. ते आहे, असे निरिक्षण आहे. पण वैयक्तिक.
👉 पण पूर्ण सत्य समजण्यासाठी:
- कायदा • आधुनिक तन्त्रे • AI • ट्रान्सपरॅन्सी
- मानसशास्त्र •
- सामाजिक वास्तव व शास्त्र • जैवरासायनिक शास्त्र
हे सर्व घटक एकत्र पाहणे आवश्यक आहे.
📢 Final Note
👉 हे विचार वैयक्तिक निरीक्षण म्हणून मांडले आहेत. Sexual Freedom Debate India हा व्यापक विषय आहे. एपस्टीन फाईल्स व महाराष्टातील भोन्दु बाबा आशोक खरात हे आजचे ज्वलंत विषय आहेत.या निमित्ताने पुन्हा आपण मुलभुत विषय सोडून भरकटत तर चाललो नाही ना? असे वाटले.
(हा लेख वैयक्तिक निरीक्षण व विचारांवर आधारित असून कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा न्यायप्रक्रियेबाबत ठोस आरोप करण्याचा उद्देश नाही. सर्व प्रकरणे स्वतंत्र असतात आणि कायद्याचा आदर राखणे आवश्यक आहे.)
(Image Credit: Photo by Dibakar Roy on Unsplash
https://unsplash.com/@dibakar16roy)
Read More :
Sex is Meditation – ओशो | लैंगिकता, ध्यान आणि सजगतेचा अर्थ
Sex Hormones : कोनत्या कारणामुळे तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होते?
Sex in Life ; मानवी जीवनात लैंगिक संबंधांचा महत्त्वाचा वाटा का व कसा आहे?
